Staff Selection Commission has announced 8326 Vacancies for Multi Tasking Staff Posts for 10th passed candidates.
आपलं शिक्षण जर दहावी पूर्ण असेल, तर ही सुवर्णसंधी खास तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारच्या काही खात्यामध्ये विविध ठिकाणी MTS - मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार या पदांची भरती करण्यात येत आहे.
Staff Selection Commission announced 8326 vacancies for MTS posts 10th passed candidates. |
स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) संस्थेद्वारे केंद्र सरकारच्या विविध खात्यामध्ये एमटीएस (Multi Tasking Staff) आणि हवालदार पदांची भरती करण्यात येत आहे. या भरती बद्दलची संपूर्ण माहिती खालील लेखात जाणून घ्या.
केंद्र सरकारच्या विविध खात्यामध्ये किमान दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना हिंदी, इंग्रजी आणि मराठी माध्यमातून परीक्षा देऊन नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ व हवालदार पदांची भरती
"मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ" (Multi Tasking Staff) म्हणजेच MTS आणि हवालदार ( CBIC & CBN ) या पदांसाठी भरती करण्यात येत आहे. Multi Tasking Staff च्या एकूण 4887 जागा रिक्त आहेत. CBIC व CBN हवालदार या पदाच्या एकूण 3439 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. ही भरती ग्रुप सी मधील असून एकूण रिक्त जागा 8326 भरण्यात येत आहेत. उमेदवारांनी भरतीची अचूक आकडेवारी जाणून घेण्यासाठी https://ssc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.शैक्षणिक पात्रता :
उमेदवार हा 1 ऑगस्ट 2024 पूर्वी इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
MTS (Multi Tasking Staff) वय मर्यादा :
दिनांक 1 ऑगस्ट 2024 पूर्वी MTS या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25. तसेच उमेदवाराचा जन्म दोन ऑगस्ट 1999 ते 1 ऑगस्ट 2006 या दरम्यान झालेला असावा.
MTS (Multi Tasking Staff) अंतर्गत असलेल्या काही पदांसाठी वय मर्यादा ही 18 ते 27 वर्ष आहे.
CBIC / CBN वय मर्यादा :
हवालदार या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष पूर्ण असावे उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 1997 ते 1 ऑगस्ट 2006 यादरम्यान झालेला असावा.
वर दिलेली वय मर्यादा ही ओपन कॅटेगरी साठी उल्लेख केला आहे. शासनाच्या नियमानुसार ओबीसी,एससी, एसटी इत्यादी प्रवर्गातील उमेदवारांना वय मर्यादेमध्ये सवलत देण्यात येणार आहे.
Staff Selection Commission has announced 8326 Vacancies for Multi Tasking Staff Posts for 10th passed candidates.
अर्जाचे शुल्क:
अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाचे शुल्क १००/- रुपये ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. (एससी, एसटी, महिला दिव्यांग आणि माझी सैनिक यांना अर्ज शुल्कातून १००% सूट देण्यात आली आहे.)
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली व दमन व दीव या राज्यांचा / केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो.
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र :
पणजी, पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर, नांदेड, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव आणि अमरावती ही महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना कोणतेही तीन परीक्षा केंद्र निवडायची आहेत.
निवड पद्धत :
MTS (Multi Tasking Staff) या पदासाठी कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन (CBE) परीक्षा सत्र एक आणि सत्र दोन प्रमाणे घेण्यात येणार आहे.
CBIC & CBN हवालदार या पदासाठी कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ( CBE) परीक्षा सत्र एक आणि सत्र दोन प्रमाणे घेण्यात येणार आहे. तसेच शारीरिक क्षमता चाचणी (PET) व शारीरिक मापदंड चाचणी (PST) घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑक्टोबर किंवा नंबर 2024 मध्ये आयोजित केली जाईल.
परीक्षा चे स्वरूप
सत्र एक - (I) न्यूमरिकल अँड मॅथेमॅटिकल अबिलिटी 20 प्रश्न 60 गुण (II) रीजनिंग अबिलिटी अँड प्रॉब्लम सॉल्विंग वीस प्रश्न 60 गुण अशा प्रकारे पहिले सत्र असणार आहे. यासाठी तुम्हाला 45 मिनिटं वेळ मिळणार आहे. 45 मिनिटे पूर्ण झाल्यानंतर ऑटोमॅटिक पहिलं सत्र बंद होऊन. दुसऱ्या सत्राची परीक्षा चालू होणार आहे.सत्र दोन - (I) जनरल अवेअरनेस 25 प्रश्न 75 गुण (II) इंग्लिश लैंग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन 25 प्रश्न 75 गुण. या सत्रासाठी सुद्धा 45 मिनिटे वेळ मिळणार आहे.
पहिल्या सत्रातील परीक्षेतील चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. दुसऱ्या सत्रातील परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक गुण वजा केला जाईल.
पहिल्या आणि दोन्ही सत्राची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर योग्य वेळी आन्सर कीज जाहीर केली जाईल.
प्रश्नपत्रिका हिंदी, इंग्रजी, मराठी, कोकणी, कन्नड, गुजराती तामिळ, तेलगू आणि उर्दू इत्यादी १३ भाषांचा पर्याय असणार आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना परीक्षेची भाषा निवडणे आवश्यक आहे.
Computer Based Examination (CBE)
कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन मध्ये उमेदवारांना पात्रतेसाठी सत्र एक आणि सत्र दोन मधील खुल्या वर्गासाठी किमान 30 टक्के गुण असणे आवश्यक आहे.ओबीसी आणि ई डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांसाठी 25% गुण असणे आवश्यक आहे.
SC / ST इत्यादी प्रवर्गातील उमेदवारांना 20 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
जे उमेदवार सत्र एक मधून पात्र ठरणार आहेत त्यांचेच सत्र दोन चे पेपर तपासले जाणार आहेत. MTS पदांसाठी राज्यनिहाय CBE सत्र दोन मधील गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
CBIC व CBN मधील हवालदार पदांसाठी सत्र एक आणि सत्र दोन मधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी (PET) व शारीरिक मापदंड चाचणी (PST) देशभरातील विविध केंद्रावर घेतली जाईल.
शारीरिक क्षमता चाचणी आणि शारीरिक मापदंड चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड सत्र दोन मधील गुणवत्तेनुसार निवड केली जाणार आहे.
शारीरिक क्षमता चाचणी
पीईटी पुरुषांसाठी 1600 मीटर अंतर 15 मिनिटात चालत पूर्ण करणे आवश्यक आहे. महिलांसाठी 1 किलोमीटर अंतर 20 मिनिटात चालत पूर्ण करणे आवश्यक आहे.शारीरिक मापदंड चाचणी
पुरुष : उंची 157.5 सेंटीमीटर आवश्यक आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी 152.5 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे. तसेच छाती 76 ते 81 CM आवश्यक आहे.महिला : उंची 152 सेंटीमीटर आवश्यक आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी 149.5 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे. तसेच छाती 76 ते 81 CM आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांचा लाईव्ह फोटोग्राफ कॅप्चर करण्यासाठी एप्लीकेशन मॉडेल तसेच डिझाईन केले आहे. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराला कॉम्प्युटरवर सूचित केले जाईल तेव्हा उमेदवाराने कॅमेरासमोर डोळ्यांच्या रेषेत कॅमेरा धरावा. चष्मा न घालता फोटो कॅप्चर करायचा आहे. फोटो काढताना मागील बॅकग्राऊंड प्लेन असावे व चांगला प्रकाशमान असावा.
परीक्षेला जाताना उमेदवाराने अलिगडच्या काळातील सध्याचे दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो आणि एक ओळखपत्र ( पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक किंवा फोटो असलेले कोणतेही सरकारी ओळखपत्र) सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
Staff Selection Commission has announced 8326 Vacancies for Multi Tasking Staff Posts for 10th passed candidates.