Post Office PLI Scheme | पोस्ट ऑफिस PLI विमा योजना

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0
 
Post Office is recognized as the oldest insurance service in India. Post office has been providing continuous service for the past 140 years. This service was started on 01st February 1884. “Postal Life Insurance” is known as PLI. Total 6 plans are available under PLI service. The names of those schemes are as follows.

Post Office PLI scheme details in Marathi

पोस्ट ऑफिस "विमा पॉलिसीचा" १४० वर्षाचा इतिहास 

Post Office PLI Scheme details in Marathi
Post Office PLI Scheme details in Marathi



भारतातील सर्वात जुनी विमा सेवा म्हणून Post Office ची ओळख आहे. Post office हि सेवा गेल्या १४० वर्षापासून निरंतर देत आहे. PLI सेवा ०१ फेब्रुवारी १८८४ रोजी चालू करण्यात आली होती. पोस्टल लाईफ इन्शुरन्स ( Postal Life Insurance ) म्हणजेच PLI या नावाने ओळखली जाते. PLI हि योजना चालू झाली तेव्हा फक्त दो आकडी संख्यामध्ये पॉलिसी धारक होते. आता हा आकडा जवळपास 50 लाखांपेक्षा जास्त आहे. PLI सेवेअंतर्गत एकूण ६ योजना उपलब्ध आहेत. त्या कोण कोणत्या योजना आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. 


Post Office PLI scheme details in Marathi

1.    Whole Life Assurance (Suraksha) - संपूर्ण जीवन हमी (सुरक्षा)

2.    Convertible Whole Life Assurance (Suvidha) -
परिवर्तनीय संपूर्ण जीवन विमा (सुविधा)

3.    Endowment Assurance (Santosh) -
एंडॉवमेंट ॲश्युरन्स (संतोष)

4.    Joint Life Assurance (Yugal Suraksha) -
संयुक्त जीवन विमा (युगल सुरक्षा)

5.    Anticipated Endowment Assurance (Sumangal) -
अपेक्षित एंडॉवमेंट ॲश्युरन्स (सुमंगल)

6.    Children Policy (Bal Jeevan Beema) -
मुलांचे धोरण (बाल जीवन विमा)

Post Office PLI scheme details in Marathi

उपरोक्त विमा योजनांचा लाभ कोण कोण घेवू शकतो त्याबद्दल जाणून घ्या.


  • सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी
  • बँकिंग क्षेत्रातील सर्व कर्मचारी 
  • व्यावसायिक (उदा. डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, शिक्षक इत्यादी.)
  • खाजगी कंपनीमधील कर्मचारी (ज्या कंपन्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) / बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये सूचीबद्ध आहेत) 
  • सरकारी कार्यालयामध्ये नोकरी करत आहेत परंतु कंत्राटी पद्धतीने वेतन मिळत आहे अशा सर्व कर्मचार्यांना लाभ घेता येणार आहे. 
Post Office PLI scheme details in Marathi

(टीप – ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांन साठी “ग्रामीण पोस्टल जीवन विमा” (Rural Postal Life Insurance)  म्हणजेच RPLI पॉलिसी हि एक वेगळी योजना आहे. RPLI या योजनेमध्ये मध्ये PLI प्रमाणेच जवळपास सर्व लाभ भेटतात. RPLI योजनेबद्दल अधिक माहिती पुढील लेखात पहा.) 

  • सुरक्षित गुंतवणूक
  • हमी परतावा 
  • बोनस
  • भारत सरकारचा उपक्रम
  • आयकर मध्ये सवलत
  • इतर विमा प्रदात्यांच्या तुलनेत, PLI प्रदाते सर्वात कमी प्रीमियमसह सर्वाधिक परतावा (बोनस) देते.
  • तुमची पॉलिसी एका योजनेतून दुसऱ्या योजनेत ट्रान्स्फर करू शकता.
  • तुमची पॉलिसी एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्स्फर करण्याची सुविधा.
  • नियमानुसार जर वेळेच्या अगोदर नोकरी सोडली असेल किवा निवृत्ती घेतली असली तरी पॉलिसी चालू ठेवू शकता.
  • काही कारणास्तव तुमची पॉलिसी बंद पडली असेल तर पुन्हा चालू करू शकता.
  • पॉलिसी बॉंड हरवला असेल तर पुन्हा नवीन मिळतो.
  • पॉलिसी वर कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
  • गरज पडल्यास तुमचा वारस बदलू शकता.
  • पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास त्याचा वारसाला सर्व मोबदला दिला जातो.
  • काही कारणामुळे वेळे अगोदर पॉलिसी बंद करण्याची सुविधा.
  • पॉलिसीचा हफ्ता भरण्यासाठी उपलब्ध पर्याय दर महिना, दर तीन महिना, दर सहा महिने किंवा दर वर्षी भरू शकता. (वार्षिक हफ्ता हा पर्याय निवडला तर अधिक परतावा मिळतो)
Post Office PLI scheme details in Marathi


लागणारी कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जिथे नोकरी करत आहात तेथील पुरावा म्हणून पगाराची स्लीप, ऑफर लेटर, जॉइनिंग लेटर या पैकी कोणतेही एक.  
Post Office PLI scheme details in Marathi

काही दिवसापूर्वी LIC चे खाजगीकरणामुळे लोकांचा अविश्वास निर्माण झाला होता. परंतु ज्या लोकांना Post office च्या PLI योजनेबादल माहिती आहे. अशा लोकांनी Post office च्या PLI योजनेमध्ये कोणतीही भीती न बाळगता गुंतवणूक करत आहेत. तुम्ही पण PLI या योजनेमध्ये कोणतीही भीती न बाळगता गुंतवणूक करू शकता. 

Post Office PLI scheme details in Marathi

वरील दिलेल्या योजनांमध्ये तुम्ही कमीत कमी २० हजार रुपयांची पॉलिसी खरेदी करू शकता. आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी करू शकता. 

या लेखा मध्ये आपण “Whole Life Assurance (Suraksha) - संपूर्ण जीवन हमी (सुरक्षा)” या  पॉलिसीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जसे कि वय मर्यादा, बोनस, नियम आणि अटी, वयानुसार EMI किती असेल, पॉलिसी बंद झाली तर, बंद झालेली पॉलिसी चालू कशी करायची, maturity आणि बोनस मिळून किती रक्कम भेटणार इत्यादी.

Post Office PLI scheme details in Marathi

Whole Life Assurance (Suraksha) - संपूर्ण जीवन हमी (सुरक्षा)

  • पॉलिसी धारण करणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी १९ वर्ष असावे आणि जास्तीत जास्त ५५ वर्ष असावे.
  • पॉलिसी कमीत कमी ५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी खरेदी करू शकता.
  • कमीत कमी 20 हजार आणि जास्तीत जास्त ५० लाखाची पॉलिसी खरेदी करू शकता.
  • पॉलिसीला ४ वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्ज घेण्यास पात्र.
  • काही कारणास्तव पॉलिसी बंद करायची असल्यास ३ वर्ष पूर्ण झाल्या नंतरच बंद करू शकता.
  • तुम्ही जर पॉलिसी ५ वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर बंद करणार असाल तर बोनस मिळणार नाही.
  • प्रीमियम भरण्याचे वय ५५, ५८ किंवा ६० वर्षे म्हणून निवडू शकता.
  • वयाच्या ५९ वर्ष पर्यंत तुमची पॉलिसी एका योजनेतून दुसऱ्या योजनेत हस्तांतरित करू शकता. परंतु तुमच्या पॉलिसीची maturity पूर्ण होण्यास १ वर्ष बाकी असेल तर तसे करता येणार नाही. 
  • जर तुम्ही पॉलिसी काही कारणास्तव ५ वर्षानंतर बंद करणार असाल तर ठराविक प्रमाणात बोनस दिला जातो. 
  • पोस्ट ऑफिस च्या Official वेबसाईट वर भेटलेल्या माहितीनुसार, शेवटचा घोषित बोनस हा ७६/- रुपये प्रती १०००/- रुपयांवर प्रती वर्षी देण्यात आला होता. ७६/- दिलेला बोनसचा हा आकडा फिक्स नसून तो दर वर्षी वेगळा असू शकतो. दर वर्षी दिल्या जाणाऱ्या बोनसची सरासरी हि ५२/- ते ७६/- रुपये या दरम्यान आहे.

Post Office PLI scheme details in Marathi

खालील प्रमाणे तुम्ही पाहू शकता आपल्याला या पॉलिसीच्या माध्यमातून कसा आणि किती फायदा भेटणार आहे. हि माहिती एक उदाहरण म्हणून देण्यात आहे. तुमचे वय, पॉलिसी टर्म, आणि पॉलिसी किती रुपयांची घेत आहात त्यावर अवलंबून आहे. खालील दिलेल्या माहिती नुसार तुम्हाला एक अंदाज येईल कि पोस्ट ऑफिस च्या पॉलिसी मध्ये किती आणि कसा फायदा आहे. 

Post Office PLI scheme details in Marathi


  • पॉलिसी घेताना व्यक्तीचे वय २५ वर्ष
  • वयाच्या ५८ वर्षापर्यंत हफ्ता भरायचा आहे.
  • म्हणजे सन २०५७ या वर्षापर्यंत भरायचा आहे.
  • Maturity वय ८० वर्ष.
  • दहा लाखाची पॉलिसी. 
  • दर महिना हफ्ता १७५०/ रुपये.
  • एकूण हफ्ते ३८४ 
  • एकूण भरली जाणारी रक्कम ६,७२,०००/- रुपये. (सहा लाख बहात्तर हजार रुपये फक्त)
  • बोनस म्हणून मिळणारी रक्कम २४,३२,०००/- रुपये (चोवीस लाख बत्तीस हजार रुपये फक्त)
  • विमा रक्कम १०,०००,००/- रुपये (दहा लाख रुपये फक्त)
  • एकूण मिळणारी रक्कम ३४,३२,०००/- (चौतीस लाख बत्तीस हजार रुपये फक्त)
  • म्हणजे बोनस म्हणून तुम्हाला सरासरी ७०% परतावा भेटतो. 
  • जर तुम्ही वार्षिक हफ्ता ठेवला तर यापेक्षा अधिक परतावा मिळतो.

Post Office PLI scheme details in Marathi

टीप – वर दिलेली माहिती हि तुमचे वय, तुम्ही किती रुपयांची पॉलिसी घेत आहात, आणि किती वर्षासाठी घेत आहात त्यावर अवलंबून आहे. तुम्हाला मिळणारा लाभ हा वयानुसार आणि पॉलिसी किती रुपयाची घेत आहात त्यावर अवलंबून असेल. 

Post Office PLI scheme details in Marathi

तुम्हाला पॉलिसी काढायची असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिस ला भेट द्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या पॉलिसीवर येणारा हफ्ता, मिळणारा लाभ याबद्दल अचूक माहिती भेटेल.

माहिती आवडल्या नक्कीच आपले नातेवाईक आणि मित्र मंडळी यांना share करा. 

पुढील लेखात "Convertible Whole Life Assurance (Suvidha) - परिवर्तनीय संपूर्ण जीवन विमा (सुविधा)" या पॉलिसी बद्दल जाणून घेणार आहोत. 

हे पण वाचा 





Post Office PLI scheme details in Marathi

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!