पोस्ट ऑफिस महाभरती १० वी पास तब्बल ४४२२८ जागा

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

संपूर्ण भारतात पोस्ट ऑफिसची महाभरती चालू आहे. तब्बल 44228 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता केवळ 10 वी पास आवश्यक आहे. या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करण्यास पात्र आहेत. तुम्हाला कोणतीही परीक्षा किंवा कोणतीही मुलाखत देण्याची आवश्यकता नाही. तुमची थेट निवड इयत्ता दहावीला मिळालेल्या गुणांच्या मेरिट लिस्ट नुसार करण्यात येणार आहे. भरती बद्दल महत्त्वाची माहिती खालील प्रमाणे जाणून घ्या. ही माहिती आपल्या संपर्कातील गरजू विद्यार्थ्यांना नक्की पाठवा. 


Recruitment is going on in post offices all over India. A total of 44228 vacancies are being recruited. Applications have been invited only from 10th pass candidates for this recruitment.



post-office-vacancy-10th-pass-post-44228
post-office-vacancy-10th-pass-post-44228




पात्रता

भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा इयत्ता दहावी मध्ये गणित, इंग्रजी आणि राज्याच्या लोकल भाषेचा विषय घेवून उत्तीर्ण असावा. इयत्ता बारावी किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक वर्गाचे कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांकडे इयत्ता दहावीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भरतीसाठी कोणतीही टक्केवारीची अट नाही उमेदवार फक्त दहावी उत्तीर्ण असावा.



एकूण रिक्त जागा 44228 या तीन पदांसाठी भरण्यात येत आहेत.

(A) BPM - BRANCH POST MASTER (बीपिएम -  ब्रांच पोस्ट मास्टर)


(B) ABPM - ASSISTANT BRANCH POST MASTER (असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर)


(C) GDS - GRAMIN DAK SEVAK ( जीडीएस - ग्रामीण डाक सेवक)



44228 जागांपैकी 3170 रिक्त जागा महाराष्ट्रातील खालील विभागात भरण्यात येत आहे.

यवतमाळ विभाग 120 जागा

अहमदनगर विभाग 66 जागा

अकोला विभाग 65 जागा

अमरावती विभाग 73 जागा

औरंगाबाद विभाग 37 जागा

बारामती विभाग 54 जागा

बीड विभाग 22 जागा

भुसावळ विभाग 38 जागा

बुलढाणा विभाग 38 जागा

चंद्रपूर विभाग 418 जागा

धुळे विभाग 112 जागा

गोवा विभाग 76 जागा

जळगाव विभाग 52 जागा

कराड विभाग 82 जागा

कोल्हापूर विभाग 78 जागा

मालेगाव विभाग 65 जागा

मुंबई नॉर्थ वेस्ट 8 जागा

मुंबई साउथ 1 जागा

नागपूर सिटी 5 जागा

नागपूर ग्रामीण 279 जागा

वर्धा विभाग 59 जागा

नांदेड विभाग 52 जागा

नाशिक विभाग 21 जागा

नवी मुंबई विभाग 50 जागा

उस्मानाबाद विभाग 92 जागा

पालघर विभाग 76 जागा

पंढरपूर विभाग 65 जागा

परभणी विभाग 57 जागा

पुणे ईस्ट 21 जागा

पुणे वेस्ट 6 जागा

पुणे ग्रामीण 121 जागा

रायगड विभाग 152 जागा

रत्नागिरी विभाग 216 जागा

मिरज विभाग 2 जागा

सांगली विभाग 110 जागा

सातारा विभाग 74 जागा

श्रीरामपूर विभाग 62 जागा

सिंधुदुर्ग विभाग 103 जागा

सोलापूर विभाग 49 जागा

ठाणे विभाग 78 जागा


Recruitment is going on in post offices all over India. A total of 44228 vacancies are being recruited. Applications have been invited only from 10th pass candidates for this recruitment.



आवश्यक कागदपत्रे

  • इयत्ता दहावीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड इत्यादी)
  • ओळखपत्र (आधार कार्ड किंवा मतदान कार्ड इत्यादी)
  • मेडिकल सर्टिफिकेट (फिटनेस सर्टिफिकेट)
  • इ डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवार असल्यास उत्पन्नाचा दाखला.
  • एससी किंवा एसटी प्रवर्गातील उमेदवार असल्यास जात प्रमाणपत्र.
  • अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र.
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • सध्याचे पासपोर्ट आकाराचे 5 रंगीत फोटो (फोटो वेगवेगळे नसावे)
  • रहिवासी दाखला.
  • पोलीस वेरिफिकेशन.



वय मर्यादा

या भरतीसाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. नियमाप्रमाणे OBC प्रवर्गाला उमेदवारांना 3 वर्षाची सवलत देण्यात येत आहे. तसेच SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात येत आहे.


अपंग उमेदवारांना नियमानुसार 10 वर्षांची सवलत देण्यात येत आहे.

ओबीसी प्रवर्गातील अपंग उमेदवारांना नियमानुसार 13 वर्षांची सवलत देण्यात येत आहे.

SC/ST (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती) प्रवर्गातील अपंग उमेदवारांना नियमानुसार 15 वर्षांची सवलत देण्यात येत आहे.


5 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 40 या दरम्यान पूर्ण असावे. इतर प्रवर्गांना नियमानुसार वयाची सवलत दिली आहे त्यानुसार त्यांचे वय ०५ ऑगस्ट २०२४ पर्यंत विचारात घेतले जाईल. 


सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते की एका उमेदवाराला एका वेळी एकच अर्ज सादर करता येणार आहे एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास अशा उमेदवारांना अपात्र करण्यात येईल. 


इतर पात्रता

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सायकल चालवता येणे आवश्यक आहे तसेच कम्प्युटरचे बेसिक नॉलेज असणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्याही प्रमाणपत्राची मागणी केलेली नाही.


अर्ज करण्याची पद्धत

पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईटला https://indiapostgdsonline.gov.in/ भेट द्यायचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि फोन नंबर नुसार रजिस्ट्रेशन करायचे आहे. इयत्ता दहावीच्या गुणपत्रकानुसार विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे जसे की स्वतःचे नाव, जन्मतारीख,आई-वडिलांचे नाव आणि विषयांमध्ये मिळालेले गुण इत्यादी. अर्ज भरताना दिलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैद्य असावा. जेणेकरून तुम्ही केलेल्या अर्जाची वेळोवेळी माहिती एसएमएस किंवा ईमेल द्वारे कळवण्यात येणार आहे. टेक्निकल किंवा इतर कारणास्तव तुम्हाला एसएमएस किंवा इमेल द्वारे माहिती प्राप्त न झाल्यास त्यासाठी पोस्ट ऑफिस जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. बऱ्याचदा येणारे इमेल हे स्पॅम फोल्डर मध्ये जात असतात. उमेदवारांनी अर्जाच्या स्थितीबद्दल कोणतीही सूचना मिळाली नसल्यास ई-मेल आयडीचा स्पॅम फोल्डर चेक करत राहणे आवश्यक आहे.


भरतीची जाहिरात आणि राज्य निहाय पदसंख्या पाहण्यासाठी टेलिग्राम चैनेल जॉईन करा. 

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now


महत्त्वाच्या तारखा

अर्ज सादर करण्याची तारीख 15 जुलै 2024 ते 5 ऑगस्ट 2024 या दरम्यान करता येणार आहे.


अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्यातील दुरुस्ती करण्यासाठी 6 ऑगस्ट 2024 ते 8 ऑगस्ट 2024 वेळ मिळणार आहे.


अर्ज सादर केल्यानंतर दहावीच्या गुणपत्रकानुसार मेरिट लिस्ट वेगवेगळ्या टप्प्यात 31 डिसेंबर 2024 पर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. उदाहरणार्थ पहिली लिस्ट पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर केली जाईल, दुसरी लिस्ट तिसऱ्या टप्प्यांमध्ये अशा अनेक लिस्ट 31 डिसेंबर पर्यंत जाहीर करण्यात येतील. त्यामध्ये उमेदवारांनी आपले नाव तपासायचे आहे. पहिल्या यादीमध्ये नाव नसेल तर उमेदवारांनी निराश होण्याची आवश्यकता नाही. 31 डिसेंबर पर्यंत जाहीर होणाऱ्या कोणत्याही मेरिट लिस्ट मध्ये तुमचे नाव येऊ शकते.


Recruitment is going on in post offices all over India. A total of 44228 vacancies are being recruited. Applications have been invited only from 10th pass candidates for this recruitment.


हे पण वाचा : 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना दर महिना १५००/- रुपये अनुदान.


लेक लाडकी योजनेतून मुलींना मिळत आहेत १ लाख १ हजार रुपये.


लहान मुलांची आर्मी भरती वय ८-१६ वर्ष संपूर्ण माहिती जाणून घ्या .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!