Army Boys Sports Company Recruitment 2024 - लहान मुलांची आर्मी भरती वय ०८-१६ वर्ष

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

इंडियन आर्मी लहान मुलांची ०८ - १६ वर्ष मुलांची भरती

तुम्हाला माहित आहे का? वय वर्ष ८-१६ वयोगटातील लहान मुलांना सुद्धा आर्मी मध्ये भरती केले जाते. यामध्ये मुलांना कायमस्वरूपी नोकरी, इयत्ता १० वी पर्यंत पूर्णपणे मोफत शिक्षण तसेच राहण्याची आणि जेवणाची  सुविधासुद्धा मोफत दिली जाते, खालील दिलेल्या खेळातील कौशल्यानुसार त्यांना योग्य ते प्रशिक्षण (तालीम) देवून त्या खेळात त्यांना तरबेज केले जाते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलंपिक, एशियन गेम्स इत्यादी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधे मध्ये खेळण्याची संधी मिळते. तुमच्या घ्ररात जर ८-१६ वयोगटातील मुलं असतील तर तुम्ही नक्की भरती करू शकता. भरती प्रक्रिया कशी केली जाते? नियम आणि अट काय आहे? याबद्दलची अधिक माहिती या लेखात जाणून घ्या.  

ARMY-BOYS-SPORTS-COMPANY-RECRUITMENT-2024
ARMY-BOYS-SPORTS-COMPANY-RECRUITMENT-2024


आर्मीचे उद्दिष्ट - सर्वसामान्य मुलांना खेळात प्राधान्य देणे

इंडिअन आर्मी ने Boys Sports Company ( BSC ) स्थापना पुणे १ जुलै २००१ रोजी  केली होती. सध्या पूर्ण  भारतात Boys Sports Company ( BSC ) च्या एकूण ४६ शाखा आहेत. हि संस्था चालू करण्या पाठीमागचा एकच उद्देश आहे भारतातील ग्रामीण, शहरी, अतिदुर्गम भागातील, खेडोपाड्यातील, गोरगरीब तरुण-तरुणी तसेच प्रतिभावान किशोर वयातील मुला-मुलींना त्यांच्यामध्ये असलेल्या कलेला गुणवत्तेला, विविध खेळामध्ये आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना वाव मिळावा आणि मिळालेल्या संधीचे सोने करून आपल्या भारत देशाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्वताचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे हि त्यामागची भावना आहे. 


भरती नंतर मिळणाऱ्या मोफत सुविधा.

  • तुमच्या मुलाला Army Boys Sports Company मध्ये प्रवेश मिळाल्या पासून त्याला इयत्ता १० वी पर्यंत CBSE बोर्ड अंतर्गत विद्यालयामध्ये मोफत शिक्षण दिले जाते
  • मोफत मध्ये राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय.
  • वय १७.५ वर्ष पूर्ण होताच आर्मी मध्ये कायमस्वरूपी नोकरी दिली जाते.
  • सर्व प्रकारचा वैध्यकीय खर्च (दवाखाना, औषध गोळ्या, मोफत उपचार)  मोफत केला जातो.
  • राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक यांचेकडून मोफत प्रशिक्षण दिले जाते.
  • खेळासाठी लागणारे सर्व साहित्य मोफत पुरवले जाते. 

आर्मी Boys Sports Company मध्ये भरती झाल्यानंतर तुम्हाला एकही रुपयाचा खर्च ध्यावा किंवा करावा लागत नाही.  


Freshers अर्ज करण्यास पात्र /अनुभवाची गरज नाही.

विशेष म्हणजे आर्मी Boys Sports Company मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अनुभवाची गरज नाही. जर तुमच्या मुलाला खालील दिलेल्या क्रीडा क्षेत्रात अनुभव असेल, उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले असेल तर अधिक उत्तम. मग हा सन्मान शालेय, ग्रामीण, अकॅडमी, तालुका, जिल्हा किंवा राज्यस्तरीय स्तरावर मिळाला असेल तरी चालेल !! पुन्हा एकदा आठवण करून देत आहे, अनुभव, प्रमाणपत्र नसले तरी सुद्धा तुम्ही तुमच्या पाल्याला / मुलाला  भरती करू शकता. त्याला फक्त खालील दिलेल्या कोणत्याही खेळामध्ये करिअर करण्याची आवड आणि शिकण्याची तयारी असली पाहिजे.


अंतरराष्ट्रीय खेळ आणि त्यांची नावे 

  1. Archery - धनुष्य बाणाने तीर मारण्याची विद्या आणि कौशल्य
  2. Boxing - बॉक्सिंग
  3. Football - पायाने खेळण्याचा चेंडू
  4. Hockey - हॉकी
  5. Gymnastic - व्यायाम विद्या
  6. Rowing - नौका व्हलवण्याची कला   
  7. Wrestling - कुस्ती
  8. Athletics - धावपटू
  9. Fencing - तलवार चालवण्याची कला
  10. Weightlifting - वजन उचलण्याचा व्यायाम प्रकार
  11. Diving - समुद्र, तलाव, इत्यादी मध्ये पोहण्याचा खेळ
  12. Shooting - निशानेबाजी, नेमबाजी
  13. Basketball - चेंडूचा एक खेळ
  14. Swimming - पोहणे
  15. Volleyball - व्हॉलीबॉल
  16. Equestrian -  घोडेस्वार, घोड्यावर बसून घोडेस्वारी करणे.
  17. Handball - हाताने भिंतीवर चेंडू आपटून खेळण्याचा एक खेळ. 
  18. Sailing -  विविध प्रकारच्या लहान नौका, लहान मोठ्या बोट - बोटी चालवण्याची कला. 

वर दिलेल्या खेळांपैकी तुम्हाला कोणताही खेळ आवडत असेल आणि करियर करायचे असल्यास नक्कीच सहभाग घ्या. आणि आपले ध्येय / स्वप्न पूर्ण करा

Boys Sports Company मध्ये वर दिलेल्या खेळांपैकी सर्वसामान्य ग्रामीण आणि शहरी भागातील काही विद्यार्थी/ पाल्य यांचामध्ये (Gymnastic - व्यायाम विद्या / Wrestling - कुस्ती / Athletics - धावपटू / Weightlifting - वजन उचलण्याचा व्यायाम प्रकार / Diving - समुद्र, तलाव, इत्यादी मध्ये पोहण्याचा खेळ / Swimming - पोहणे) या सारख्या खेळांचे कौशल्य हमखास आढळून येते. ज्या विद्यार्थ्यांकडे यापैकी कोणीतीही कला अवगत असेल किंवा आवड असल्यास नक्कीच अशा भरतीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. 


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now


भरतीसाठी नियम आणि अटी

  • वय मर्यादा - ८-१४ वर्ष ( Fresher - अननुभवी )
  • वयमर्यादा - ८-१६ वर्ष ( Experienced - अनुभवी)
  • शैक्षणिक पात्रता - कमीत कमी चौथी उत्तीर्ण.
  • शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक. 
  • शरीरावर कोणत्याही प्रकारचा टॅटू नसावा. 


भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे 

  • मागील वर्षाचे शैक्षणिक गुणपत्रक / प्रमाणपत्र ( कमीत कमी इयता ४ थी किंवा त्यापुढील)
  • जन्माचा दाखला
  • रहिवाशी दाखला
  • जातीचा दाखला ( जात असल्यास )
  • आधार कार्ड 
  • फोटो - सध्याचे पासपोर्ट आकाराचे रंगीत १० फोटो.

 

भरतीची माहिती कशी मिळवायची?

वर उल्लेख केलेल्या खेळांसाठी भारतातील विविध शाखेमध्ये भरती निघते तेव्हा  याची जाहिरात हि वर्तमानपत्र, आणि आर्मीच्या अधिकृत वेबसाईट जाहीर केली जाते. 

तसेच आर्मीचे काही अधिकारी वेगवेगळ्या अकॅडमी, क्रीडा संस्था, खेळांच्या स्पर्धा असलेल्या ठिकाणी भेट देवून त्याठिकाणी प्रतिभावान आणि हुशार विद्यार्थ्यांची निवड करून Boys Sports Company मध्ये प्रवेश दिला जातो. 


भर्तीबद्दल अपडेट मिळवण्यासाठी टेलिग्राम आणि WhatsApp चैनेल जॉईन करा. 


सुखसुविधा आणि वैशिष्ट्य 

  1. इयत्ता १० वीपर्यंत केंद्र सरकारच्या CBSE शाळेमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते.  
  2. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील अनुभवी प्रशिक्षक यांचेकडून प्रशिक्षण देवून विद्यार्थ्यांना मानसिक शारीरिक दृष्ट्या कणखर बनवले जाते. 
  3. वयाची साडेसतरा (१७.५) वर्ष पूर्ण होताच आर्मी मध्ये कायमस्वरूपी नोकरी दिली जाते. 


म्हणजेच या भरती मध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि नोकरी इत्यादी सुविधांचा लाभ अगदी सहज आणि मोफत मिळतो.


महत्वाचे : - 

आपल्या पाल्याचे / मुलांचे लहान असतानाच त्यांचे अंगी असलेले खेळाचे गुण ओळखून किंवा वर दिलेल्या खेळांपैकी त्यांना अशी तालीम द्या, जेणेकरून ८-१६ या  वयोगटात प्रवेश केल्यानंतर Boys Sports Company मध्ये सहज भरती करता येईल. तुमच्या मुलाला योग्य वयात योग्य ते मार्गदर्शन केले तर नक्कीच अगदी कमी वयात आणि कमी वेळेत यशस्वी होणारच यात काही शंकाच रहात नाही. 



Army Boys Sports Company च्या काही ऑफिशियल वेबसाईट आहेत. या वेबसाईटना भेट देवून अधिक माहिती मिळवू शकता. 

आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या काही संकेतस्थळांची माहिती खाली दिलेली आहे..इतर शाखांच्या संकेतस्थळांची माहित गुगल वर मिळवा.   

  • Army Sports Institute: https://armysportsinstitute.com/
  • Yachting Association Of India: http://www.yai.org.in/
  • Sports Authority Of India:  https://saijobs.sportsauthorityofindia.gov.in/
  •           
  • Press Information Bureau: https://pib.gov.in/indexd.aspx
  •         
  • Department of information & Publicity: https://dip.goa.gov.in/
  • Hokey India: https://www.hockeyindia.org/
  •                                   
  • SAI Sports Authority Of India: https://sportsauthorityofindia.nic.in/sai/
  •               
  • Join Indian Army: https://joinindianarmy.nic.in/index.htm


वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर, १८ खेळांपैकी, त्या शाखेमध्ये उपलब्ध असलेल्या  खेळांसाठी भरती जाहीर केली जाते. 


उदा. पुणे शाखेमध्ये फक्त Archery, Boxing, Wrestling, Athletics, Fencing, Weightlifting, Diving याच खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. म्हणजेच याच खेळांसाठी पुणे शाखेमध्ये भरती जाहीर केली जाते. इतर खेळांमध्ये प्रशिक्षण हवे असल्यास ज्या शाखेमध्ये उपलब्ध आहे त्या शाखेशी संपर्क करावा लागेल. 


आजच प्राप्त झालेल्या वर्तमानपत्रातील जाहिरातीनुसार, मुंबई येथे Sailing या खेळासाठी भरती खालील दिलेल्या माहितीप्रमाणे करण्यात येत आहे. 

Army Boys Sports Company Recruitment 2024
Army Boys Sports Company Recruitment 2024
मुंबई येथे Sailing ( नौकानयन, लहान बोट चालवण्याचा खेळ) या खेळासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.  

अर्जाची पीडीएफ Download करण्यासाठी येथे क्लिक करा. 


विनंती 

हि माहिती आपल्या संपर्कातील नातेवाईक / मित्रमंडळी / यांना  WhatsApp ग्रुप पाठवून सर्व सामान्य गोरगरिबांचे कल्याण करूया. आपल्या भारत देशाला समृद्ध बनवूया आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकावूया तसेच प्रत्येक खेळात जास्तीत जास्त भारताला सुवर्णपदक मिळवून देवूया.


जय हिंद !!! जय भारत !!!

💗💗 वंदे मातरम 💗💗    


हि माहिती आवडली असल्यास कॉमेंट द्वारे आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.        


 हे पण वाचा :

मुलींना महाराष्ट्र शासनाकडून मिळणार १०१०००/-  ( एक लाख एक हजार रुपये)


राज्यातील विविध असक्षम महिलांना केंद्र आणि राज्य सरकार कडून दर महिना १५००/- रुपये पेन्शन.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!