आळंदी नगरपरिषद मध्ये पदवी उत्तीर्ण लिपिक पदांची भरती
आळंदी नगरपरिषद कार्यालय मध्ये " मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत" शिकावू उमेदवारांची भरती करण्यात येत आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त पदवी उत्तीर्ण व MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भरतीची सविस्तर माहिती या बातमीमध्ये जाणून घेवूया.
Alandi Municipal Council Office is recruiting under "Chief Minister Youth Work Training Scheme". Educational Qualification Only Graduation and MS-CIT |
जा.क्र./आनपा/सा.प्र.वि./८६३/२०२४
भरतीची सविस्तर माहिती
- पदाचे नाव : लिपिक
- शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा तसेच MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- वय मर्यादा : २१-३५ वर्ष
- प्रतिमाह विद्यावेतन : १००००/- हजार रुपये
- एकूण पदसंख्या : ३
- नोकरीचे ठिकाण : आळंदी
Alandi Municipal Council Office is recruiting under "Chief Minister Youth Work Training Scheme". Educational Qualification Only Graduation and MS-CIT
अटी व शर्तीः
१. सदर प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिन्यांकरिता असेल. सदरचा ६ महिन्यांच्या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.
२. सदर प्रशिक्षणासाठी शिकाऊ उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
३. सदर प्रशिक्षणाकरिता शिकाऊ उमेदवाराकडे आधार नोंदणी असावी.
४. सदर प्रशिक्षणाकरिता शिकाऊ उमेदवारांचे बैंक खाते आधार संलग्न असावे.
५. सदर प्रशिक्षणाकरिता शिकाऊ उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजगता आयुक्तालयाच्या www.rojgar.mahawayam.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
६. सदर प्रशिक्षणाकरिता शिकाऊ उमेदवाराची निवड ही मुलाखत प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे.
७. सदर प्रशिक्षणाकरिता पात्र शिकाऊ उमेदवारांची त्यांचे अर्ज पोस्टाद्वारे किंवा समक्ष दिनांक २७/०८/२०२४ पर्यंत आळंदी नगरपरिषद, आळंदी, ता. खेड, जि. पुणे ४१२१०५ येथे सायं. ०५.०० वाजेपर्यंत सादर करावेत.
८. सदर प्रशिक्षणाकरिता महाराष्ट्र शासन शासन निर्मय क्र. संकीर्ण. २०२४/प्र.क्र.९०/ व्यशि. ३ दिनांक ०९ जुलै २०२४ या शासन निर्मयामधील सर्व अटी व शर्ती शिकाऊ उमेदवारांकरिता बंधनकारक राहतील.
कार्यालयाचा पत्ता :
श्री. कैलास केंद्रे, अध्यक्ष, निवड समिती, मु.यु.का.प्र.यो. तथा मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद.
आळंदी नगरपरिषद कार्यालय, आळंदी, ता. खेड, जि.पुणे नगरपरिषद कार्यालय, आळंदी जिल्हा पुणे
Email Id: alandimc2@gmail.com
मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि पण एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून समाजसेवेचे मानकरी व्हा.
हि बातमी आपल्याला आवडली असल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे नक्की कळवा.