e Shram Card benefit | ई श्रम कार्ड चे फायदे मराठी

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

 ई श्रम कार्ड साठी कोण-कोण अर्ज करू शकतात.



E Shram Card benefit in Marathi
E Shram Card benefit in Marathi

मोठ्या क्षेत्रातील कंपन्यामध्ये जो कामगार वर्ग आहे, त्यांना शासनाच्या नियमानुसार सुरक्षा म्हणून पी एफ (EPFO) आणि विमा संरक्षण दिले (ESIC) जाते.

परंतु कोरोना सारख्या महामारीत सर्वसामान्य कामगार वर्ग संघर्ष करत असताना दिसला. ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांना २ वेळेचे जेवण भेटणे सुद्धा अवघड झाले होते. विविध क्षेत्रात बराच असा कामगार वर्ग आहे, ज्यांना काम केले तरच त्यांची चूल पेटत असते. अशा वर्गातील जवळपास  ३८ कोटी लोकांना भविष्यातील आर्थिक आणि आरोग्य विषयी कोणतीशी सुरक्षा नाही. e Shram Card benefit in Marathi

जवळपास ३८ कोटी  लोकांसाठी भारत सरकारने e SHRAM कार्ड सुविधा आणली आहे. या पाठीमागचा भारत सरकारचा एकच उद्देश आहे. भविष्यात कोरोणा सारखी महामारी, पुरग्रस्थ स्थिती, ओला दुष्काळ, सुखा दुष्काळ, भूकंप आणि इत्यादी नैसर्गिक संकट आले तर गोर-गरीब जनतेला पैश्याच्या स्वरुपात आर्थिक मदत थेट त्यांचा बँक खात्यात पाठवता यावी. e SHRAM  कार्ड च्या अंतर्गत पात्र उमेदवारांना कोणतेही शुल्क न भरता  दर महिना ३००० रुपये पेन्शन मिळणार आहे. तसेच २ लाखांचे विमा संरक्षण मिळणार आहे. 'E Shram Card benefit in Marathi'


बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे. 

माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आपणास नम्र विनंती आहे. आपल्या परिचयातील ( आपले शेजारी, नातेवाईक, कामाच्या ठिकाणी आणि इतर ) असे काही लोकं असतील जे शिक्षित नाहीत, ज्यांचाकडे मोबईल, LAPTOP नाही, किवा काही लोकांना e SHRAM कार्ड बद्दल माहिती नाही, अशा लोकांना तुमची महत्वाची ५-१० मिनिटं देवून त्यांचे e SHRAM कार्ड बनवून देवू शकता. आणि एक प्रकारे तुम्ही आपल्या पदरात पुण्य पाडून घेवू शकता. तुमच्या १० मिनिटाच्या मदतीने तो व्यक्ती तुमचा आयुष्य भर ऋणी राहील. e SHRAM कार्डची नोंदणी करणे खूप सोपं आहे, आणि हो !!!!  हि माहिती आपल्या संपर्कातील लोकांना जास्तीत जास्त पाठवा जेणेकरून याचा लाभ सर्वाना मिळावा हि भारत सरकारची इच्छा आहे.


e SHRAM कार्ड साठी कोण नोंदणी करू शकतात.

आपल्या आसपास असणारे सर्वसामान्य लोकं म्हणजे बांधकाम कामगार, शेती कामगार, वाहतूक कामगार, फुटपाथ वर व्यवसाय करणारे, घरकाम, सर्व प्रकारचे छोटे टपरी व्यवसाय, दुधवाला, सफाई कामगार, हमाली कामगार, किवा एखाद्या छोट्या कंपनी मध्ये काम करत आहेत परंतु त्यांना पगारा व्यतिरिक्त कोणताही लाभ भेटत नाही, फेरीवाले, मेंढपाळ, भाजी विक्रेता आणि इत्यादी. ( थोडक्यात जे लोक कोणतेही स्वताचे लहान मोठे व्यवसाय करत आहेत, किवा विविध क्षेत्रातील असे काही कामगार आहेत त्यांना पगारा व्यतिरिक्त इतर कोणतेही लाभ भेटत नाहीत, असे सर्व लोकं e shram कार्ड साठी  नोंदणी करू शकतात )  "E Shram Card benefit in Marathi"


e SHRAM कार्ड मिळवण्यासाठी पात्रता काय आहे

 १. वय वर्ष १६ ते ५९ दरम्यान  असणारे सर्व महिला पुरुष नोंदणी करू शकतात. ( महत्वाचे म्हणजे e shram कार्ड साठी आता पर्यंत सर्वात जास्त महिलांनी नोंद केली आहे. महिला ५३% आणि पुरुष ४७%)


२. आधार कार्ड, आधार कार्ड ला जोडलेला मोबईल नंबर, बँक खाते तपशील.


३. e shram कार्ड साठी नोंदणी करणारा व्यक्ती EPFO आणि ESIC चा सदस्य नसावा.


४. INCOME TAX ( IT RETURN ) भरणा करणारा व्यक्ती नोंदणी करू शकत नाही.


e SHRAM कार्ड चे फायदे.

१. e SHRAM कार्ड पूर्ण भारतात वैध आहे.


२. e SHRAM कार्ड च्या माध्यमातून तुम्ही कोण कोणत्या सरकारी योजना साठी पात्र आहात याची वेळोवेळी माहिती मिळते.


३. e SHRAM कार्ड च्या माध्यमातून भारत सरकार तुम्हाला विविध क्षेत्रातील मोफत मध्ये कोर्स देण्याचे काम करते. कोर्स पूर्ण केल्या नंतर भारत सरकार द्वारे तुम्हाला प्रमाणपत्र (Course Certificate) दिले जाते. ज्यांचे शिक्षण इयत्ता आठवी ते B.A. B. Com झाले आहे असे लोकं सुद्धा अर्ज करू शकतात. 

तसेच कोर्स पूर्ण केल्या नंतर, भारत सरकार तुमच्या पात्रतेनुसार विविध क्षेत्रात भारत सरकारशी जोडलेल्या संघटनांना तुमच्या नोकरी साठी शिफारस करत असते. E Shram Card benefit in Marathi


४.  अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला २ लाख रुपये मदत.


५. अपघाती कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास २ लाख रुपये पर्यंत मदत. 

 

६. काही प्रमाणात अपघाती जखमी झाल्यास १ लाखाची मदत. 


७. वयाच्या ६० वर्ष नंतर दर महिना ३००० रुपये पेन्शन. ( पती-पत्नी जर ६० वर्ष पूर्ण असेल तर दोघांचे मिळून महिना ६००० मिळणार ) 


e SHRAM कार्ड साठी लागणारी कागदपत्रे 

१. आधार कार्ड नंबर


२. आधार कार्ड ला जोडलेला मोबाईल नंबर.


३. बँक खात्याचा तपशील 


e SHRAM कार्ड ची नोंदणी कशी करायची

१. तुम्ही स्वतः नोंदणी करू शकता. https://eshram.gov.in/ या वेब साईट ला भेट द्या. (किवा तुमच्या शहरातील CSC सेंटर ला भेट द्या.) 


२. उजव्या बाजूला Register on eSHRAM वर क्लीक करा > आधार कार्ड ला लिंक असलेला मोबईल नंबर टाका > captcha code टाका > खाली दिलेल्या दोन्ही NO पर्यायावर क्लीक करा > SEND OTP वर क्लिक करा 


३. तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल >  मोबईल वर आलेला OTP टाका > सबमिट वर क्लिक करा

.

४. आता तुमचा समोर एक नवीन पेज ओपन होईल > तुमचा आधार नंबर टाका > OTP वर क्लिक करा > CAPTCHA कोड टाका > खाली I Agree to the .....वर क्लिक करा > सबमिट वर क्लिक करा.


५ . तुमच्या समोर एक नवीन पेज ओपेन होईल > मोबईल वर आलेला OTP टाका > Validate वर क्लिक करा.


६ . आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल >  Continue to other Details वर क्लिक करा.


७ .आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल > Emergency Contact Number > Email Id > Marital Status >  Father's Name > Mother's Name > Social Category > Blood Group > Differently Abled (अपंग असेल तर Yes वर क्लिक करा) 


८ . Nominee Details > Name > Date of Birth > Gender > Relation Ship With Applicant > Nominee Address > Nominee Mobile Number > Save & Continue.


९ . आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल > Residential Address > State ( Maharashtra ) > District > Current Address > Urban ( शहरात राहत असाल तर ) Rural (ग्रामीण भागात राहत असाल तर ) त्यानुसार क्लिक करा. पुढील बॉक्स मध्ये तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे. 


१० . staying at Current address ( किती वर्षापासून रहात आहात )  > पुढील बॉक्स मध्ये तुमचा कायमस्वरूपी पूर्ण पत्ता लिहायचा आहे > Save & Continue > 


११ . आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल > Education Qualification > तुमचे शिक्षण किती झाले आहे ते सिलेक्ट करा. (काहीच शिक्षण नसेल तर त्यासाठी Not Literate सिलेक्ट करा.) > Monthly Income > 


१२ .  Occupation & Skills (म्हणजे तुम्ही कोणते काम करता) > Are you working with any platform....) No वर क्लिक करा > Primary Occupation ( इथे तुम्ही कोणते काम करता ते सिलेक्ट करायचं आहे) > work experience in primary occupation (in year) कामाचा किती वर्षाचा अनुभव आहे ते सिलेक्ट करा. 


१३ . Secondary Occupation ( दुसर्या काही कामाचा अनुभव असेल तर माहिती देवू शकता.) > Occupation Certificate ( तुमच्याकडे असेल तर अपलोड करू शकता ) 


१४ . How did you acquire skills?  तम्ही जे काम करता त्यासाठी ट्रेनिंग घेतले आहे का ? घेतले असेल तर पहिला option सिलेक्ट करा. नसेल घेतले तर दुसरा option सिलेक्ट करा. >


१५ . Self Skills > Self Learning.


१६ . interested in Skills upgrade > तुमच्या कामाशी संबंधित सरकार कडून ट्रेनिंग घ्याचे असेल तर दिलेला पर्याय निवडा > To Received formal technical Training > Save & Continue वर क्लिक करा.


१७ . आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल > या पेज वर तुमचा बँक तपशील काळजीपूर्वक भरा > save & Continue वर क्लिक करा. 


१८ . आता तुमच्या समोर एक पूर्ण फॉर्म ओपन होईल...तुम्ही भरलेली माहिती पूर्ण बरोबर आहे याची खात्री करून घ्या  I understand that वर क्लिक करा  आणि सबमिट वर क्लिक करा. 


१९ आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल > Download UAN Card वर क्लिक करा. तुमचे e shram कार्ड आता Download झाले आहे त्याची प्रिंट काढून घ्या. 

 e SHRAM कार्ड नोंदणी साठी येथे क्लिक करा. 

भारत सरकारने हि सुविधा 26 ऑगस्ट २०२१ पासून चालू केली आहे. आज अखेर पर्यंत २९,५२,८३,०२३ (एकोणतीस कोटी बावन्न लाख त्रेयांशी हजार तेवीस) लोकांनी याचा लाभ घेतला आहे.  E Shram Card benefit in Marathi


व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा. 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!