HSC Result 2024 Maharashtra Board | बारावीचा निकाल जाहीर, लाडक्या लेकींची यंदाही बाजी

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

 राज्यात कोकण आघाडीवर  .....मुंबई पिछाडीवर

HSC Result 2024 Maharashtra : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा यंदाचा निकाल जाहीर केला आहे. यंदाचा बारावीचा निकाल गेल्या वर्षाच्या तुलनेत टक्का वाढल्याचे पाहायला मिळाले.  ( २०२३  इयत्ता बारावीचा निकाल ९१.२५ इतका होता ) राज्याचा बारावीचा निकाल  ९३.३७  इतका लागला आहे. गेल्या वर्षी २०२३ च्या तुलनेत निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाल्याची पाहायला मिळाले आहे. 

HSC Result 2024 Maharashtra Board
HSC Result 2024 Maharashtra Board



HSC Result 2024 Maharashtra : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेमध्ये एकूण  १३ लाख २९ हजार ६६८  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे माणिक बांगर व अनुराधा ओंक, इत्यादी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती. यंदाच्या परीक्षा एकूण ३२४४ केंद्रावर झाल्या, यंदाची बोर्डाची परीक्षा देण्यासाठी १४३३३७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गेल्या सहा वर्षाच्या तुलनेत बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी या वर्षी झाली. 


यंदाच्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची वैशिष्टे 

या परीक्षस राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसाय अभ्यासक्रम या शाखेतील एकूण १४  लाख ३३  हजार ३७१  नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी १४२३९७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या. त्यापैकी १३२९६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालाची टक्केवारी ९३.३७ इतकी आहे. 


विभागनिहाय टक्केवारी 

कोकण ९७.५१ टक्के

नाशिक ९४.७१ टक्के

पुणे ९४.४४ टक्के

कोल्हापूर ९४.२४ टक्के

छत्रपती संभाजी नगर ९४.०८

अमरावती ९३.०० टक्के

लातूर ९२.३६ टक्के

नागपूर ९२.१२ टक्के

मुंबई ९१.९५ टक्के


दर वर्षी प्रमाणे यंदाही मुलीनी बाजी मारली आहे. 

राज्यात मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९५.४४ इतकी आहे. तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९१.६० इतकी आहे. 

दर वर्षीप्रमाणे राज्यात कोकण विभागाचा सर्वात जास्त ९७.९१ निकाल लागला आहे. 


यंदाच्या परीक्षेत ९ विभागीय मंडळातून सर्व शाखामधून एकूण ४५  हजार ४४८ विद्यार्थ्यांनी रिपिटर परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५०८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या. त्यापैकी २२४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकालाची टक्केवारी ४९.८२ इतकी आहे. 


यंदाच्या परीक्षेत खाजगी विद्यार्थी म्हणून ४१३६२ नोंदणी झाली. त्यापैकी ४०७९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या. त्यातून ३४९३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी ८५.७६ इतकी आहे. 


यंदाच्या बारावीच्या परीक्षेत राज्यातील ९ विभागातून ७०३२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ६९८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६५८१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९४.20 इतकी आहे. 

राज्यात ८७८२ मुलं ९० किवा त्यापेक्षा जास्त  टक्केवारीने उत्तीर्ण झाले आहेत. 

छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद ) मधील वाणिज्य विभागातील एका मुलीने १०० टक्के गुण मिळवले आहेत. थोड्याच वेळात प्रसिद्ध होणाऱ्या निकालामध्ये नाव जाहीर होईल. 


निकाल पाहण्यासाठी खालील संकेत स्थळांना भेट द्या.

maharesult.nic.in

http://hscresult.mkcl.org

www.mahasscboard.in

https://results.digilocker.gov.in

www.tv9marathi.com

http://results.targetpublications.org




WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!