इयत्ता दहावी, बारावी, तसेच पदवीधर पूर्ण गेल्यानंतर तंत्रनिकेतन क्षेत्रात प्रवेश मिळवून विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
Opportunity to mechanism technical courses after 10th and 12th standard |
इयत्ता दहावी नंतर करियर संधी व प्रवेश
इयत्ता दहावी मध्ये 35 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला देखील तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. हा प्रवेश स्थापत्य, यंत्र, विद्युत,अनु विद्युत, माहिती तंत्रज्ञान, रसायन, खनिकर्म , वस्त्रनिर्माण,उत्पादन, ड्रेस डिझाईन, प्रिंटिंग आणि उपकरणीकरण इत्यादी शाखेत मिळू शकतो.
Opportunity to mechanism technical courses after 10th and 12th standard
इयत्ता बारावी नंतर करियर संधी व प्रवेश
इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शाखा मधील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो.
1. औषधी निर्माण शास्त्र: भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी : कोणत्याही विषयांमध्ये पस्तीस टक्के गुणांचा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
3. सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी : भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित आणि इंग्रजी या विषयासह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Opportunity to mechanism technical courses after 10th and 12th standard
तंत्रनिकेतनच्या दुसऱ्या वर्षात / वर्गात प्रवेशासाठी संबंधित उमेदवाराने पुढीलपैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
भौतिक शास्त्र
गणित
रसायनशास्त्र
जीवनशास्त्र
कॉम्प्युटर सायन्स
इलेक्ट्रॉनिक्स
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस
बायोटेक्नॉलॉजी
टेक्निकल वोकेशनल विषय
कृषी
अभियांत्रिकी ग्राफिक्स
बिझनेस स्टडीज
आंत्रप्रीनिअरशिप
या घटकातील विद्यार्थ्यांसाठी 75 टक्के जागा आरक्षित असतात. किंवा 10+2 आयटीआय यांच्यासाठी 25 टक्के जागा आरक्षित असतात.
ITI केलेल्या उमेदवारांना तंत्रनिकेतनाचा अभ्यासक्रम अवघड जाऊ नये यासाठी सुरुवातीला अभ्यासक्रमामध्ये योग्य अशा ब्रिज कोर्स (जोड अभ्यासक्रम) चा (उदाहरणार्थ गणित, भौतिकशास्त्र, इंजिनिअरिंग ड्रॉइंग इत्यादी) समावेश केला जाईल.
सरकारी योजना आणि सरकरी नोकरीची माहिती प्राप्त करण्यासाठी टेलिग्राम चैनेल व WhatsApp ग्रुप जॉईन करा.
संस्था आणि अभ्यासक्रम
डिप्लोमा इन ज्वेलरी डिझाईन - हा अभ्यासक्रम शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथे उपलब्ध आहे. रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरेल असा कौशल्य निर्मितीचा हा अभ्यासक्रम कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या साह्याने सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची मान्यता मिळाली आहे. डिप्लोमा कालावधी 3 वर्षाचा आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
साखर उद्योगांमध्ये लागणाऱ्या मनुष्यबळासाठी उपयुक्त ठरणारा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन शुगर टेक्नॉलॉजी, हा अभ्यासक्रम या संस्थेत करता येतो.
या संस्थेच्या निरंतर शिक्षण कार्यक्रमांतर्गत फॅशन ज्वेलरीचे विषयासाठी 4 महिने कालावधीचे प्रशिक्षण घेता येते. मेटल वेअर विषयासाठी 2 महिना कालावधीचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. लेदर क्राफ्ट या विषयासाठी 2 महिना कालावधीचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. ज्यूट क्रॉप या विषयासाठी 2 महिना कालावधीचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. प्रत्येक विषयाच्या प्रशिक्षणासाठी 20 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो यासाठी दरमहा 7200/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. सोबतच साहित्य संच म्हणजेच TOOL KITS दिले जाते.
Opportunity to mechanism technical courses after 10th and 12th standard
इतर अभ्यासक्रम
1. सिविल 2. प्रोडक्शन 3.इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 4. इलेक्ट्रिकल 5. मेकॅनिकल. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला www.ganded.ac.in भेट द्या.
Dress designing and garment manufacturing हा अभ्यासक्रम शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन लातूर येथे उपलब्ध आहे. मेडिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रम करण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे.
इतर अभ्यासक्रम आणि शिष्यवृत्ती
सिविल, कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि मेकॅनिकल या अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळे संवर्ग मिळून एकूण 305 मुलींना प्रवेश दिला जातो. वस्तीगृहाचा खर्च दरमहा साधारण 700 रुपये असा आहे. सर्व मागासवर्गीय संवर्गातील मुलींना शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क मध्ये सूट दिली जाते अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला www.grwpl.ac.in भेट द्या.
टेक्सटाइल्स मॅन्युफॅक्चरर्स इंजीनियरिंग
Textile manufacturers engineering हा अभ्यासक्रम शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर येथे करता येतो या अभ्यासक्रमामध्ये एकूण 46 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.
इतर अभ्यासक्रम बद्दल माहिती
1. Civil, 2. information technology, 3.electrical, 4. electronics and telecommunication, 5. Computer technology, 6. mechanical या अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट www.gpmiraj.ac.in ला भेट द्या.
प्लास्टिक अँड पॉलिमर
Plastic and polymer हा अभ्यासक्रम शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे उपलब्ध आहे या व्यतिरिक्त इतर अभ्यासक्रम खालील प्रमाणे उपलब्ध आहेत.
सिव्हिल
कॉम्प्युटर
केमिकल
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
इलेक्ट्रिकल
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन
मेकॅनिकल
हे सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कालावधी २ वर्षाचा आहे अधिक माहितीसाठी ऑफिशियल वेबसाईट www.gpamravati.ac.in ला भेट द्या.