राज्य सरकारचा महाराष्ट्रातील आपल्या लाडक्या बहिणींवर घोषणांचा वर्षाव चालूच आहे. सुरुवातीला काही दिवसापूर्वी एसटी महामंडळाच्या बसने राज्यभरात कुठेही प्रवास करा अर्धे तिकीट मिळवा. अशी घोषणा केली होती आणि या योजनेचा लाभ राज्यातील आज लाखो महिला भगिनी घेताना दिसत आहेत.
The state government has announced to provide free gas cylinder under "Mukhya Mantri Annapurna Yojana" to the eligible women under "Mukhya Mantri Majhi Ladki Bahin Yojana".
लोकसभेमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे सध्या महायुतीचे सरकार विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना एका मागोमाग एक योजनांची सिरीज चालू केली आहे. या योजनांचा सर्वाधिक लाभ राज्यातील "आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील" तसेच "दारिद्र्य रेषेखालील" कुटुंबांना मिळणार आहे.
The state government has announced to provide free gas cylinder under "Mukhya Mantri Annapurna Yojana" to the eligible women under "Mukhya Mantri Majhi Ladki Bahin Yojana".
महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली योजना "मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना" या योजनेअंतर्गत पात्र महिला कुटुंबांना दरवर्षी ३ मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा केली होती. तसेच "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतील पात्र महिला कुटुंबाला दरवर्षी ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. लवकरच शासन निर्णय निर्गमित करून अंमलबजावणी सुरू करण्याची तयारीही "अन्न व नागरिक पुरवठा" विभागाने सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील उच्च पदस्थसूत्रांनी दिली आहे.
केंद्र सरकारची योजना "प्रधानमंत्री उज्वला योजना" अंतर्गत राज्यामध्ये 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी आहेत. केंद्र सरकारची ही योजना "मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमध्ये" समाविष्ट करण्यात येत आहे. म्हणजेच "प्रधानमंत्री उज्वला योजनेतून कुटुंबाला दरवर्षी जेवढे मोफत गॅस सिलेंडर भेटत होते तेवढेच गॅस सिलेंडर या योजनेतून मिळणार आहेत.
सूचना : केंद्र आणि राज्य सरकारची योजना एकत्र राबवत असल्यामुळे "प्रधानमंत्री उज्वला योजने" अंतर्गत जेवढे सिलेंडर मिळत होते तेवढेच मिळणार आहे. यामध्ये केंद्र सरकारचे वेगळे आणि राज्य सरकारचे वेगळे गॅस सिलेंडर मिळणार नाहीत. म्हणजेच दरवर्षी तुम्हाला तीन गॅस सिलेंडर मिळत असतील तर नेहमीप्रमाणे तुम्हाला तीनच गॅस सिलेंडर मिळणार आहेत.
"मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना" व "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कुटुंबात एका शिधापत्रिकेवर एकापेक्षा अधिक महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलेंडर दिला जाईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थी महिला यांना आपले आधार लिंक करणे आवश्यक आहे. यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम बसेल अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागातील सूत्राने व्यक्त केले.
ज्या महिलांच्या नावे गॅस जोडणी आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तुमच्या नावे गॅस जोडणी नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
महाराष्ट्र राज्यात आज मितिस जवळपास ३ कोटी ४९ लाख कुटुंबाकडे घरगुती गॅस सिलेंडरचे कनेक्शन आहे. त्यातील 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी हे प्रधानमंत्री उज्वला योजनेमधील आहेत.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेचा लाभ जवळपास २.५ कोटी महिलांना मिळणार आहे. त्यापैकी १.५ कोटी कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ येत्या महिन्याभरातच घेता येणार आहे. योजनेचा जीआर जाहीर होताच संबंधित अधिकारी यांना योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आधीच सूचना देण्यात आल्या आहेत. असे अन्न व नागरिक पुरवठा विभागाचे मुख्यपदस्थ अधिकारी यांनी सांगितले.
- एसटी महामंडळाच्या बसने प्रवास केल्यास तिकीट दरामध्ये 50 टक्के सवलत.
- २.५ लाखापेक्षा कमी उत्पन्न किंवा पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असल्यास "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेअंतर्गत दर महिना १५००/- रुपये अनुदान मिळणार.
- "मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत" दरवर्षी ३ मोफत गॅस सिलेंडर मिळणार.
ही माहिती आपला मित्रपरिवार नातेवाईक आणि प्रियजनांना नक्की फॉरवर्ड करा. जेणेकरून या योजनेचा लाभ त्यांना घेता येईल व योजनेची माहिती मिळेल.
The state government has announced to provide free gas cylinder under "Mukhya Mantri Annapurna Yojana" to the eligible women under "Mukhya Mantri Majhi Ladki Bahin Yojana".