Vadhu Var Suchak Mandal-Kendra-Sanstha | लग्नासाठी जोडीदार शोधताय ! हि बातमी एकदा वाचाच

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

तुम्ही जर विवाह साठी स्थळ शोधत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे, लोकसत्ता वर्तमान पत्राने दर रविवारी स्पेशल लेख चालू केला आहे. या लेखामध्ये उमेदवारांनी दिलेल्या वैयक्तिक जाहिराती द्वारे किंवा विवाह संस्था यांनी दिलेल्या जाहिराती द्वारे थेट 📞संपर्क करून तुम्हाला हवा असणारा मनपसंद 💗💗जोडीदार शोधता येणार आहे. 

Vadhu Var Suchak Mandal-Kendra-Sanstha
Vadhu Var Suchak Mandal-Kendra-Sanstha


यंदा कर्तव्य आहे !!!

लोकसत्ता वर्तमानपत्राने विशेष 📖 अंक "लोकसत्ता जीवनसाथी दोन जीवांच्या मिलनाचा मंगल मार्ग" चालू केला आहे. या अंकामध्ये वधू वर स्वताच्या लग्नाची जाहिरात देतात किंवा 👨 तुम्ही सुद्धा स्वताच्या लग्नाची जाहिरात देवून योग्य जोडीदाराची निवड करू शकता.  अनेक वर्षापासून काम करत असलेल्या अनेक Vivah Sanstha सुद्धा या लेखामध्ये त्यांच्या जाहिराती देत असतात किंवा त्यांनी दिलेल्या जाहिरातीतून संबंधित Vivah Mandal यांच्याकडे  विवाहासाठी नोंदणी करू शकता. काही Vadhu Var Suchak Mandal या सारख्या विवाह संस्था लग्न मेळावा भरवतात त्याची पूर्ण माहिती या लेखामध्ये दिली जाते. जसे कि मेळाव्याचे ठिकाण, तारीख, वेळ इत्यादी. 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now


Vadhu Var Suchak Mandal ने लग्न मेळावा आयोजित केलेल्या ठिकाणी आपण सहभाग घेतल्यास वधू वर यांच्याशी थेट मुलाखत करता येते आणि आपल्या मनासारखा जोडीदार निवडण्यास अनेक पर्याय उपलब्ध असतात. या मेळाव्या मध्ये सहभाग घेण्यासाठी साधारण ५०० ते १००० रुपया पर्यंत प्रवेश शुल्क आकारले जात असले तरी मनपसंद वधू वर निवडण्यासाठी उत्तम असं व्यासपीठ आहे.




लग्नासाठी स्थळ कसे शोधायचे?  


लोकसत्ता वर्तमानपत्रात दिलेल्या लेखामधील जाहिराती द्वारे Vadhu / Var यांच्याशी थेट संपर्क करू शकता. किंवा Vadhu Var Suchak Mandal ने भरवलेल्या मेळाव्यात सहभाग घेवून थेट मुलाखत करू शकता. किंवा Vivah Sanstha यांचाकडे नोंदणी करू शकता. 


"लोकसत्ता जीवनसाथी दोन जीवांच्या मिलनाचा मंगल मार्ग" या लेखामध्ये दर रविवारी अनेक वधू वर, विवाह संस्था आपल्या जाहिराती देत असतात. या विवाह संस्था वेगवेगळ्या शहरात, तालुका आणि जिल्हा या ठिकाणी वधू वर मेळावा भरवत असतात. मेळावा बद्दलची पूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली जाते. मेळाव्याचे ठिकाण,तारीख, वेळ इत्यादी.


नांदा सौख्यभरे !!!


विधवा :  लोकसत्ता न्युज पेपर मधून ज्या महिला विधवा आहे अशा महिला देखील लोकसत्ताच्या लेखांमधून जाहिराती देत असतात. जाहिरात देणाऱ्या महिलांची वय मर्यादाची कोणतीही अट नाही. या लेखामध्ये जाहिरात देणाऱ्या महिला 18 ते 65 वयोगटातील सुद्धा असतात.  किंवा ज्या विधवा महिला विवाह करण्यास इच्छुक आहेत, अशा महिला देखील लोकसत्ताच्या या लेखांमध्ये जाहिरात देऊ शकता.

घटस्फोटीत : पुरुष आणि महिला ज्यांचा घटस्फोट झाला आहे. अशा उमेदवारांच्या जाहिराती सुद्धा पाहायला मिळतात. ज्यांचा घटस्फोट झाला आहे जसे कि महिला किंवा पुरुष असे उमेदवार देखील लोकसत्ताच्या या अंकामध्ये जाहिरात देवून आपला मनपसंद जोडीदार मिळवू शकता. 

दिव्यांग / अपंग :  अस्थिव्यंग, अंध, मुखबधीर, कर्णबधीर, इत्यादी प्रवर्गातील स्त्री आणि पुरुष जाहिराती देत असतात किंवा आपण जर या श्रेणी मध्ये मोडत असाल तर लोकसत्ताच्या लेखामध्ये जाहिरात देवून जोडीदाराची निवड करू शकता. 

उच्चशिक्षित : लोकसत्ता पेपरच्या वधू वर लेखांमध्ये जे लोक उच्चशिक्षित आहेत उदा. डॉक्टर, वकील, इंजिनिअर इत्यादी असे उमेदवार सुद्धा जाहिरात देत असतात. या लेखा मध्ये पुरुष आणि महिलांची सुद्धा जाहिरात पाहण्यास मिळते. तुम्ही सुद्धा या श्रेणी मध्ये मोडत असाल तर स्वताची जाहिरात देवू शकता. 

जात आणि धर्म : लोकसत्ता वर्तमानपत्राच्या  "लोकसत्ता जीवनसाथी दोन जीवांच्या मिलनाचा मंगल मार्ग" या लेखांमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांच्या जाहिराती पाहण्यास मिळतात किंवा तुम्ही सुद्धा लग्नासाठी जोडीदार शोधत असाल तर या लेखाद्वारे जाहिरात देऊन आपला मनपसंद जोडीदार निवडू शकता.  

वय मर्यादा : लोकसत्ताच्या वर्तमान पत्रातील दिलेल्या जाहिराती पहिल्या असता असं निदर्शास आले कि... जन्माचा जोडीदार शोधण्यासाठी वयाचे कोणतेही निर्बंध नाहीत. कोणत्याही वयोगटातील उमेदवार आपल्या लग्नाची जाहिरात देवू शकतो किंवा मागणी आणि पात्रतेनुसार वधू वर यांचाशी दिलेल्या जाहिराती द्वारे संपर्क करू शकता. 

दर रविवारी प्रदर्शित होणाऱ्या लोकसत्ता अंकातील "लोकसत्ता जीवनसाथी दोन जीवांच्या मिलनाचा मंगल मार्ग" लेख नक्की वाचा आणि "यंदा कर्तव्य आहे 👫" असे सांगा त्यानंतर "नांदा सौख्यभरे 👪"


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!