Lek Ladki Yojana | लेक लाडकी योजना फॉर्म Online

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

मुलींना महाराष्ट्र शासनाकडून मिळणार १०१००० रुपये

मुलींच्या सक्षमीकरणासाठी "लेक लाडकी" हि नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. शासनाचा या मागील मुख्य हेतू खालील प्रमाणे आहे. Lek Ladki Yojana Form PDF 

Lek Ladki Yojana Form PDF
Lek Ladki Yojana Form PDF 



 
मुलींचा जन्म दर वाढविणे.
मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे. 
मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बाल विवाह रोखणे.
कुपोषण कमी करणे.

मुलींसाठी १०१००० (एक लाख एक हजार रुपये) रुपये रक्कम खालील प्रमाणे मिळणार आहे.

  • मुलीच्या जन्मानंतर ५००० हजार रुपये  - पहिला हफ्ता 
  • इयत्ता पहिलीत ६००० हजार रुपये - दुसरा हफ्ता 
  • इयत्ता सहावीत ७००० हजार रुपये - तिसरा हफ्ता 
  • अकरावीत ८००० हजार रुपये - चौथा हफ्ता 
  • अठरा वर्ष पूर्ण झाल्या नंतर ७५००० हजार रुपये - पाचवा हफ्ता. 
या प्रमाणे एकूण १०१००० ( एक लाख एक हजार रुपये) प्राप्त होणार आहेत.


खालील पात्र पालक अर्ज करू शकतात.


  • हि योजना पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारक कुटुंबामध्ये तारीख १ एप्रिल २०२३ व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किवां दोन मुलींना लागू राहील. 
  • तसेच एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास हि योजना मुलीसाठी लागू राहील.
  • पहिल्या अपत्याच्या तिसर्या हफ्त्यासाठी व दुसर्या अपत्याच्या दुसर्या हफ्त्यासाठी अर्ज सदर करताना माता - पिता यांनी कुटुंब नियोजन प्रमाण पत्र सदर करणे अनिवार्य आहे.
  • दुसर्या प्रसुतीच्या वेळी जुळी मुले जन्माला आल्यास एक मुलगी किवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ भेटेल. परंतु त्यानंतर माता-पिता यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य आहे.
  • दिनांक ०१.०४.२०२३ पूर्वी एक मुलगी/मुलगा आहे, त्यानंतर जन्मास आलेल्या दुसर्या मुलीस किवा जुळ्या मुली जन्माला आल्या तर त्यांना हि योजना लागू राहील. परंतु त्यानंतर माता-पिता यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य आहे. 'Lek Ladki Yojana Form PDF' 
  • लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी यांचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
  • वार्षिक उत्पन्न १००००० लाख (एक लाख रुपये) पेक्षा जास्त नसावे.




आवश्यक कागदपत्रे 

  • मुलीचा जन्माचा दाखला
  • कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
  • मुलीचे आधार कार्ड
  • पालकांचे आधार कार्ड
  • बँकेच्या पासबुक च्या पहिल्या पानाची झेरोक्स 
  • राशन कार्ड 
  • मतदान ओळखपत्र ( मुलीचे वय १८ पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव नोंदवणे आवश्यक)
  • मुलगी शिक्षण घेत असल्याचा पुरावा (शाळेचा दाखला)
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र 
  • अंतिम लाभ घेतेवेळी मुलीचे लग्न झालेलं नसावे. "Lek Ladki Yojana Form PDF"

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी ०१.०४.२०२३ रोजी व त्यांनतर मुलीचा जन्म झाला असल्यास, मुलीच्या जन्माची नोंदणी केल्या नंतर, आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांचाकडे अर्ज सादर करावा, अर्ज करण्यास असमर्थ असाल तर अंगणवाडी सेविका यांची मदत घेवून वर दिलेल्या कागदपत्रा सहित अर्ज सदर करावा. 

अर्ज सादर केल्या नंतर अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी अंगणवाडी सेविका यांच्याकडून माहिती मिळवू शकता.



अर्ज सादर करण्यापूर्वी पूर्ण माहिती व्यवस्थित वाचून आणि समजून घ्या.

आपणास विनंती आहे, हि माहिती जास्तीत जास्त आपल्या संपर्कातील गरजू लोकांना पाठवा. ग्रामीण भागात काही अशिक्षित बांधव आहेत त्यांना याबद्दल माहिती द्या... तुम्ही केलेल्या मदतीचे ती व्यक्ती आयुष्भर तुमचा ऋणी राहील. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!