राज्यात इयत्ता दहावीचा निकाल ९५.८१ % टक्के असा लागला आहे. थोड्याच वेळात शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आपले मार्क्स / निकाल पाहता येणार आहेत.
Maharashtra SSC Result 2024 |
इयत्ता दहावीचा निकाल मुलींचे वर्चस्व कायम
Maharashtra SSC Result 2024 : राज्यात मुलींचा निकाल ९७.२१ टक्के इतका लागला आहे. मुलांचा निकाल हा 94.56% इतका लागला आहे. म्हणजेच मुलांच्या तुलनेत मुलींच्या निकालाची टक्केवारी 2.65% इतकी जास्त आहे.
राज्यातील 23 हजार 288 माध्यमिक शाळांपैकी, राज्यात तब्बल 9382 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल 99.01 टक्के लागला असून सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा 94.73% टक्के लागला आहे. इयत्ता बारावी प्रमाणे इयत्ता दहावी मध्ये ही दरवर्षीप्रमाणे मुलींचे वर्चस्व कायम राहिले आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंतची परंपरा आहे, दहावीचा निकाल हा नेहमीच जून मध्ये जाहीर झाला आहे. मात्र यंदा दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे.
राज्याचा निकाल ९५.८१ %
Maharashtra SSC Result 2024 : इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, पुणे,नागपूर, लातूर,नाशिक, अमरावती आणि कोकण अशा नव विभागातील मंडळातून 15 लाख 60 हजार 154 विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी पंधरा लाख 49 हजार 326 विद्यार्थी परीक्षेसाठी उपलब्ध होते. त्यातील 14 लाख 84 हजार 441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाचा राज्याचा निकाल 95.81% एवढा लागला आहे. दरवर्षीच्या तुम्ही यंदा निकालाचा टक्का वाढल्याचे पाहायला मिळाले.
72 विषया पैकी 18 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
रिपिटर विद्यार्थी निकाल ५१.१६ टक्के
राज्यातील 9 विभागीय मंडळातून एकूण 25 हजार 770 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षार्थीसाठी नोंदणी केली होती, त्यातील 25 हजार 327 विद्यार्थी परीक्षेस हजर झाले होते, त्यापैकी 12958 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची निकालाची टक्केवारी 51.16% इतकी आहे.
दिव्यांग निकाल ९३.२५ %
राज्यातील 9 विभागीय मंडळातून 9149 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 9078 दिव्यांग व्यक्ती परीक्षेसाठी हजर होते. त्यातील 8465 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी 93.25% इतकी आहे.
विभागीय मंडळ यांचा टक्केवारी नुसार अनुक्रमे निकाल.
प्रथम क्रमांक कोकण विभाग 99.01%
द्वितीय क्रमांक कोल्हापूर विभाग 97.45%.
तृतीय क्रमांक पुणे विभाग 96.44%
चौथा क्रमांक मुंबई विभाग 95.83%
पाचवा क्रमांक अमरावती विभाग 95.58%
सहावा क्रमांक नाशिक विभाग 95.28%.
सातवा क्रमांक लातूर विभाग 95.27%
आठवा क्रमांक छत्रपती संभाजी नगर 95.19%
नववा क्रमांक नागपूर विभाग 94.73%
खालील संकेत स्थळावर आपला निकाल तपासा.
https://mahresult.nic.in
https://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org
https://www.tv9marathi.com