HSC 12th Result 2024 MAHARASHTRA | १२ वी २०२४ चा निकाल येथे पहा

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0


HSC 12th Result 2024 Maharashtra :  महाराष्ट्र राज्याच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल उद्या मंगळवार दिनांक २१.०५.२०२४ रोजी जाहीर होणार आहे. नागपूर पुणे औरंगाबाद मुंबई कोल्हापूर लातूर नाशिक आणि कोकण या नऊ  विभागाअंतर्गत ही परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षण मंडळामार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना विषय निहाय मिळवलेले गुण मंडळाच्या संकेतस्थळावर बघता येणार आहे.

HSC 12th Result 2024 MAHARASHTRA
HSC 12th Result 2024 MAHARASHTRA


यंदाचा बारावीचा निकाल तुम्हाला ऑनलाईन तसेच एस एम एस द्वारे पाहता येणार आहे.


HSC 12th Result 2024 Maharashtra: बारावीचा निकाल मंगळवार दिनांक २१.०५.२०२४ रोजी  दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या निकालाची उत्सुकता विद्यार्थी तसेच पालकांना लागलेली आहे कारण बारावीचे वर्ष हे करिअरच्या हेतूने पाहिलं तर खूप महत्त्वाचे असते. इयत्ता बारावीच्या निकालावरच विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असते.  म्हणजेच जो विद्यार्थी चांगल्या टक्केवारीने बारावीची परीक्षा उत्तीर्ण करेल त्याला विविध अशा क्षेत्रांमध्ये डिग्री डिप्लोमा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याच्या हेतूने कोर्स करता येतात. जे विद्यार्थी बारावी मध्ये जास्ती जास्त टक्केवारी मिळवतील अशाच विद्यार्थ्यांना मोठमोठ्या नामांकित खाजगी आणि सरकारी कॉलेजमध्ये डिप्लोमा डिग्री करण्याची संधी मिळते.

आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर टक्केवारीच्या बाबतीत नेहमीच मुलींनी बाजी मारली आहे. या वर्षी सुद्धा मुलींची परंपरा कायम राहणार का? हे उद्या जाहीर होणाऱ्या निकालानंतर समजणार आहे.


उद्या HSC बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी महत्वाची कागदपत्रे तयार ठेवा... अधिक माहितीसाठी वाचा

इयत्ता बारावीचा निकाल आणि त्याचे महत्त्व.

  • टक्केवारीच्या बाबतीत यंदा सर्वात जास्त बाजी कोण मारणार? मुलं की मुली!!!
  • इयत्ता बारावी मध्ये राज्याचा निकाल किती टक्के लागणार?
  • कोणत्या जिल्हा टक्केवारीच्या बाबतीत प्रथम क्रमांक पटकावेल ?
  • राज्यात प्रथम येण्याचा मान कोणत्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्याला भेटेल?
  • राज्यात प्रथम येण्याचा मान मुलीला किंवा मुलाला भेटेल?
  • या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आज जाहीर होणाऱ्या निकालामध्ये मिळणार आहे.


तुम्हाला लवकरच बारावीचा निकाल ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने बघता येणार आहे.

कदाचित तुमच्याकडे इंटरनेट नसेल किंवा वेबसाईट वर निकाल पाहण्यास असमर्थ असाल तर SMS द्वारे तुम्हाला निकालाची माहिती मिळणार आहे.


ऑफलाईन निकाल पाहण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा.

  • तुमच्या मोबाईलवर एसएमएस अँप वर जा.
  • क्रिएट न्यू मेसेज वर क्लिक करा.
  • MHHSC स्पेस द्या तुमचा सीट क्रमांक टाका.
  • आणि हा मेसेज 57766 या नंबर वर पाठवा.
  • काही मिनिटातच तुमच्या मोबाईलवर निकालाचा तपशील एसएमएस द्वारे प्राप्त होईल.

ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा.

  • मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. 
  • होम पेजवर Result ( निकाल ) येथे क्लिक करा.
  • Maharashtra HSC board result 2024 ( महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२४ ) वर क्लिक करा.
  • लॉगिन पेजवर तुमचा रोल नंबर टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
  • तुमचा बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट काढा.

निकाल पाहण्यासाठी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईट ला भेट द्या. mahresult.nic.in 

किंवा खालील दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्या. 

http://hscresult.mkcl.org/

http://www.mahahsscboard.in/

https://results.digilocker.gov.in/

http://results.targetpublications.org/


ही माहिती जास्तीत जास्त आपल्या संपर्कातील व्हॉट्सॲप ग्रुप वर, मित्रमंडळ आणि नातेवाईक यांना फॉरवर्ड करा.

हे पण वाचा :



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!