राज्यातील सर्व जेष्ठ नागरिकांना मिळणार दर महिना १५००/- रुपये
Senior citizen pension scheme in Marathi |
- आज ग्रामीण भागातील सर्वसामान्य वृद्ध नागरिक एकाकी जीवन जगताना दिसत आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होवून स्वतंत्र कुटुंब पद्धती अस्तितवात आली आहे. आज घडीला खेडोपाड्यातील नवतरुण उच्च शिक्षण घेण्यासोबत नोकरी निमित्त एका शहरातून दुसऱ्या शहरात सहज स्थलांतर करताना दिसत आहे. परंतु या धावपळीच्या जीवनात ठराविक नवयुवकांना आपल्या वृद्ध आई वडिलांचा विसर पडत चालला आहे किंवा दुर्लक्ष होताना दिसत आहे.
- दिवसेन दिवस आज ग्रामीण भागात वृद्ध नागरिक संघर्षाचे जीवन जगताना दिसत आहे किंवा स्वतंत्र कुटुंब पद्धती मुळे ग्रामीण भागातील अनेक घरं हि ओसाड पडली आहेत. म्हणजे टाळेबंद घरं दिसत आहेत.
- ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व वर्गातील वृद्ध नागरिक आणि निराधारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून खालील नमूद केलेल्या योजना गेल्या अनेक वर्षापासून एकत्रितरित्या राबवण्यात येत आहेत. या योजने अंतर्गत आतापर्यंत लाखो वृद्ध व निराधार नागरिकांना याचा लाभ भेटला आहे. वेळो वेळी या योजनेमध्ये बदल सुद्धा पाहायला मिळाला आहे. जसे कि सुरुवातीला या योजनांच्या अंतर्गत केंद्र शासनाकडून दर महिना २०० रुपये आणि राज्य सरकारकडून दर महिना ४०० रुपये असे दर महिना एकूण ६०० रुपये लाभार्थ्यांना भेटत होते. नंतर या योजनेत २०१९ मध्ये बदल होवून ६०० रुपये ऐवजी एकूण १००० रुपये भेटत होते.
समन्धित योजनांचा सुधारित आणि नवीन जी आर नुसार ०५ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र सरकारने या अनुदानामध्ये ५०० रुपयांची वाढ करत १००० ऐवजी दर महिना १५०० रुपये देण्याचे घोषित केले आहे.
योजनांची नावे आणि त्यांचा प्रकार.
अ न. |
योजनांची नावे |
योजनेचा प्रकार |
१ |
संजय गांधी निराधार अनुदान योजना |
राज्य पुरस्कृत योजना |
२ |
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना |
राज्य पुरस्कृत योजना |
३ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ
निवृत्तीवेतन योजना |
केद्र पुरस्कृत योजना |
४ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन
योजना |
केद्र पुरस्कृत योजना |
५ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन
योजना. |
केद्र पुरस्कृत योजना |
उपरोक्त दिलेल्या एकूण ५ योजना मध्ये वेग वेगळ्या वर्गाचा समावेश आहे (उदा. अपंग, विधवा, जेष्ठ नागरिक, निराधार नागरिक ज्यांना कुटुंबा मध्ये कोणाचा आधार नाही इत्यादी) खालील मजकुरामध्ये प्रत्येक योजनांच्या नियम, अटी आणि पात्रता बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार आपण पाहू शकता तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहात.
योजनांची नावे व दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप.
अ न. |
योजनांची नावे |
दर महिना मिळणारे निवृत्तीवेतन |
१ |
संजय गांधी निराधार अनुदान योजना |
दर महिना प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रुपये १५००/- दिले जाते. |
२ |
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना |
|
३ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन
योजना |
|
४ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन
योजना |
|
५ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन
योजना. |
Senior citizen pension scheme in Marathi | जेष्ठ नागरिक पेंशन योजना महाराष्ट्र
योजनांची नावे व अर्ज करण्याची पद्धत
अ न. |
योजनांची नावे |
अर्ज कसा करायचा |
१ |
संजय गांधी निराधार अनुदान योजना |
अर्जदार तहसीलदार व तलाठी कार्यालय येथे अर्ज करू शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. किवा या वेबसाईट ला भेट द्या. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ |
२ |
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना |
|
३ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ
निवृत्तीवेतन योजना |
|
४ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन
योजना |
|
५ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन
योजना. |
अर्ज कसा करायचा
उपरोक्त दिलेल्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचं असेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला तर अधिक सोयीस्कर ठरेल. म्हणजेच तहसीलदार आणि तलाठी यांचा मार्फत अर्ज सदर केला तर सुधारित आणि नवीन नियमानुसार अर्ज व्यवस्थित भरला जाईल. कारण या योजना अंतर्गत बऱ्याच वेळा नियम, अटी आणि पात्रते बद्दल होत असतात.
आपण जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला आणि काही चुकीचे झाले तर तुम्हाला पुन्हा अर्ज सादर करावा लागेल आणि या प्रक्रीये मध्ये तुमचा वेळ वाया जाईलच आणि विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागेल.
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.
योजनांची नावे आणि लागणारी कागदपत्रे
अ न. |
योजनांची नावे |
कागदपत्रे |
१ |
संजय गांधी निराधार अनुदान योजना |
वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र, असमर्थेचा/रोगाचा दाखला, कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी किंवा निवस्ग्रहाचा अंतरवासी नसल्या बाबत चा दाखला, अनाथ असल्याचा दाखला. |
२ |
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना |
वयाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव, रहिवाशी दाखला, |
३ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ
निवृत्तीवेतन योजना |
|
४ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना |
|
५ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन
योजना. |
उपरोक्त लेखा मध्ये पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. पात्र
उमेदवारांनी संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घेणे आणि अधिक माहितीसाठी गावकामगार
तलाठी आणि तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा.
योजनांची नावे व योजनांच्या प्रमुख अटी व नियम
अ न. |
योजनांची नावे |
नियम आणि अट |
१ |
संजय गांधी
निराधार अनुदान योजना |
या योजनेतंर्गत ६५ वर्षाखालील निराधार
पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग
यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या
महिला, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या
महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५
वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या
कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या
योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१०००/-
पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. (दारिद्र रेषेखाली नाव नसेल
तरी चालेल पण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये २१०००/- पेक्षा जास्त नसलेला
पुरावा) लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधून रु.१५००/- प्रतिमहा
निवृत्तीवेतन मिळते. |
२ |
श्रावणबाळ सेवा
राज्य निवृत्तीवेतन योजना |
६५ वर्षावरील पुरुष व महिला,
या योजनेसाठी दारीद्रय रेषेखालील
कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१०००/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न
असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून रु.१५००/- प्रतिमहा
निवृत्तीवेतन मिळते. |
३ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ
निवृत्तीवेतन योजना |
दारिद्रय रेषेखालील ६५ व ६५
वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील. या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.२००/- प्रतिमहा प्रति
लाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून रु.१३००/- प्रतिमहा
निवृत्तीवेतन मिळते. यामुळे या लाभार्थ्यांना
राज्य शासनाकडून रुपये १३००/-प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रुपये २००/- प्रतिमहा
असे एकूण रुपये १५००/-प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन
मिळते. |
४ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन
योजना |
दारिद्र्य रेषेखालील
कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या ४० ते ६५ वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी
राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात.
पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.३००/- प्रतीमहा व
राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत रु.१२००/- प्रतीमहा असे एकूण रु.१५००/- प्रतीमहा
निवृत्तीवेतन मिळते. |
५ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन
योजना. |
दारिद्र्य रेषेखालील
कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अपंग लाभार्थ्यांपैकी फक्त १८ ते ६५ वर्षाखालील वयोगटातील ८०% हून जास्त अपंग
असलेले किंवा एक किंवा एका पेक्षा जास्त अपंग असलेले किंवा बहू अपंग असलेले (दोन
किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असलेल) लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन
योजनेंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात. पात्र लाभार्थ्यांना केंद्र
शासनाकडून रु.३००/- प्रतीमहा व राज्य शासनाकडून संजय गांधी
निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.१२००/- प्रतीमहा असे एकूण
रु.१५००/- प्रतीमहा निवृत्तीवेतन मिळते. |
नवयुवक तरुणांना विनंती.
उपरोक्त दिलेल्या योजना ह्या जे नागरिक वयोवृद्ध, अपंग, विधवा महिला
आणि आजारग्रस्त यांच्या साठी आहेत. या वर्गातील बहुतेक लोकं निरक्षर आणि शारीरिक
कमजोर असतील अशा लोकांना आपण सहकार्य करून त्यांना लाभ देण्याचे काम केले तर अशा
लोकांचे जीवन सार्थकी लागेल.
आजच्या डिजिटल युगात या योजनांची माहिती पात्र असलेल्या लोकान पर्यंत
पोहचत नाहीत. अशा नागरिकांना या योजनान बद्दल माहिती द्या आणि दिन दुबळ्यांचे जीवन
सार्थकी लावा. आपण एखाद्याची मदत केली तर त्याचे एक वेगळेच समाधान भेटेल आणि एक
समाजसेवक म्हणून एक वेगळाच आनंद भेटेल.
माहिती आवडल्यास गरजू लोकांना फोरवर्ड करा.
Senior citizen pension scheme in Marathi | जेष्ठ नागरिक पेंशन योजना महाराष्ट्र
हे पण वाचा
मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये | लेक लाडकी योजना
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपुर डिविजन मध्ये अप्रेंटिस भर्ती