Viklang Pension Yojana 2024 : अपंग / दिव्यांग पेन्शन योजना महाराष्ट्र आणि केंद्र सरकार कडून २००९ पासून चालू करण्यात आली आहे. या योजने मध्ये आपल्या कुटुंबात किंवा समाजात अपंग / दिव्यांग व्यक्ती असेल तर नक्कीच या योजनांचा लाभ घेतला पाहिजे.
Disabled-Viklang people Pension Yojana 2024 |
केंद्र सरकार कडून राबवण्यात येत असलेली योजना म्हणजेच "इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना" आणि राज्य सरकार कडून राबवण्यात येत असलेली योजना "संजय गांधी निराधार अनुदान योजना" या दोन्ही योजना एकत्रित राबवल्या जातात. या दोन्ही योजनेचा लाभ लाभार्थ्यांना एकत्र दिला जातो.
खालील लेखात जाणून घ्या पात्रता, वय मर्यादा, नियम आणि अटी इत्यादी !!!
- अपंग / दिव्यांग योजना ऑनलाइन फॉर्म : आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता.
- केंद्र सरकार योजनेचे नाव : इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना
- राज्य सरकार योजनेचे नाव : संजय गांधी निराधार अनुदान योजना
- पेन्शन मिळण्याचा कालावधी : दर महिना
- केंद्र सरकार अनुदान : दर महिना ३००/- रुपये.
- राज्य सरकार अनुदान : दर महिना १२००/- रुपये.
- एकूण अनुदान : केंद्र आणि राज्य सरकारचे एकत्रित अनुदान एकूण १५००/- रुपये प्रती महिना दिले जाते.
- वय मर्यादा : १८ - ७९ वर्ष
- आधार कार्ड : लाभार्थी याचाकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.
- अपंग / दिव्यांग प्रकार : अस्थिव्यंग, अंध, मुखबधीर, कर्णबधीर, मतीमंद, इत्यादी प्रवर्गातील स्त्री आणि पुरुष.
- कुटुंबाचे उत्पन्न : कुटुंबाचे उत्पन्न ५० पेक्षा जास्त नसावे किंवा लाभार्थी आणि कुटुंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील यादीत समावेश असावा.
- नियम आणि अट : शासनाकडून इतर कोणताही आर्थिक लाभ भेटत असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Viklang Pension Yojana 2024 : लाभार्थ्यांना लाभ मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
उत्पनाचा दाखला : तहसीलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्र्य रेषेखालील यादी मध्ये त्या व्यक्ती / कुटुंबाचा समावेश असल्या बद्दलचा साक्षांकित उतारा. या पैकी कोणत्याही एका अधिकाऱ्याने दिलेला दाखला.
रहिवाशी दाखला : ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवाशी असल्या बाबतचा दाखला. या पैकी कोणत्याही एका अधिकाऱ्याने दिलेला दाखला.
अपंगाचे प्रमाणपत्र : अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, कर्णबधीर, मतीमंद, यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ मधील तरतुदी प्रमाणे जिल्हा शल्याचिकीत्सक (सिव्हील सर्जन) यांचे प्रमाणपत्र.
कोणत्याही सरकारी किंवा निम सरकारी किंवा निवास गृहाचा अंतरवासी नसल्या बाबतचा दाखला : तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, महिला व बाल कल्याण अधिकारी यांच्या कडून प्राप्त करावा. या पैकी कोणत्याही एका अधिकाऱ्याने दिलेला दाखला.
स्वयं घोषणापत्र : स्वयं घोषणा पत्राचा नमुना आणि अर्जाचा नमुना यांची खाली लिंक दिली आहे.
सरकारी योजना, सरकारी नोकरी आणि शासकीय बँकांच्या नवनवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप / टेलिग्राम चैनल ला जॉईन करा.
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.
अर्ज कसा करायचा
Viklang Pension Yojana 2024 : वर उल्लेख केलेल्या सर्व कागदपत्रांची प्रत्येकी २ झेरॉक्स कॉपी काढून आपल्या जवळपास असणाऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचारी यांच्याकडून साक्षांकित ( True Copy ) करून घ्या.
दोन अर्ज सादर करायचे आहेत. खालील दिलेल्या नमुना अर्जाच्या २ प्रिंट काढून घ्या आणि विचारलेल्या माहितीनुसार अचूक माहिती भरा.
वर सांगितल्या प्रमाणे सर्व कागदपत्रांची झेरॉक्स दोन्ही अर्जांना जोडा. गाव कामगार तलाठी यांच्याकडे अर्ज जमा करून त्याची पोच पावती घ्या.
अर्ज भरण्यास तुम्हाला काही अडचणी येत असतील तर ग्रामसेवक आणि तलाठी यांची मदत घेवू शकता.
खालील प्रश्न वारंवार विचारले जातात.
- अपंग जीआर
- अपंग योजना ऑनलाईन फॉर्म
- अपंग यादी
- अपंग कर्ज योजना
- अपंग पगार
- अपंग शेतकरी योजना
- अपंग रेल्वे भरती
- अपंग योजना
- अपंग प्रमाणपत्र टक्केवारी
- अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र
- अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र यादी
- अपंग पेन्शन योजना कागदपत्रे
- अपंग पेन्शन योजना फॉर्म
- अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र २०२४
- अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र मराठी
- अपंग पेन्शन
- विकलांग पेंशन
- विकलांग हेल्पलाईन नंबर महाराष्ट्र
- दिव्यांग कर्ज योजना
- दिव्यांग रोजगार योजना
- दिव्यांग योजना महाराष्ट्र
- दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र
- दिव्यांग पोर्टल
- दिव्यांग म्हणजे काय
- दिव्यांग सुविधा
- दिव्यांग योजना
- दिव्यांग का अर्थ
- दिव्यांग पेंशन महाराष्ट्र
- दिव्यांग पेंशन योजना महाराष्ट्र
- दिव्यांग पेंशन टोल फ्री नंबर
शासनाचा जी आर आणि अर्जाचा नमुना आणि स्वयं घोषणा पत्र नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- नमुना अर्जासाठी पेज नंबर 20 पहा
- स्वयं घोषणा नमुना पत्रासाठी पेज नंबर ३१ पहा
- हयात नमुना प्रमाण पत्रासाठी पेज नंबर ४६ पहा
- उत्पनाचा दाखला नमुना पत्रासाठी पेज नंबर ४७ पहा.
हे पण वाचा
शेतकर्यांना पीएम किसान योजनेचा १७ वा हफ्ता लवकरच मिळणार ! त्याआधी करावे लागणार हे काम?
केंद्र आणि राज्य सरकार कडून जेष्ठ नागरिकांना मिळत आहेत दर महिना १५०० रुपये.
राज्य सरकार कडून लेक लाडकी योजनातून मुलींना मिळत आहेत १०१०००/- एक लाख एक हजार रुपये.