१० वी पास होम गार्ड भरती ९७०० जागा वय २०-५० वर्ष

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0
होमगार्ड मध्ये महिला आणि पुरुषांना नोकरीची सुवर्णसंधी. राज्यात  जवळपास 9700 रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण केवळ इयत्ता 10 वी पास आहे, अशा उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तसेच  20 ते 50 वर्ष वयोगटातील उमेदवारांची निवड केली जाते. खालील लेखात भरतीचं स्वरूप जाणून घ्या. विशेष म्हणजे या भरतीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागत नाही.

Home Guard Recruitment 10th Pass Female & Male 9700 vacancy. Age limit 18-50. Apply Now. 

होमगार्ड भरती पात्रता, अर्ज, नियम 

Home Guard Recruitment 10th Pass Female & Male 9700 vacancy. Age limit 18-50. Apply Now.
Home Guard Recruitment 10th Pass Female & Male 9700 vacancy. Age limit 18-50. Apply Now. 


होमगार्ड मध्ये नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्जाचे शुल्क आकारले जात नाही. इच्छुक महिला आणि पुरुष उमेदवार यांना मोफत मध्ये ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र.

होमगार्डची भरती ही 3 वर्ष कालावधीसाठी केली जाते. या कालावधीमध्ये जे उमेदवार 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतात किंवा 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 60% पेक्षा जास्त उपस्थिती दर्शवतात अशा उमेदवारांना राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये भरतीच्या वेळी 5% टक्के आरक्षण दिले जाते.

या ३ सरकारी खात्यात सहज नोकरी मिळवा 

सध्या राज्यातील पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या कॉम्पिटिशन एवढे आहे की उमेदवाराने भरतीच्या दरम्यान मैदान, लेखी द्वारे 95 टक्के गुण मिळवून सुद्धा पोलीस दलामध्ये भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.

ज्या उमेदवारांना पोलीस दलामध्ये भरती व्हायच आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. होमगार्ड मध्ये 3 वर्ष सर्विस करून पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दल, मध्ये मिळणाऱ्या 5% टक्के आरक्षणाच्या बळावर सहज नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.

Home Guard Recruitment 10th Pass Female & Male 9700 vacancy. Age limit 18-50. Apply Now. 

पात्रता नियम आणि अटी

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा.

वय मर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी 20 ते 50 वर्षे यादरम्यान असावे.

उंची : पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर आणि महिलांकरिता 150 सेंटीमीटर.

छाती : (फक्त पुरुषांकरिता) न फुगविता किमान 76 cm आणि कमीत कमी 5 cm फुगवणे आवश्यक.

शारीरिक क्षमता चाचणी : शारीरिक क्षमता चाचणी मध्ये उमेदवारांचे 1600 मीटर धावणे व गोळा फेक ची चाचणी घेतली जाईल.  (महिलांसाठी 800 मीटर धावणे).

आवश्यक कागदपत्र

  • रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड.
  • शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावीचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट
  • जन्मतारखेच्या दाखल्यासाठी इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
  • खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र.

होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे

  • सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान आणि विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण दिले जाते.
  • प्रथमोपचार अग्निशमन वीमोचन यासारख्या विषयांचे मोफत मध्ये प्रशिक्षण दिले जाते.
  • गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार आणि पदके मिळवण्याची संधी.
  • शेती / स्वतःचा व्यवसाय / नोकरी इत्यादी सांभाळून देश सेवा करण्याची सुवर्णसंधी.

भत्ता आणि बंदोबस्त

होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळामध्ये प्रतिदिन 570/- रुपये भत्ता तसेच 100/- रुपये उपहार भत्ता म्हणून दिला जातो असे एकूण 670/- रुपये बंदोबस्त काळामध्ये भत्ता दिला जातो.

प्रशिक्षण कालावधीमध्ये होमगार्ड सदस्यांना दररोज 35/- रुपये खिसा भत्ता व 100/- रुपये भोजन भत्ता दिला जातो तसेच साप्ताहिक कवायतीसाठी 90/- रुपये कवायत भत्ता दिला जातो.

भरती बद्दलची लिंक टेलिग्राम चैनल मध्ये देत आहे. टेलिग्राम चैनल जॉईन करून भरतीची संपूर्ण जाहिरात पाहू शकता.

प्रत्येक जिल्ह्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वेग वेगळी आहे. सातारा जिल्ह्यासाठी 31 जुलै शेवटची तारीख आहे. पुणे जिल्ह्यासाठी 11 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. तसेच नांदेड जिल्ह्यासाठी 14 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होमगार्डची भरती करण्यात येत आहे. येथे सर्व जिल्ह्यांचा उल्लेख करत नाही. सर्व जिल्ह्यांचा उल्लेख पाहण्यासाठी टेलिग्राम चैनल जॉईन करा. तेथे तुम्हाला एक लिंक दिली आहे आणि ती लिंक ओपन करून तुम्ही सर्व जिल्ह्यांची भरती बद्दल संपूर्ण माहिती पाहू शकता.

अर्ज असा सादर करा.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर अर्ज भरायचा आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना फक्त इंग्रजी भाषेमधूनच अर्ज भरायचा आहे. अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा जसे की आधार नंबर, जन्मतारीख, स्वतःचे नाव इत्यादी. एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एका वेळी एकच अर्ज दाखल करता येणार आहे.

उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे त्याच भागात म्हणजेच त्या जिल्ह्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जर तुमचा पत्ता एका जिल्ह्याचा आहे आणि तुम्ही दुसऱ्या जिल्ह्या मध्ये भरतीसाठी अर्ज करत असाल तर असे अर्ज अपात्र ठरवण्यात येतील.

मित्रांनो होमगार्ड मध्ये नोकरी करण्याचे दोन ते तीन कारण असू शकतात.

तुम्ही सध्या शेती करत असाल, नोकरी करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय करत असाल हे करत असताना वर्षभरामध्ये ठराविक दिवसासाठी बंदोबस्त काळामध्ये तुम्ही ही सेवा करून स्वतःला थोड्याफार पैशाची आर्थिक मदत होऊ शकते.

Home Guard Recruitment 10th Pass Female & Male 9700 vacancy. Age limit 18-50. Apply Now. 

होमगार्ड सेवा करा ५ टक्के आरक्षण मिळवा

होमगार्ड मध्ये सेवा करून राज्यातील पोलीस दलामध्ये, वन विभागात आणि अग्निशमन दलामध्ये सहज नोकरी मिळवण्यास मदत मिळेल. कारण होमगार्ड मधून सर्विस केलेल्या उमेदवारांना या तीन विभागात 5% टक्के आरक्षण दिले जाते.

जर तुमचा हेतू पैसे कमावण्याचा नसेल फक्त देशसेवा करायचे असेल तर होमगार्ड नक्की जॉईन करा.

सरकारी योजना आणि भरती बद्दलची अधिक माहितीसाठी टेलिग्राम चैनल आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

मित्रांनो ही माहिती आपल्या संपर्कातील मित्रमंडळी नातेवाईक यांना नक्की फॉरवर्ड करा. तुमचा एक फॉरवर्ड मेसेज एखाद्याला आयुष्यभराची रोजी रोटी देऊ शकते.

ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!