१ मे २०२४ पासून शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक राहील
Mother's name is mandatory on Govt doc's |
माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये ११ मार्च २०२४ रोजी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला तो निर्णय म्हणजे कोणत्याही शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव लिहिणे आता बंधनकारक आहे. याची अंमलबजावणी ही "महाराष्ट्र दिन" म्हणजेच १ मे २०२४ या तारखेपासून करण्यात येत आहे. Mother's name is mandatory on Govt doc's
आईच्या नावाचं अस्तित्व
१ मे २०२४ 'महाराष्ट्र दिन' या दिवसापासून खऱ्या अर्थाने आपल्या माता भगिनींना एक वेगळी अशी ओळख आणि सन्मान मिळणार आहे. याचं कारण असं महाराष्ट्र शासना कडून नावाबद्दल वेगळा बदल करण्यात आला आहे. माणूस कोठेही गेला तर त्याची ओळख ही त्याच्या वडिलांच्या नावावरून ठरत असते. आई आपल्या मुलांना लहानाचं मोठं करते संस्कार देते परंतु आतापर्यंत पालक म्हणून कागदोपत्री सर्व श्रेय हे वडिलांनाच मिळत होत. आई म्हणून कागदोपत्री तिचं अस्तित्व काहीच नव्हतं. Mother's name is mandatory on Govt doc's
असे नाव लिहिणे चुकीचं आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ मे २०२४ पासून आईचे नाव हे कोणत्याही दस्तऐवजावर संलग्न लिहिले जाणार आहे.
म्हणजे आतापर्यंत आपण शासकीय निमशासकीय किंवा खाजगी क्षेत्रामध्ये कुठेही आपल्याबद्दल परिचय द्यायचा असेल तर आपण "आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव" असा आपण परिचय देत होतो किंवा संबंधित अर्जावरती अशा प्रकारे आपण आपले नाव लिहित होतो. असे नाव आता लिहिता येणार नाही.
कोणताही अर्ज किंवा माहिती भरताना आईच्या नावासाठी एक वेगळा कॉलम दिला जायचा, आता आईच्या नावासाठी वेगळा कॉलम दिला जाणार नाही, वेगळ्या कॉलम मध्ये नाव लिहिलेले स्वीकारले जाणार नाही. Mother's name is mandatory on Govt doc's
नवीन नियमानुसार नाव असे लिहिले जाणार.
नवीन नियमानुसार १ मे २०२४ पासून वडिलांच्या अगोदर आईचे नाव लिहिलं जाणार आहे. म्हणजेच आता सर्वप्रथम वडिलांच्या नावाच्या अगोदर आईचं नाव लागणार आहे.
"स्वतःचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव" नवीन नियमानुसार असे नाव लिहिले जाणार आहे.
नवीन बालकांच्या जन्माची नोंद कशी करावी?
१ मे २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावांची नोंद ही नवीन नियमानुसार होणार आहे. म्हणजेच सर्वप्रथम "मुलाचे नाव,आईचे नाव, वडिलांचे नाव, आणि आडनाव" असे लिहिले जाणार आहे. सर्व शैक्षणिक कागदपत्रे, सर्व शासकीय दस्तऐवज यावर नवीन नियमानुसार नाव लिहिले जाणार आहे. 'Mother's name is mandatory on Govt doc's'
विवाहित स्त्रीच्या नावाची नोंद कशी करायची?
विवाहित स्त्रियांच्या नावांची नोंद ही पूर्वीप्रमाणेच केली जाणार आहे. म्हणजेच "तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव आणि आडनाव" अशा स्वरूपामध्ये नावाची नोंद केली जाणार आहे. तसेच स्त्रीला विवाहपूर्वी च्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नाव नोंदविण्याची सूट देण्यात आली आहे.
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.
नाव लिहिताना काळजी घ्या.
शासकीय कामासंदर्भात कुठेही अर्ज किंवा माहिती भरत असाल तर संबंधित अधिकाऱ्याकडून नाव कसे लिहायचे याबद्दल एकदा खात्री करून घ्या. तुम्ही जर असं केलं नाही तर तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करत आहात किंवा जी गोष्ट मिळवत आहात, नाव चुकीचं भरल्यामुळे किंवा नाव नवीन नियमानुसार न भरल्यामुळे तुमच्या कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. सर्वप्रथम खात्री करून घ्या नाव कसं लिहायचं मगच अर्ज लिहा किंवा माहिती भरा.
शासन निर्णय जी आर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मंत्री मंडळ निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ही माहिती सर्वांसाठी उपयुक्त आहे. आपल्या संपर्कातील लोकांना जास्ती असं फॉरवर्ड करा.