अपंग विद्यार्थ्यांच्या कलेला वाव यावा व त्यांच्याकडे असलेली कला जोपासता यावी यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड - National Association for the Blind ( NAB ) संस्थेच्या वतीने राज्यातील पहिले नाट्यगृह नाशिक येथे सातपूर भागात उभारण्यात येत असून त्यासाठी फ्रान्समधील फॉर विवो फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. Maharashtra State's First Theater for the Disabled People at Nashik.
बहु विकलांग विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर त्यांना आवश्यक प्रकाशयोजना, रंगमंचावर पोहोचण्यासाठी रस्ता, व्हील चेअर यास इतर काही गरजा पुरविणे आवश्यक असते. राज्यामध्ये पाहायला गेलं तर बहुतेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सरावासाठी पुरेशी जागा सुद्धा उपलब्ध नाही. महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष बालकांसाठी घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. या सर्व अडचणी आणि अडथळे पार करण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड NAB (National Association for the Blind) संस्थेच्या वतीने उपाययोजना करण्याचे हाती कार्य घेतले आहे.
नाशिक येथील सातपूर भागात संस्थेच्या कार्यालयाच्या आवारात ३०० आसन क्षमतेचे अभिनव पद्धतीचे नाट्यगृह उभारण्यात येत आहे. या नाट्यगृहासाठी फ्रान्स येथील फॉर विव्हो फाउंडेशनने (Vivo Foundation) पुढाकार घेत निधी उपलब्ध करून दिला आहे. हे नाट्यगृह उभारण्यासाठी साधारणता अंदाजे दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या नाट्यगृहात राज्यातील कुठलीही बहु विकलांग शाळा, महाविद्यालय इत्यादी संस्था आपले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करू शकणार आहेत, यासाठी वाहन व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. Maharashtra State's First Theater for the Disabled People at Nashik.
बहु विकलांग बालकांच्या गरजा लक्षात घेता त्यांना अधिक सोयीचे पडेल या पद्धतीने ३०० आसान क्षमतेचे असणारे नाट्यगृह मध्ये उतरण आणि चढण व्यवस्था, व्हीलचेअर, रंगमंचाची रचना, आसन व्यवस्था, स्वच्छतागृह आधी व्यवस्था करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अत्याधुनिक ध्वनी प्रकाश योजना उपलब्ध असणार आहे. या रंगमंचावर शासनाला नाट्य स्पर्धांचे आयोजन करता अशी व्यवस्था करण्यात येत आहे असे NAB चे नाशिक मधील पदाधिकारी मुक्तेश्वर मूनशेट्टीवार यांनी सांगितले. Maharashtra State's First Theater for the Disabled People at Nashik.