लग्न झाले नसले तरी जोडीदाराला देखभाल खर्च मिळणार.
मध्य प्रदेश मध्ये एक जोडपं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र रहात होते. त्यांना एक मुल पण आहे, बरेच वर्ष एकत्र राहिल्या नंतर, दोघांच्या मध्ये काही दिवसापासून वाद सुरु होते, दिवसेन दिवस परिस्थिती बिघडत चालल्या नंतर महिलेने वेगळे रहाण्याचा निर्णय घेतला. आणि आपल्या जोडीदाराकडे मुलाचे देखभालीसाठी दर महिना ठराविक रक्कम ध्यावी लागेल अशी मागणी केली. जोडीदाराने हि मागणी अमान्य करत विरोध दर्शवला. तद्नंतर महिलेने जिल्हा न्यायालयात धाव घेत पोटगी साठी दावा दाखल केला.
live in Relationship law and allowance in Marathi | Now "live in relationship" will get alimony
महिलेच्या बाजूने जिल्हा न्यायालयाचा निर्णय.
तिची हि मागणी योग्य असल्याचे सांगत बालाघाट जिल्हा न्यायालयाने पिडीत महिलेस पोटगी ध्यावी लागेल असा आदेश तिच्या जोडीदाराला देण्यात आला. या निकालाच्या विरोधात त्याने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये
live in Relationship law and allowance in Marathi | Now "live in relationship" will get alimony
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय.
न्या. जे. एस. अहलुवालिया यांच्या एकालपिठाने जोडीदाराची याचिका फेटाळून लावली आहे. आणि जिल्हा न्यायालयाचे आदेश कायम ठेवले आहेत. जिल्हा न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. पिडीत महिलेची मागणी योग्य आहे आणि पोटगी साठी पात्र आहे, असा निर्वाळा उच्च नायायालयाने दिला आहे.
बालाघाट जिल्हा न्यायालयाने या महिलेस पोटगी देण्याचे आदेश तिच्या जोडीदाराला दिले होते. या निकालाच्या विरोधात त्याने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दाद मागितली होती. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेस पोटगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये रहात असताना, लग्न झाले नसेल तरी विभक्त झाल्या नंतर महिलेला देखभाल खर्च द्यावा लागेल, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
live in Relationship law and allowance in Marathi | Now "live in relationship" will get alimony
पिडीत महिलेस दर महिना पोटगी म्हणून १५०० रुपये देण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने तिच्या जोडीदारास दिले आहेत.
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.
live in Relationship law and allowance in Marathi | Now "live in relationship" will get alimony
ई श्रम कार्ड कसे काढायचे | ई श्रम कार्ड चे फायदे मराठी
नाते कोणतेही असो त्यामागील भावना महत्वाच्या.
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या लोकांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका अर्थी एक संदेश देण्याचे काम केले आहे. जे लोकं अशा नात्यात राहतात त्यांना एकमेकांचा आदर करणे गरजेच आहे. आपली संस्कृती आणि माणुसकीचे भान राखायला हवे. एकमेकांच्या भावनाची कदर करायला पाहिजे. मतभेद तर होत राहतात परंतु कोणाच्या भावना आणि आयुष्य्शी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही.
live in Relationship law and allowance in Marathi | Now "live in relationship" will get alimony
हे पण वाचा
ई श्रम कार्ड कसे काढायचे | ई श्रम कार्ड चे फायदे मराठी
मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपुर डिविजन मध्ये अप्रेंटिस भर्ती