Free Government Certificate Courses

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

 छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (SARATHI), पुणे (नियोजन विभागांर्तगत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था)


MSME टेक्नॉलॉजी सेंटर, इंडो जर्मन टूल रूम (IGTR), औरंगाबाद (भारत सरकारची संस्था, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय)

Govt of India 18+ Free courses by Sarathi and IGTR
Govt of India 18+ Free courses by Sarathi and IGTR 


SARATHI पुणे व इंडी जर्मन टूल रूम (IGTR) यांच्या द्वारे मराठा / कुणबी / कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमीलेअर गटाच्या युवक-युवती साठी पुर्णवेळ, अनिवासी, निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खाली दर्शविलेल्या Courses  साठी इच्छुक व पात्रताधारक उमेदवाराकडुन विहीत नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत.

 

18 Free Corses by sarathi and IGTR 10th pass and above candidates
18 Free Corses by sarathi and IGTR 10th pass and above candidates

 १. उपरोक्त उल्लेख कौशल्य विकास प्रशिक्षण हे (FREE) निः शुल्क / मोफत असुन सदर प्रशिक्षणाचा प्रशिक्षण खर्च सारथी, पुणे यांचे मार्फत करण्यात येणार आहे.


२. उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे पूर्णकालीन असुन, सदर कौशल्य विकास प्रशिक्षण IGTR, औरंगाबाद या राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारच्या संस्थेद्वारे छत्रपती संभाजी नगर व या संस्थेच्या वाळूंज छत्रपती संभाजी नगर , पुणे, नागपूर व कोल्हापुर उपकेंद्रात (सब सेंटर) देण्यात येईल.


३. सदर प्रशिक्षण हे अनिवासी (Non Residential) असून, प्रशिक्षणा दरम्यान राहणे व जेवणाची व्यवस्था प्रशिक्षणार्थ्यांस स्वः खर्चाने करावी लागेल.


४. मराठा / कुणबी /  कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमीलेयर गटाच्या वयोगट १८ ते ३५ मधील गरजू व इच्छुक पात्रता धारक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज व त्या अनुषंगिक कागद‌पत्रासह सादर करावेत. Free Government Certificate Courses by SARATHI & IGTR


५ . संबंधित उमेदवारांनी निवडीच्या वेळी कार्यक्रमस्थळी मुळ कागदपत्रासह स्व खचर्चाने उपस्थित राहावे याची नोंद घ्यावी.


६ . प्राप्त अर्जामधुन निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करून निवडक उमे‌द्वारांना पात्रता प्रवेश परिक्षा व मुलाखती साठी बोलावण्यात येईल, पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, अपुर्ण असलेले तसेच मुदती नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. (पात्रता प्रवेश परिक्षा इंग्रजी, गणित, व सामन्यज्ञान या विषयावर आधारीत असेल)


७. उमेदवारास नॉन क्रिमिलेयर किंवा EWS (Economically Weaker Section) असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.


८ ज्या उमेदवाराकड़े जातीचे प्रमाणपत्र नसेल अशा उमेदवारांची जात ही शाळा / महाविद्यालय सोडल्याच्या दाखल्यावरुन (टी सी / एल सी) ग्राह्य धरण्यात येईल.


९. उमेदाचारांनी ज्या प्रशिक्षण केंद्राची निवड केली आहे त्याच प्रशिक्षण केंद्रावर त्यांची पात्रता प्रवेश परीक्षा, मुलाखत व कागद पत्रांची पडताळणी करण्यात येईल.


१०. ज्या उमेदवारांना IGTR औरंगाबाद, पुणे, नागपूर व कोल्हापूर यापैकी जिथे प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर (Website) जाऊन ऑनलाईन अर्ज सादर कारावेत. ( Google Form - अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे )


११. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी IGTR व सारथीच्या  (दोन्ही website च्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत) संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यायत येईल.


१२. प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर, उमेदवारांस प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण मध्येच सोडुन जाता येणार नाही.


१३. एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणाची संख्या मंजूर संख्येपेक्षा कमी पडत असेल तर तो अभ्यासक्रम सुरु होण्यास विलंब होऊ शकतो.


१४ प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे घटक, कालावधी, स्थान व प्रवेश क्षमतेबाबतचे सर्व अधिकार संस्थेकडे राखीव असतील. Free Government Certificate Courses by SARATHI & IGTR

 

महत्वाच्या तारखा : 

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख: ०७/०९/२०२४

पात्रता प्रवेश परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी व मुलाखत: १०/०९/२०२४

प्रशिक्षण सुरु होण्याची तारीख: १७/०९/२०२४

 

प्रशिक्षण ठिकाण: इडो जर्मन टूल रूम, औरगाबाद व IGTR चे वाळूंज औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापुर उपकेंद्र (सबसेंटर) या ५ शहरात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

 

आवश्यक कागदपत्र : 

अर्जासोबत अपलोड / जोडावयाची कागदपत्रे :१) विहीत नमुन्यातील व फोटोसहीत परिपुर्ण अर्ज २) प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक व व्यवसायिक प्रमाणपत्र (दहावी, बारावी, आय टी आय, डिप्लोमा, डिग्री, ईत्यादी.) ३) जातीचे प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला (टी सी / एल सी) ४) जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (कुणबी प्रवर्गासाठी) ५)ई डबल्यु एस / एस ई बी सी व नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (मराठा प्रवर्गासाठी) ६) जन्म दाखला ७) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणत्र ८) आधार कार्ड ९) स्वतःचा फोटो १०) स्वतःची राही ११) मेडीकल फिटनेस सर्टीफिकेट. Free Government Certificate Courses by SARATHI & IGTR

 

नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdmudcFm4AIOilXeHaVC86tICuYkMuIPYkPOjPwaxtsI9oSoQ/viewform?pli=1

 

अधिक माहितीसाठी खाली पत्त्यावर भेट किंवा टेलिफोन व मोबईल नंबर वर संपर्क साधा. 


MSME TECHNOLOGY CENTRE INDO GERMAN TOOL ROOM, AURANGABAD

P-31, MIDC, Chikalthana Industrial Area, AURANGABAD, 431 006 Maharashtra


Phone: (0240) 2610100 Extension: 411,430,431,432  

Mobile No  9373161252 / 9373161253


E-mail: info@igtr-aur.org


Web Site: https://www.igtr-aur.org/    

Sarathi Official Website : https://sarthi-maharashtragov.in/

 

 

 IGTR EXTENSION/SUB CENTRES

 

Pune

IGTR MSME DI CAD/CAM

TRAINING CENTRE EXTENSION CENTRE, PUNE-1

Near PMT Workshop, Shakarshet Road, M.S. INDIA, Swargate, Pune 411037 Phone: 91 (020) 24440861

Mobile No: 9373050101 E-mail igtr_pune@yahoo.co.in

 

 

NAGPUR

INDO GERMAN TOOL ROOM, AURANGABAD

EXTENSION CENTRE, NAGPUR P-142. MIDC HINGNA

NAGPUR -440028 MAHARASHTRA INDIA  Tel. No. (07104) 297136.

Mobile No. 9075096552 E-Mail: training_ngp@igtr-aur.org

 

 

KOLHAPUR

"ADVANCED TECHNLOGY CENTRE IGTR, AURANGABAD

EXTENSION CENTRE, KOLHAPUR Shivaji University, Vidya Nagar, Kolhapur-416004 Maharashtra INDIA

Mobile No.: 9423801370 /  8806615925 

E-Mail: atckolhapur@igtr-aur.org  /  cdr.adtech@unishivaji.ac.in

 

Chhatrapati Sambhaji Nagar - Walunj

IGTR AURANGABAD EXTENSION CENTRE (WALUJ)

Plot No. P-179, MIDC Industrial Area Walunj-431136

Chhatrapati Sambhaji Nagar, Maharashtra, INDIA 

Mobile No. 9881718593 / 9373161256 

Email Id igtrecwalunj@igtr-aur.org


फ्री कोर्सची PDF जाहिरात पाहण्यासाठी टेलिग्राम चैनेलWhatsApp Group जॉईन करा. 


मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा. 

 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!