PM Kisan Yojana 17th Installment – पी एम किसान योजना ई केवायसी अनिवार्य

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

 PM Kisan Yojana 17th Installment : पी एम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दर ४ महिन्यांनी २०००/- रुपयांचा हप्ता दिला जातो. त्यासाठी आता शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे. ई केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेचे सतराव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत.

PM Kisan Yojana 17th Installment
PM Kisan Yojana 17th Installment


In PM Kisan Yojana, farmers are paid an installment of Rs.2000/- every 4 months by the central government. For this, it is now mandatory for farmers to do e KYC. Farmers will get the seventeenth installment of PM Kisan Yojana only after e-KYC.


केंद्र सरकारची सूचना e KYC  करून घ्या... अन्यथा १७ वा हफ्ता मिळणार नाही. 

केंद्र सरकारने अधिसूचना जाहीर करत पीएम किसान योजनेअंतर्गत ज्यांना हप्ता मिळत आहे अशा सर्व शेतकऱ्यांची ई केवायसी करण्यास संबंधित खात्याला सूचना दिल्या आहेत. केंद्र शासनाचा या पाठीमागचा एकच उद्देश आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीला लाभ मिळालाच पाहिजे. तसेच या योजनेअंतर्गत जे लाभ घेत होते परंतु सध्या हयात नाहीत अशा लोकांची नावे या यादीतून कमी होतील. नवीन सातबारा धारक शेतकरी वर्गाला या योजनेचा लाभ घेता येईल हा या पाठीमागचा उद्देश आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत ई केवायसी केल्यानंतर या योजनेमध्ये पारदर्शकता राहील.


The central government has issued a notification and instructed the concerned department to conduct e-KYC of all farmers who are getting installments under PM Kisan Yojana. The central government has only one objective behind this. Every person who is eligible for this scheme should get the benefit. Also names of people who were benefiting under this scheme but are not alive now will be reduced from this list. The aim behind this is that the new Satbara holder farmers can benefit from this scheme. After e KYC under PM Kisan Yojana, there will be transparency in this scheme.


कधी मिळणार १७ वा हफ्ता 

PM Kisan Yojana 17th Installment : सतराव्या हप्त्याचे पैसे येत्या जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येणे अपेक्षित आहे. ही एक केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान योजना आहे. केंद्र सरकारच्या योजनेमार्फत शेतकऱ्यांना दर ४ महिन्यांनी २०००/- रुपयांचा हफ्ता दिला जातो. असे वर्षातून तीन हप्ते दिले जातात. म्हणजेच दरवर्षी एकूण ६०००/- रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले जातात. ही योजना वर्ष २०१८ पासून चालू करण्यात आली आहे.


सतरावा हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते पुढे जाणून घ्या.

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता फक्त त्याच शेतकऱ्यांना दिला जाईल ज्यांची ई केवायसी पूर्ण आहे.


तुमच्या आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर जोडला नसेल किंवा ओटीपी द्वारे केवायसी करण्यास असमर्थ असाल तर तुम्ही बायोमेट्रिक पडताळणीचा पर्याय निवडू शकता.


सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती आहे जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला जोडलेला नसेल किंवा आधार कार्ड ला जोडलेला नंबर हरवला असेल तर तुमच्याकडे सक्रिय असलेला मोबाईल नंबर आजच आधार नंबरशी जोडून घ्या. म्हणजे तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सतराव्या हप्त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही.


जर तुम्हाला ई केवायसी करण्यास कोणतीही अडचण किंवा समस्या असेल तर तुम्ही जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ई केवायसी करून घेऊ शकता.


विनंतीस अर्ज  

मित्रांनो नमस्कार, आपला कोणताही शेतकरी बंधू पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सतराव्या हफ्त्यातून वंचित राहिला नाही पाहिजे. ई केवायसी बद्दलची ही माहिती आपल्या गावातील संपर्कातील सर्व ग्रुप वरती फॉरवर्ड करा. जेणेकरून सतरावा हप्ता येण्याअगोदर वेळेतच आपल्या बळीराजाला ई केवायसी करून घेता येईल.


सरकारी योजना, सरकारी नोकरी आणि शासकीय बँकांच्या नवनवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप / टेलिग्राम चैनल ला जॉईन करा.


व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.

 

Hello friends, none of our farmer brothers should be deprived of the seventeenth installment received under PM Kisan Yojana. Forward this information about e KYC to all contact groups in your village. So that your Baliraja can be e-KYCed in time before the arrival of the seventeenth installment.

Join our Whats App channel to get information about government schemes, government jobs and new schemes of government banks.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!