Mahila Yojana 2024 in Maharashtra | महिला योजना महाराष्ट्र २०२४

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

Mahila Yojana 2024 in Maharashtra : राज्यातील विविध असक्षम महिलांना केंद्र आणि राज्य सरकार कडून दर महिना १५००/- रुपये अनुदान दिले जाते. 

Mahila Yojana 2024 in Maharashtra
Mahila Yojana 2024 in Maharashtra


जसे कि विधवा महिला, अपंग महिला, घटस्फोटीत महिला, ३५ वर्ष किंवा त्यावरील अविवाहित महिला, निराधार महिला ज्यांना कोणाचा आधार नाही, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी, शारीरिक छळ अथवा बलात्कारग्रस्त, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेली स्त्री, इत्यादी महिलांना योजनेमधून अनुदान देण्याचे काम गेल्या १५ वर्षापासून केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. या योजनेची माहिती खालील लेखात सविस्तर जाणून घ्या.   


केंद्र सरकार कडून राबवण्यात येत असलेली योजना म्हणजेच "इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना" आणि राज्य सरकार कडून राबवण्यात येत असलेली योजना "संजय गांधी निराधार अनुदान योजना" या दोन्ही योजना संयुक्तरीत्या एकत्रित राबवल्या जातात. या दोन्ही योजनेचा लाभ लाभार्थी महिलांना एकत्र दिला जातो. 

खालील लेखात जाणून घ्या पात्रता, वय मर्यादा, नियम, अटी आणि शर्ती इत्यादी !!!

  • केंद्र सरकार योजनेचे नाव : इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना.
  • राज्य सरकार योजनेचे नाव : संजय गांधी निराधार अनुदान योजना.
  • पेन्शन मिळण्याचा कालावधी : दर महिना.
  • केंद्र सरकार अनुदान : दर महिना ३००/-  रुपये.
  • राज्य सरकार अनुदान : दर महिना १२००/- रुपये. 
  • एकूण अनुदान : केंद्र आणि राज्य सरकारचे एकत्रित अनुदान एकूण १५००/- रुपये प्रती महिना दिले जाते. 
  • वय मर्यादा :  १८ - ६५ वर्ष.
  • आधार कार्ड : लाभार्थी महिला यांचाकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. 
  • रहिवाशी  : किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक. 
  • महिलांचा प्रकार : विधवा महिला, अपंग महिला, घटस्फोटीत महिला, ३५ वर्ष किंवा त्यावरील अविवाहित महिला, निराधार महिला ज्यांना कोणाचा आधार नाही, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी, शारीरिक छळ अथवा बलात्कारग्रस्त महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेली स्त्री, इत्यादी.......
  • कुटुंबाचे उत्पन्न  : (अ)  कुटुंबाचे उत्पन्न २१०००/- पेक्षा जास्त नसावे किंवा लाभार्थी महिलेचे आणि कुटुंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील यादीत समाविष्ट असावे.  (ब ) अपंग मध्ये अस्थिव्यंग, अंध, मुखबधीर, मतीमंद या सर्व प्रवर्गातील अपंगाना या योजनेचा लाभ मिळण्याकरिता त्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न या योजनेत पात्र होण्यासाठी रुपये ५००००/- पर्यंत असावे. 
  • नियम आणि अट : शासनाकडून इतर कोणताही आर्थिक लाभ भेटत असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 
  • अपंगत्व असल्यास : किमान ४०% टक्के अपंगत्व असलेल्या महिला या योजनेखाली लाभ घेण्यास पात्र ठरतील. 
  • अपत्य : या योजनेखाली लाभ मिळवण्यासाठी पात्र असणाऱ्या महिलांना अपत्य संख्येची अट राहणार नाही. 

पात्रतेबद्दल सविस्तर माहिती पहा

१. घटस्फोटीत मुस्लीम समाजातील स्त्रीबाबत तिच्या सासर किंवा माहेरच्या वास्तव्याच्या विभागातील मस्जिद मधील काझी यांनी तहसीलदारा समोर त्या स्त्रीच्या घटस्फोटा संदर्भात तहसीलदारांकडे शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील किंवा गावातील / शहरातील मुस्लीम समाजासाठी धार्मिक कार्य करणारी रजिस्टर संस्था असेल त्या संस्थेने ठराव करून दिल्यास त्यानंतर महिलेला सादर योजनेचा लाभ देण्यात येईल. 

२.  शारीरीक छळवणूक झालेल्या अथवा बलात्कार झालेल्या अत्याचारित स्त्रियांच्या
बाबतीत जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन) व महिला व बाल विकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र  तसेच बलात्कार संबंधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र  घेणे बंधनकारक राहील. 

३. घटस्फोट प्रक्रियेतील स्त्रिया, ज्या पती-पत्नीने कायदेशीर घटस्फोट मिळवण्यासाठी न्यायालायाकडे अर्ज केला आहे, परंतु घटस्फोट मिळण्याची अंतिम कार्यवाही बाकी आहे, अशा कालावधीत पती पासून वेगळ्या राहणाऱ्या स्त्रियांनी रीतसर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत  व पती पासून वेगळी रहात असल्याबद्दलचे संबंधित गावच्या गावकामगार तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तरित्या दिलेले प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. आणि शहरी भागासाठी तलाठी किंवा नगरपालिका / महानगरपालिका कर निरीक्षक यांनी दिलेले प्रमाणपत्र आवश्यक राहील.    

४. घटस्फोट झालेल्या आहे परंतु पोटगी मिळत नाही किंवा या योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळत आहे अशा महिला अनुदान मिळवण्यास पात्र आहेत. घटस्फोट झाल्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत व पोटगीची रक्कम या बाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक / बंधनकारक राहील. 

५. परित्यक्त्या महिलांच्या बाबतीत ज्या महिलेला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी पासून पतीने सोडले आहे किंवा तिला पती नांदवत नाही व यामुळे अशा महिलेस स्वतंत्रपणे किंवा नातेवाईक यांच्याकडे रहावे लागते, अशा महिला पात्र राहतील. याबाबत गावकामगार तलाठी व ग्रामसेवक यांचा संयुक्तरित्या दाखला सादर करणे  आवश्यक राहील. 
शहरी भागामध्ये तलाठी वा नगरपालिका / महानगरपालिका कर निरीक्षक यांनी दिलेले प्रमाणपत्र आवश्यक राहील. 

६. वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिलांच्या बाबतीत, महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे अशा महिलेला वेश्या व्यवसायातून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र व तिला शासनाच्या अन्य योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक / आवशयक आहे. 

७. विधवा महिला, ज्या महिलेच्या पतीचे निधन झाले आहे अशी महिला या योजनेखाली लाभ मिळवण्यास पात्र राहील. पतीचे निधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत / नगरपरिषद / महानगरपालिकेच्या मृत्यू नोंदवहीतील उतारा सादर करणे बंधनकारक / आवश्यक राहील. 


Mahila Yojana 2024 in Maharashtra : लाभार्थी महिलांना लाभ मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

वयाचा दाखला : ग्रामपंचायतीच्या, नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या जन्म नोंद वहीतील उताऱ्याची साक्षांकित प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिकेत अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा ग्रामीण / नागरी रुग्णालयाच्या वैधकीय अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैधकिय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला.  यापैकी कोणताही एक. 

उत्पनाचा दाखला : तहसीलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्र्य रेषेखालील यादी मध्ये त्या व्यक्ती / कुटुंबाचा समावेश असल्या बद्दलचा साक्षांकित उतारा. या पैकी कोणत्याही एका अधिकाऱ्याने दिलेला दाखला.   यापैकी कोणताही एक. 


रहिवाशी दाखला : ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवाशी असल्या बाबतचा दाखला. या पैकी कोणत्याही एका अधिकाऱ्याने दिलेला दाखला.   


अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र : अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, कर्णबधीर, मतीमंद, यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ मधील तरतुदी प्रमाणे जिल्हा शल्याचिकीत्सक (सिव्हील सर्जन) यांचे प्रमाणपत्र. 


स्वयं घोषणापत्र  :  स्वयं घोषणा पत्राचा नमुना देण्यसाठी आणि अर्जाचा नमुना यांची खाली लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून करण्यासाठी लागणाऱ्या सर्व अर्जांची नकळ उपलब्ध आहे. 

 


सरकारी योजना, सरकारी नोकरी आणि शासकीय बँक / LIC / पोस्ट ऑफिसच्या नवनवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी  व्हाट्सअप / टेलिग्राम चैनल ला जॉईन करा.

व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.


अर्ज कसा करायचा    

 Mahila Yojana 2024 in Maharashtra : वर उल्लेख केलेल्या सर्व कागदपत्रांची प्रत्येकी २ झेरॉक्स कॉपी काढून आपल्या परिसरातील किंवा संपर्कातील कोणत्याही शासकीय कर्मचारी यांच्याकडून साक्षांकित ( True Copy ) करून घ्या. 


तुम्हाला दोन अर्ज सादर करायचे आहेत. खालील दिलेल्या नमुना अर्जाच्या २ प्रिंट काढून घ्या आणि विचारलेल्या माहितीनुसार अचूक माहिती भरा. सर्व कागदपत्रांची झेरोक्स जोडा. 


वर सांगितल्या प्रमाणे सर्व कागदपत्रांची झेरॉक्स दोन्ही अर्जांना जोडा. गाव कामगार तलाठी यांच्याकडे अर्ज जमा करून त्याची पोच पावती घ्या. 

 

अर्ज भरण्यास तुम्हाला काही अडचणी येत असतील तर ग्रामसेवक, तलाठी किंवा अंगणवाडी सेविका यांची मदत घेवू शकता.


खालील प्रश्न वारंवार विचारले जातात. 

  • महिला सन्मान बचत योजना 
  • महिला जन धन योजना 
  • महिला व बालकल्याण योजना 
  • महिला बचत गटाचे फायदे 
  • महिला बवासीर के लक्षण
  • महिला सक्षमीकरण
  • महिला आयोग अध्यक्ष महाराष्ट्र 
  • महिला योजना 
  • महिला योजना महाराष्ट्र २०२३
  • महिला योजना उत्तर प्रदेश
  • महिला योजना २०२३
  • महिला योजना राजस्थान
  • महिला योजना क्या है
  • योजना महिला एवं बाल विकास
  • योजना महिला संशक्तिकरण
  • गर्भवती महिला योजना फॉर्म online
  • महिला कर्ज योजना
  • mahila yojana 2024
  • mahila yojana maharashtra
  • mahila yojana scheme
  • mahila yojana post office
  • mahila yojana 2023
  • mahila yojana list
  • mahila yojana pradhanmantri
  • mahila yojana loan
  • mahila yojana 2024 in maharashtra
  • mahila yojana kya hai
  • vidhva mahila
  • vidhva mahila yojana
  • vidhva mahilansathi yojana
  • vidhwa mahila yojana maharashtra
  • vidhwa mahila
  • vidhwa mahilansathi sarkari yojana
  • vidhwa mahila ashram 
  • mahila samman yojana 
  • mahila vikas mandal
  • mahila samman saving certificate 2023
  • mahila helpline number
  • mahila uttan yojana
  • mahila din
  • mahila bachat gat
  • mahila mandal
  • mahila sangh school

शासनाचा जी आर आणि अर्जाचा नमुना आणि स्वयं घोषणा पत्र नमुना इत्यादी माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 


  1. नमुना अर्जासाठी पेज नंबर 20 पहा 
  2. स्वयं घोषणा नमुना पत्रासाठी पेज नंबर ३१ पहा 
  3. हयात नमुना प्रमाण पत्रासाठी पेज नंबर ४६ पहा 
  4. उत्पनाचा दाखला नमुना पत्रासाठी पेज नंबर ४७ पहा. 



Mahila Yojana 2024 in Maharashtra | महिला योजना महाराष्ट्र २०२४ :  
विनंती !!! आपल्या आसपास समाजात हि योजना गरजू महिलांना मिळवून देण्यास किंवा त्यांचापर्यंत हि माहिती पोहचवण्याचे आपले काम आहे. समाजाचे काहीतरी देणेकरी आहे हि भावना जागृत ठेवून कमीत कमी २ महिलांना नक्की मदत करा.  कारण काही महिला अशिक्षित असतील किंवा स्वताहून योजना मिळवण्यासाठी सक्षम नसतील किंवा त्यांच्यासाठी शासन या सर्व योजना चालवत आहे याबद्दल त्यांना माहिती नसेल....इतरही बरीच कारण असू शकतात.

तुमची एक छोटीसी मदत त्या महिलेस जीवन जगण्याचा आधार देवू शकते....पुन्हा एकदा कळकळीची विनंती आपल्या गावातील समाजातील किमान २ महिलांना मदत नक्की करा, आणि त्याचे जीवन सार्थकी लावा.

ज्या व्यक्तीला तुम्ही मदत कराल, ती व्यक्ती तुमचा कळत न कळत गावभर प्रचार करेल, कि या माणसाने माझी मदत केली, आणि यांचामुळेच माझ्या खात्यावर दर महिन्याला १५००/- रुपये येत आहेत. 

हि योजना मिळवून देण्यासाठी तुम्हाला फक्त एक अर्ज भरायचा आहे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे जोडायचे आहेत, आणि तलाठी किंवा तहसीलदार यांचाकडे अर्ज जमा करून त्याची पोच पावती घ्याची आहे. वरील लेखामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. 


हे पण वाचा 

अपंग दिव्यांग पेन्शन योजना महाराष्ट्र


शेतकर्यांना पीएम किसान योजनेचा १७ वा हफ्ता लवकरच मिळणार ! त्याआधी करावे लागणार हे काम?


केंद्र आणि राज्य सरकार कडून जेष्ठ नागरिकांना मिळत आहेत दर महिना १५०० रुपये.  


राज्य सरकार कडून लेक लाडकी योजनातून मुलींना मिळत आहेत १०१०००/- एक लाख एक हजार रुपये. 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!