Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण २०२४

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024

राज्य शासनाडून दिनांक ०३.०७.२०२४ रोजी प्राप्त GR नुसार "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" या योजनेमध्ये अंशता सुधारणा करण्यात आली आहे. वयाची अट, अर्ज करण्याची मुदत, उत्पन्न दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र इत्यादी मध्ये बदल करण्यात आला आहे. 
 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांनी दिनांक २७.०६.२०२४ रोजी २०२४ चा अर्थसंकल्प जाहिर करताना  "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण २०२४" या योजनेची घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत २१-६५ वयोगटातील महिलांना दर महिना १५००/- रुपये अनुदान मिळणार आहे. या योजने बद्दल पात्रता, नियम आणि अटी इत्यादी माहिती खालील लेखात जाणून घ्या.  Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024


मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण २०२४ योजना चालू करण्याचा उद्देश

  • महाराष्ट्र राज्यातील मुली आणि महिलांना आवश्यक असणाऱ्या सुख सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना मिळावी.
  • राज्यातील महिलां आणि मुलींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे.
  • राज्यातील महिला आणि मुलींना स्वालंबी व आत्मनिर्भर करणे.
  • राज्यातील महिला आणि मुलींच्या सशक्तीकरणास चालना मिळावी.
  • निराधार असलेल्या महिलांच्या मुलांची आरोग्य आणि पोषण स्थित सुधारणा व्हावी.


मुख्यमंत्री - "माझी बहिण योजना २०२४" जी आर, अर्जाचा नमुना आणि हमीपत्र नमुना - पीडीएफ फाईल पाहण्यासाठी टेलिग्राम चैनेल जॉईन करा. 

सरकारी योजना व सरकारी आणि खाजगी नोकरी, शालेय स्कॉलरशिप, ग्रामपंचायत योजना, कृषी योजना इत्यादी योजनांची माहिती मिळवण्यासाठी WhatApp ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now


मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण २०२४ योजनेच्या नियम आणि अटी

  • अर्ज करणारी मुलगी किंवा महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • ज्यांचाकडे १५ वर्ष जुने पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना Domicile Certificate देण्याची गरज नाही.
  • ज्यांचाकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड आहे. त्यांना उत्पन्न दाखला देण्याची गरज नाही.
  • अर्ज सादर करणाऱ्या महिला मुलींचे वय मर्यादा कमाल २१ किमान ६५ वर्ष असावे.
  • लाभार्थी महिला व मुलींच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे. 
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला आणि मुलींचे  बँक खाते असणे आवश्यक आहे. 
  • बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल नंबर हा आधार कार्ड आणि बँक खात्याशी जोडलेला असावा. 

 

अपात्रता- नियम आणि अटी

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त आहे.
  • कुटुंबात कोणी आयकरदाता असेल. म्हणजेच दर वर्षी IT Return करत असेल.
  • ज्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी, निमसरकारी, कंत्राटी, पद्धतीने शासकीय संस्थेत नोकरी करत असेल, किंवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन घेत असेल.
  • राज्य शासनाकडून मिळणाऱ्या इतर योजनांचा १५००/- रुपये किंवा त्यापेक्षा अधिक लाभ घेतला असेल किंवा घेत असेल. 
  • ज्यांच्या कुटुंबात विध्यमान किंवा माजी आमदार/खासदार आहेत.
  • ज्यांचाकडे ४ चाकी वाहन आहे. ( ट्रक्टर वगळून) किंवा एखादे चार चाकी वाहन कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर आहे. 


मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण २०२४ योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज (अर्जाचा नमुना PDF FILE साठी टेलिग्राम चैनेल जॉईन करा)
  • आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी दाखला 
  • महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला.
  • उत्पन्नाचा दाखला ( वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे)
  • बँक खाते पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स.
  • सध्याचा पासपोर्ट आकाराचे ३ रंगीत फोटो.
  • रेशन कार्ड.
  • सादर योजनेच्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. (हमीपत्र नमुना PDF FILE साठी टेलिग्राम चैनेल जॉईन करा)

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण २०२४ अर्ज सादर कसा करायचा.

पात्र महिला आणि मुलींनी अर्ज भरताना लागणारी सर्व कागदपत्रे अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका/ मुख्यासेविका/ सेतू सुविधा केंद्र / ग्रामपंचायत/ ग्रामसेवक/ वार्ड अधिकरी यांचाकडे सादर करावीत. "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण २०२४" योजनेचे अर्ज फक्त ऑनलाई पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज सादर सादर करताना पात्र महिला आणि मुलीनी स्वतः उपस्थित रहाणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा फोटो काढता येईल आणि e-KYC  करण्यात येईल. अर्ज सादर करताना कुटुंबाचे रेशन कार्ड आणि स्वताचे आधार कार्ड घेवून जाणे आवश्यक आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024


अर्ज स्वीकारण्याची सुरुवात दिनांक ०१.०७.२०२४ आणि अंतिम अर्ज स्वीकारण्याची तारीख ३१.०८.२०२४ आहे.


मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण २०२४ - इतर महत्वाच्या तारखा

अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारांची यादी रोजी पोर्टल/अॅपवर जाहीर केली जाईल. तसेच अर्जदारांची यादी अंगणवाडी केद्र/ ग्रामपंचायत/ वार्ड स्तरावरील सूचना फलकावर लावण्यात येईल. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024


अर्जदारांची यादी जाहीर केल्यानंतर, तुमच्या काही समस्या असतील तर अर्जदार यांनी आपली तक्रार अंगणवाडी सेविका/ ग्रामसेवक/ सेतू सुविधा केंद्र यांच्या मार्फत ऑनलाई पद्धतीने दाखल करू शकता. अर्जदारांनी केलेल्या तक्रारीचे निवारण / समस्या सोडवण्यात येतील. 


पात्र लाभार्थ्यांची यादी ०१ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर करण्यात येईल याची नोंद घ्यावी. पात्र लाभार्थ्यांनी अनुदान मिळण्यासाठी दिलेल्या बँक तपशीलानुसार  ०१ ऑगस्ट २०२४ ते १० ऑगस्ट २०२४ या दरम्यान सदर बँकेमध्ये e-KYC करणे बंधनकारक आहे. 


पात्र लाभार्थ्यांनी e-KYC पूर्ण केल्यानंतर अनुदानाचा पहिला हफ्ता दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) हस्तांतरित करण्यात येईल. अशा प्रकारे पुढील अनुदान दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येतील.


उपरोक्त योजनेचा कालावधी समाप्त झाल्यानंतर नवीन नोंदणी करण्यासाठी पुढील कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.  


हे पण वाचा :


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!