निकाल कधी लागणार याची उत्सुकता संपली
SSC Result 2024 Maharashtra : इयत्ता १२ वी चा निकाल गेल्या २१ तारखेला जाहीर झाल्या नंतर पालक आणि विद्यार्थ्यान मध्ये उत्सुकता होती ती म्हणजे इयत्ता १० वी चा निकाल कधी लागणार. करीयरच्या दृष्टीने दहावीचे वर्ष खूप महत्वाचे असते. दहावी मध्ये मिळालेल्या टक्केवारीच्या आधारावर वियार्थ्यांची करीयरच्या दृष्टीने पुढील वाटचाल अवलंबून असते.
SSC Result 2024 Maharashtra : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार खालील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर आज सोमवार दिनांक २७.०५.२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.
खालील संकेतस्थळावर निकाल पहा
https://mahresult.nic.in
https://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org
https://www.tv9marathi.com
निकाला बाबत अन्य माहिती खालील प्रमाणे..
ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विषया मध्ये मिळालेल्या गुणांन बद्दल काही शंका असल्यास गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मुल्याकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावरून (http:verification.mh-ssc.ac.in ) स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. या साठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. गुण पडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार, दिनांक २८.०५.२०२४ ते मंगळवार दिनांक ११.०६.२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. त्याचसोबत ऑनलाईन पद्धतीने शुल्क Debit Card / Credit Card / UPI / Net Banking या द्वारे भरता येईल.
मार्च २०२४ परीक्षा उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तर पत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसाच्या आत अर्ज करणे आवशयक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास त्यांनी सविस्तर माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क करावा.
मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांमध्ये संतुष्टी नसेल तर (श्रेणी / गुणसुधार ) योजने अंतर्गत अशा विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी ( जुलै - ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ ) उपलब्ध असतील.
जुलै - ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक ३१.०५.२०२४ पासून मंडळाच्या वेब साईट वरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहे. या बद्दलची अधिक माहितीची सूचना जाहीर करण्यात येईल.
हे पण वाचा : दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी महत्वाची कागदपत्रे तयार ठेवा.