मोफत पुस्तके इयत्ता ११ वी ते १५ वी
Free books class 11th to 15th : मुंबई दादर प्रभादेवी येथील प्रसिद्ध देवस्थान श्री सिद्धिविनायक मंदिर संस्थेतर्फे इयत्ता अकरावी ते पंधरावी विद्यार्थ्यांना मोफत मध्ये पुस्तके वाटप करण्यात येणार आहे.
Free books class 11th to 15th |
प्रभादेवी येथील अत्यंत लोकप्रिय आणि जागृत देवस्थान म्हणून सिद्धिविनायकाची ख्याती आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी जगभरातून आणि देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.
दर महिन्याला येणारी संकष्टी चतुर्दशी या दिवशी तर भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असते म्हणजे इतर दिवसांच्या तुलनेत चार ते पाच पटीने भावीक या दिवशी दर्शनासाठी आलेले पाहायला मिळतात. गणेश चतुर्थी आणि आनंद चतुर्थी या दिवसांमध्ये तर अक्षरशः जत्रेचं स्वरूप येतं.
सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या कडून बाप्पांच्या चरणी जे दान अर्पण केले जाते त्यातून सिद्धिविनायक मंदिर संस्थेकडून समाजातील विविध गरजू लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली जाते.
गोरगरीब जनतेच्या उपचाराचा खर्च, गोरगरिबांच्या मुलांच्या शाळेचा पुस्तकाचा खर्च उचलला जातो, वृद्ध महिला आणि पुरुष तसेच विधवा महिला अशा अनेक प्रकारच्या लोकांना ही संस्था वेगवेगळे आणि वेळोवेळी उपक्रम राबवत असते.
बाप्पाच्या चरणी भक्तांकडून जमा होणाऱ्या दानाचा योग्य असा उपयोग या संस्थेकडून योग्यरित्या केला जातो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे.
Free books class 11th to 15th : सध्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. शैक्षणिक नवीन प्रवेश प्रक्रियेसाठी दरवर्षीप्रमाणे जूनमध्ये सुरुवात होत असते. त्यासाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने सढळ हाताने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक पुस्तक वाटण्याचं काम हाती घेतले आहे. ही शैक्षणिक पुस्तक इयत्ता अकरावी ते पंधरा वी विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यात येणार आहेत.
पुस्तके मिळवण्यासाठी लागणारी खालील कागदपत्र.
- आधार कार्ड
- केशरी शिधापत्रक (Orange Ration Card)
- मार्कशीट
- ऍडमिशन फी पावती (Admission Receipt)
पुस्तके मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा.
तुम्हाला सिद्धिविनायक च्या ऑफिसियल वेबसाईट siddhivinayak.org ला भेट द्यायची आहे.
त्यानंतर फॉर्म अँड टेंडर्स वर क्लिक करायचे आहे त्यानंतर बुक बँक वरती क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर एक फॉर्म पेज ओपन होईल. विचारलेली पूर्ण माहिती भरा आणि सबमिट वरती क्लिक करा.
अधिक माहितीसाठी ई-मेल आयडी bookbank@siddhivinayak.org या ईमेल आयडीवर संपर्क करा.
सूचना : नाव नोंदणी केल्यानंतर पुस्तके घ्यायला जाते वेळी वर सांगितलेली सर्व ओरिजनल कागदपत्र सोबत घेऊन जायचं आहे.
Free books class 11th to 15th : मित्रांनो ही माहिती जर तुमच्या कामाची नसेल तर आपल्या संपर्कातील अशा विद्यार्थ्यांना पाठवा ज्यांच्याकडे बीपीएल कार्ड म्हणजेच भगव्या कलरचं राशन कार्ड आहे. एक मेसेज फॉरवर्ड करून एखाद्या गरीबाचा भलं झालं तर हे पण एक दानच आहे.
आपल्याकडे असलेल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वरती हा मेसेज फॉरवर्ड करा.
हे पण वाचा :
अपंग दिव्यांग नागरिकांना मिळत आहे १५००/- रुपये पेन्शन.
लग्नासाठी जोडीदार शोधताय ! हि बातमी एकदा वाचाच
राज्य आणि केंद्र सरकार महिलांना दर महिना १५०० रुपये पेन्शन देत आहे.