Under the MJPJAY (MAHATMA JYOTIRAO PHULE JAN AROGYA YOJANA) insurance policy revised scheme, General Citizens of the State will get a benefit of up to 5 Lakh Rupees.
MJPJAY विमा POLICY नवीन नियमानुसार सर्वाना ५ लाख रुपयापर्यंत लाभ मिळणार.
राज्यातील सर्वसामान्य जनतेला नजीकच्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेता यावा तसेच उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचे ओझे कमी व्हावे म्हणून महाराष्ट्र सरकारने MJPJAY (MAHATMA JYOTIRAO PHULE JAN AROGYA YOJANA) हि योजना २०१७ साली चालू केली होती.
मागील वर्षी जुन २०२३ मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी MJPJAY अंतर्गत मिळणारा १.५ लाख रुपयाच्या लाभा मध्ये वाढ करून ५ लाख रुपये इतकी वाढ करण्याची घोषणा केली होती.
MJPJAY कडून विलंब पण......
उप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्या नंतर अध्यादेश पण जाहीर करण्यात आला होता.
विम्याची रक्कम ५ लाख रुपये लागू केल्यामुळे MJPJAY (MAHATMA JYOTIRAO PHULE JAN AROGYA YOJANA) अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून ५ लाख रुपयापर्यंत विमा कवर देण्याचे अश्वासन दिले होते. परंतु घोषणा करून ११ महिने उलटले तरी सुद्धा हि योजना कागदोपत्रीच होती.
MJPJAY च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी सांगितले नवीन कंपनीची निवड करण्यासाठी ३ वेळा RE-TENDERING करावे लागले म्हणून इतका वेळ लागला. आता सर्व काही तयार आहे. निवडणूक आयोगाकडून सूचना मिळताच WORK ORDER जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले.
यासाठी "यूनाइटेड इंडिया एश्योरेंस कंपनी" (United India Insurance Company) ची निवड करण्यात आली आहे. MJPJAY चे CEO श्री. रमेश चव्हाण यांनी सांगितले कि विद्यमान १.५ लाखाची विमा योजना ३० जुन २०२४ पर्यंत लागू राहील.
सुधारित MJPJAY योजना, १ जुलै २०२४ पासून ५ लाख रुपयांची विमा योजना लागू होईल. या साठी राज्य सरकारला जीआर (GR) सादर करावा लागेल.
महाराष्ट्र सरकार राज्यातील जनतेसाठी ३००० कोटी रुपये खर्च करणार.
सध्या राज्यातील जनतेला १.५ लाख रुपयापर्यंत योजनेचा लाभ भेटत आहे. ५ लाख रुपयांची विमा योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारला प्रती कुटुंब १३००/- रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. यासाठी राज्य सरकारला एकूण ३००० कोटी रुपये खर्च येणार आहे.
MJPJAY योजना सर्वांसाठी लागू..उत्पन्न व जातीची अट नाही
राज्यातील १९०० हॉस्पिटल - दवाखान्यात मिळणार मोफत उपचार
सध्या राज्यातील १००० हॉस्पिटल - दवाखाने MJPJAY योजनेशी जोडले गेले आहेत. MJPJAY योजनेचे SEO श्री. रमेश चव्हाण यांनी सांगितले येत्या काही दिवसात आणखी ९०० हॉस्पिटल - दवाखाने जोडणार आहे. या नंतर राज्यात एकूण १९०० हॉस्पिटल मध्ये उपचार केला जाईल.
हॉस्पिटलची संख्या वाढल्यानंतर लोकांना उपचारासाठी लांबचा प्रवास करण्याची गरज नाही. लोकांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये सहज उपचार उपलब्ध होतील. मुंबई आणि मुंबई उपनगरातील एकूण ५७ हॉस्पिटल मध्ये MJPJAY योजने अंतर्गत मोफत उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
MJPJAY योजने अंतर्गत १३५६ आजारांवर मोफत उपचार
MJPJAY योजने अंतर्गत केले जाणारे उपचार आणि सर्जरी, यामध्ये वेळोवेळी नियमामध्ये विस्तारित बदल करण्यात आले आहेत.
किडनी, लिवर, हार्ट इत्यादी अनेक आजारांवर उपचार केले जातात. सध्या एकूण १३५६ आजारांवर उपचार आणि सर्जरी MJPJAY योजने अंतर्गत मोफत केली जाते.
Under the MJPJAY (MAHATMA JYOTIRAO PHULE JAN AROGYA YOJANA) insurance policy revised scheme, General Citizens of the State will get a benefit of up to 5 Lakh Rupees.
एपैनल हॉस्पिटल मध्ये उपचार घ्या.
MJPJAY योजने अंतर्गत कोणत्याही रुग्णाला उपचार किंवा सर्जरी करायची असल्यास सर्वप्रथम रुग्णाला MJPJAY योजनेशी संलग्न (जोडलेले) असलेल्या हॉस्पिटल मध्ये जाणे गरजेचे आहे.
MJPJAY योजनेशी (संलग्न) जोडलेल्या हॉस्पिटलची यादी किंवा हॉस्पिटल बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास https://www.jeevandayee.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
Network Hospital वर क्लिक करा > जिल्हा निवडा > आता तुमच्या जिल्ह्यातील हॉस्पिटलची पूर्ण यादी पाहायला मिळेल.
हॉस्पिटल मधील "रुग्ण मित्र" (MJPJAY कर्मचारी) यांना भेटा
डॉक्टरांनी रुग्णावर सर्जरी करण्याचे नक्की केल्या नंतर ते एक फॉर्म आणि पत्र लिहून देतील ते घेवून हॉस्पिटल मधील "रुग्ण मित्र" यांना दाखवायचे आहे.
MJPJAY योजनेशी सलंग्न असलेल्या सर्व हॉस्पिटलमध्ये एक कार्यालय स्थापित केले आहे. तेथे "रुग्ण मित्र" (MJPJAY कर्मचारी) Registration करतात.
डॉक्टरांनी दिलेलं पत्र आणि फॉर्म सोबत रुग्णाचे राशन कार्ड किंवा Domicile चे झेरॉक्स जोडून द्याचे आहे.
रुग्ण उपचार / सर्जरी आणि MJPJAY योजनेची मंजुरी
"रुग्ण मित्र" यांच्या द्वारे सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यानंतर MJPJAY कार्यालयातील उपस्थित डॉक्टरांची कमिटी आणि रुग्णावर उपचार करत असणारे डॉक्टर रुग्णाच्य अर्जाची सर्व तपासणी करतात.
रुग्णाला उपचार आणि सर्जरीची गरज असल्याचे खात्री होताच काही तासातच रुग्णाच्या अर्जाला मंजुरी दिली जाते आणि त्यानंतर रुग्णावर MJPJAY योजने अंतर्गत ५ लाख रुपयापर्यंत पूर्णपणे मोफत उपचार केला जातो.
उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या.
- सन २०१९-२० वित्तीय वर्षात राज्यातील ६ लाख ३ हजार नागरिकांनी MJPJAY या योजनेचा लाभ घेतला.
- सन २०२०-२१ वित्तीय वर्षात राज्यातील ६ लाख ७१ हजार नागरिकांनी MJPJAY या योजनेचा लाभ घेतला.
- सन २०२१-२२ वित्तीय वर्षात राज्यातील ८ लाख ४६ हजार नागरिकांनी MJPJAY या योजनेचा लाभ घेतला.
- सन २०२२-२३ वित्तीय वर्षात राज्यातील ८ लाख ५६ हजार नागरिकांनी MJPJAY या योजनेचा लाभ घेतला.
- सन २०२३-२४ वित्तीय वर्षात राज्यातील १० लाख २५ हजार नागरिकांनी MJPJAY या योजनेचा लाभ घेतला.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
State Health Assurance Society
ESIS Hospital Compound,
Ganpat Jadhav Marg,
Worli Naka,
Worli
Mumbai 400018
Maharashtra
संपर्क क्रमांक ०२२ - २४९१२२९१ / २४९९९२०२
टोल फ्री नंबर १८०० २३३ २२ ०० / १५५ ३८८