Prepare IMP docs before 10th and 12th result : इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी महत्वाच्या सूचना खालील प्रमाणे आहेत. सर्व पालकांना कळवण्यात येते की, पुढील काही दिवसात इयत्ता १० वी व १२ वी चे निकाल लागताच नवीन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल. अशा वेळी आपली योग्य ती सर्व कागदपत्रे तयार असणे फार महत्वाचे आहे.
इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी महत्वाच्या सूचना : तुमच्या पात्रते नुसार लागू असलेली खालील कागदपत्रे तयार ठेवा.
Prepare IMP docs before 10th and 12th result |
नवीन प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र
१.शाळा सोडल्याचा दाखला
२.मागील वर्षाचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
३.जातीचा दाखला (आरक्षण लाभासाठी )
४.जात पडताळणी (आरक्षण लाभासाठी )
५.नॉनक्रिमिलेअर (फी मध्ये सवलत मिळण्यासाठी)
६.डोमासाईल (महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षे रहिवासाचा पुरावा )
७.डोंगरी दाखला (मेडिकल प्रवेश आरक्षण लाभ प्राप्त करण्यासाठी )
८.उत्पन दाखला (फी मध्ये सवलत मिळण्यासाठी )
९.शेतकरी दाखला (B.Sc Agree प्रवेश आरक्षण लाभ प्राप्त करण्यासाठी )
१०.अल्पभूधारक शेतकरी दाखला (होस्टेलच्या फी मध्ये सवलत मिळण्यासाठी )
११. EWS प्रमाणपत्र (आरक्षण लाभ मिळवण्यासाठी)
वरील सर्व कागदपत्र मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या e सेवा केंद्राला भेट द्या.
जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे :-
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचे नावे तलाठी जातीचा दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला.
४.वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला.
५.अ) Maratha / OBC / SBC करिता १९६७ पुर्वीचा जातीचा पुरावा.
ब) VJNT साठी १९६१ अगोदरचे जातीचे प्रमाणपत्र.
क) SC करिता १९५० पुर्वीचा जातीचा पुरावा.
(चुलते / वडील / आत्या / आजोबा किंवा वडिलांच्या रक्ताच्या नात्यामधील कोणीही असेल तर त्यांचा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच दाखला )
६.खाते उतारा किंवा ७/१२ किंवा कोणताही एक महसुल पुरावा प्रमाणपत्र.
७.अर्जदार यांचे आधार कार्ड
८.शिधापत्रिका (राशन कार्ड)
९.अर्जदार यांचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो.
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१.अर्जदार यांचा जातीचा दाखला
२.तहसीलदार यांचा ३ वर्षे उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला.
४.वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला.
५.खाते उतारा किंवा ७/१२ किंवा कोणताही एक महसुल पुरावा प्रमाणपत्र.
६.अर्जदार यांचे आधार कार्ड
७.शिधापत्रिका (राशन कार्ड)
८.अर्जदार यांचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो.
डोमासाईल प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका (राशन कार्ड)
५. अर्जदार यांचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो.
उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.तलाठी उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका (राशन कार्ड)
५.अर्जदार यांचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो.
सरकारी योजना, सरकारी नोकरी आणि शासकीय बँकांच्या नवनवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप / टेलिग्राम चैनल ला जॉईन करा.
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.
डोंगरी दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका (राशन कार्ड)
५. प्राथमिक शिक्षणाचा पुरावा
६.७/१२ किंवा खातेउतारा अथवा घराचा उतारा.
७. अर्जदार यांचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो.
शेतकरी / अल्पभूधारक शेतकरी दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१.जमिनधाराचा तलाठी रहिवासी दाखला.
२.खाते उतारा
३.७/१२ उतारा (५ एकर च्या आतील)
४.शिधापत्रिका (राशन कार्ड)
५.जमिनधारकाचे आधारकार्ड
६.जमिनधारकाचा यांचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो.
EWS प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :-
१.अर्जदार यांचा तलाठी रहिवासी दाखला.
२.तहसीलदार यांचा ३ वर्षे उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
४.जातीचा दाखला
५.खाते उतारा, ७/१२ (५ एकर च्या आतील)
६.घराचा ८अ उतारा (1000 स्के.फुट च्या आतील)
७.अर्जदार यांचे आधारकार्ड
८. शिधापत्रिका (राशन कार्ड)
९. अर्जदार यांचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो.
Prepare IMP docs before 10th and 12th result : योग्य वेळी तयारी केली तर भविष्यात होणारा आर्थिक व मानसिक त्रास तसेच आपल्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान वाचवू शकतो.
वर दिलेल्या माहिती नुसार कोण कोणती कागदपत्रे उपलब्ध आहेत आणि कोणती कागदपत्रे उपलब्ध नाहीत याची खात्री करून घ्या. दहावी आणि बारावीचा निकाल येत्या काही दिवसातच प्रसिद्ध होवू शकतो. त्यामुळे ऐन मोक्याच्या वेळी गोंधळ व्हायला नको. सध्या वेळ आहे तर जी कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध नाहीत त्यासाठी आजच कामाला लागा. म्हणजे नवीन प्रवेश घेतेवेळी तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल.
हि माहित आपल्या संपर्कातील अधिकाधिक लोकांना आणि WhatsApp ग्रुप वर पाठवा.
माहिती आवडली असल्यास कॉमेंट करून नक्की सांगा......धन्यवाद.
हे पण वाचा
शेतकर्यांना पीएम किसान योजनेचा १७ वा हफ्ता लवकरच मिळणार ! त्याआधी करावे लागणार हे काम?
केंद्र आणि राज्य सरकार कडून जेष्ठ नागरिकांना मिळत आहेत दर महिना १५०० रुपये.
राज्य सरकार कडून लेक लाडकी योजनातून मुलींना मिळत आहेत १०१०००/- एक लाख एक हजार रुपये