Breaking News | Headlines Today | आजच्या ठळक बातम्या
ठळक बातम्या | शुक्रवार, दिनांक ०७ जून २०२४
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा सर्वात मोठा शेअर बाजार घोटाळा - राहुल गांधी यांचा आरोप.
- राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या पावसाच्या पहिल्या सरी.. शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज.
- अतिक्रमण कारवाई करत असताना मुंबई, पोवई येथे पोलिसांवर दगडफेक, पालिका कर्मचारी आणि पोलीस जखमी.
- सरकारी दवाखान्यात मोफत उपचार करण्यासाठी आभा कार्ड असणे बंधनकारक.
- रायगडावर शिवरायांचा शिवराज्याभिषेक उत्साहात पार पडला.
- मुंबई चेंबूर येथे एका घरात Gas सिलेंडरचा स्फोट होवून ९ जन गंभीर जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक.
- डॉ. श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड - एकनाथ शिंदे शिवसेना गट.
- महिला पोलीस कॉन्स्टेबल ने चंदिगढ विमानतळावर, हिमाचल प्रदेशची नवनिर्वाचित खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कानशिलात लगावली.
- गाझा येथील शाळेवर इस्त्रायलचा हल्ला ३३ जन ठार.
- जलसंपदा विभागाकडून कृष्णा खोऱ्यातील ९०० धरणाची तपासणी, सर्व धरणे सुरक्षित.
- अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत, ६ आमदारांनी फिरवली पाठ.
- पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलीस कोठडीत असणारे अगरवाल पिता पुत्र यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल. बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्तेस प्रवृत्त केल्याचा आरोप.
- पोर्शे कार अपघातातील मुख्य आरोपी मुलाचे आजोबा यांची उच्च्य न्यायालयात धाव. पोलिसानी चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप.
Breaking News | Headlines Today | आजच्या ठळक बातम्या
- रशियामध्ये वैध्यकीय शिक्षण घेत असलेल्या, जळगावच्या ३ विद्यार्थ्यांचा, पोहायला गेले असताना नदी पात्रात बुडून मृत्यु.
- जनसामान्याची सुमारे १.९१ लाख कोटीची संपती विनादावा पडून - यामध्ये बँक ठेवी, शेअर्स, मिचुअल फंड, पीएफच्या पैशाला कोणी वारीसच नाही.
- T20 World Cup - अमेरिकेने रचला इतिहास.. माजी २००८ चा विश्वविजेता पाकिस्तानचा सुपर ओव्हर मध्ये पराभव करत अमेरिकेने इतिहास रचला.
- पनवेल मधील महिलेची २५ लाखांची फसवणूक, शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळवून देवू , असे सांगून whatsApp द्वारे लिंक पाठवून बँक खाते रिकामे केले.
- नवी मुंबई - महानगरपालिकेच्या वतीने पालिका शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप .
- पनवेल - पोलीस अधिकारी असल्याचे बतावणी करून, ३० वर्षीय तरुण रोहित चव्हाण, राहणार कामोठे, नवी मुंबई यांची १९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. तुम्ही पाठवलेल्या कुरिअर मध्ये अमली पदार्थ सापडले आहे, असे सांगून एक अप्प्लीकेशन डाऊनलोड करायला सांगितले, आणि बँक खाते रिकामे केले.
Breaking News | Headlines Today | आजच्या ठळक बातम्या
हे पण वाचा :