१७ जुलै रोजी असणाऱ्या आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना मिळणार २४ तास दर्शन.
Ashadhi-Ekadashi-2024-24-Vithurayachya-darshanasathi-24-taas-mandir-khule |
आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना २४ तास विठुरायाचे दर्शन मिळणार आहे. भाविकांना २४ तास दर्शनाचा लाभ रविवार दिनांक ७ जुलै २०२४ ते शुक्रवार दिनांक 26 जुलै २०२४ या दरम्यान घेता येणार आहे.
भगवान विठ्ठल देवाचा चांदीचा पलंग विधिवत पूजा करून काढण्यात आला आहे. त्यानंतर विठ्ठलाच्या मागे व रुक्मिणी आईच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला असल्याची माहिती श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहा अध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
विठूरायाची दिनचर्या
दररोज पहाटे ४.३० वाजता देवाला अंघोळ आणि विधिवत पूजा करण्यात येईल. या दरम्यान फक्त १ तासा साठी दर्शन बंद करण्यात येईल याची भाविकांनी नोंद घ्यावी.
दुपारी महानैवेध्यला १५ मिनिटे दर्शन बंद ठेवण्यात येईल. तसेच रात्री ९.०० वाजता लिंबू पाणी देण्यासाठी १५ मिनिटे दर्शन बंद ठेवण्यात येईल. अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
सरकारी नोकरी आणि योजनांची माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम चैनेल व WhatsApp ग्रुप जॉईन करा.
वारकरी सांप्रदायाची ३७५ वर्षांची परंपरा
वारकरी सांप्रदायाची ३७५ वर्षांची परंपरा आहे. या परंपरेनुसार आषाढी आणि कार्तिकी वारीच्या दरम्यान भाविकांना विठुरायाचे सुलभ दर्शन व्हावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
शनिवार दिनांक ०६ जुलै २०२४ पासून विठुरायाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. विठुरायाचे व रुक्मिणी मातेचे दर्शन २४ तासांसाठी खुले केल्याने जवळपास ५०-६० हजार भक्तांना आता देवाच्या चरणी माथा टेकता येणार आहे. ६०-७० हजार भाविकांना मुख दर्शन करता येणार आहे.
राम कृष्ण हरी | राम कृष्ण हरी | राम कृष्ण हरी | राम कृष्ण हरी | राम कृष्ण हरी | राम कृष्ण हरी | राम कृष्ण हरी |