महिला आर्थिक विकास महामंडळात नोकरीच्या संधी

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

सांगली जिल्ह्यातील मिरज आणि आष्टा तालुक्यात “महिला आर्थिक विकास महामंडळ” मध्ये नोकरीच्या विविध संधी उपलब्ध पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १२.०९.२०२४ पूर्वी खालील पत्त्यावर पाठवावेत. भरती बद्दल पात्रता, नियम अटी इतर संपूर्ण माहिती पुढील बातमी मध्ये जाणून घ्या. 


Job Opportunities in Women Economic Development Corporation in Miraj and Ashta Taluka of Sangli District
Job Opportunities in Women Economic Development Corporation in Miraj and Ashta Taluka of Sangli District


जिल्हा सांगली - मिरज आणि अष्ठा येथे नोकरीच्या संधी

महिला आर्थिक विकास महामंडळ, सांगली अंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील लोकसंचलित साधन केंद्रामध्ये (Community Managed Resource Center- CMRC) मध्ये विविध योजनेअंतर्गत करार तत्त्वावर ११ महिने कालावधीकरिता खालीलप्रमाणे पदे भरावयाची आहे.


Job Opportunities in Women Economic Development Corporation in Miraj and Ashta Taluka of Sangli District


पदाचे नाव : व्यवस्थापक

नियुक्तीचे ठिकाण व पद संख्या : सावित्री लोकसंचलित साधन केंद्र आष्टा ( पदसंख्या १)

शिक्षण : MSW / MA (समाजशास्त्र, अर्थशास्त्र, विषयक पदवी)

वय मर्यादा : २१ ते ३८ वर्षे

अनुभव : बचतगटविषयक तसेच कार्यक्षेत्रीय कामाचा अनुभव व कार्यालयीन कामाचा किमान २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

वेतन : अनुभवानुसार रु. १२०००/- ते रु. १५०००/- पर्यंत मानधन देण्यात येईल.


पदाचे नाव : लेखापाल

नियुक्तीचे ठिकाण व पद संख्या : सावित्री लोकसंचलित साधन केंद्र आष्टा (पदसंख्या १) नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र मिरज (पदसंख्या १)

शिक्षण : B.Com, M.Com

वय मर्यादा : २१ ते ३८ वर्षे

अनुभव : १) लेखाविषयक तसेच कार्यालयीन कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वेतन : अनुभवानुसार रु. ८०००/- ते रु.१००००/- पर्यंत मानधन दिले जाईल.


पदाचे नाव : उपजीविका सल्लागार

नियुक्तीचे ठिकाण व पद संख्या : सावित्री लोकसंचलित साधन केंद्र आष्टा (पदसंख्या १)

शैक्षणिक अर्हता व अनुभव : १) उपजीविका सल्लागार कृषी / पशुसंवर्धन किंवा तत्सम निगडित क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. 

२) संबंधित कार्यक्षेत्रात काम करण्याचा किमान २ वर्षांचा पदव्युत्तर अनुभव. 

३) व्हॉत्युचेन प्रकल्प आखणी राबविण्याचा अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, 

४) MSCIT / तत्सम डिप्लोमा आवश्यक आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड / एक्सेल वापरता येणे अत्यावश्यक आहे.

वय मर्यादा : १८-४० वर्षापर्यंत

वेतन : प्रति माह रु १५०००/- पर्यंत मानधन (नियमानुसार सेवा कर) अनुभव व पात्रतेनुसार मानधन ठरविण्याचे अधिकार संबंधित सीएमआरसी अध्यक्ष यांचेकडे राहील.


पदाचे नाव : मार्केटींग एक्स्पर्ट

नियुक्तीचे ठिकाण व पद संख्या : सलामत अल्पसंख्याक लोकसंचलित साधन केंद्र मिरज (पदसंख्या १) 

शैक्षणिक अर्हता व अनुभव : १) महिलांच्या व्यवसाय आराखडा, बिझनेस प्लान तयार करणे 

२) मार्केटिंग मेळावे आयोजित करणे व्यवसायवाढीसाठी विविध माध्यमांचा वापर करणे 

३) विविध व्यावसायिक लोक, संस्था यांच्याशी भागीदारी करणे आणि व्यवसाय वाढवणे 

४) प्रोडक्ट डेव्हलपमेंट, branding, packaging  इत्यादी तयार करण्यास व प्रत्यक्ष अमलात आणणे 

५) व्यवसाय वाढीसाठी बाजारातील इतर संस्था, व्यक्ती, यांच्याशी संबंध प्रस्थापित करणे. 

वय मर्यादा : २५ ते ४५ पर्यंत

वेतन : प्रति माह रु. १५००० ते २०००० पर्यंत अनुभवानुसार मानधन ठरविण्याचे अधिकार संबंधित सीएमआरसी अध्यक्ष यांचेकडे राहील.


महत्वाची सूचना : 

स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तरी वरील पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर दिनांक १२/०९/२०२४ पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सार्वजनिक सुट्या सोडून वर नमूद पदाकरिता संबंधित लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षांच्या नावे अर्ज करावेत. पाकिटावर ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. अर्जासोबत सर्व शैक्षणिक व व्यवसायिक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. १२.०९.२०२४ नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. 


Job Opportunities in Women Economic Development Corporation in Miraj and Ashta Taluka of Sangli District


अर्ज करण्यासाठीचा पत्ता :  

१.) सावित्री लोकसंचलित साधन केंद्र, आष्टा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दत्त मंदिर शेजारी, सूर्योदय इमारत, दुसरा मजला, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली. पिन कोड ४१६३०१ 


(२) नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र मिरज पंचायत समिती मिरज, DRDA ऑफिस शेजारी, मिरज, ता. मिरज जिल्हा - सांगली पिन कोड ४१६४१० 


(३.) सलामत अल्पसंख्याक लोकसंचलित साधन केंद्र मिरज दत्त मंदिर मैदान, रेवणी गल्ली, पटेल एम्पायर, दुसरा मजला मिरज, ता. मिरज, जि. सांगली पिन कोड ४१६ ४१०.


अध्यक्षा

सावित्री लोकसंचलित साधन केंद्र, आष्टा. 

नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र, मिरज 

सलामत अल्पसंख्याक लोकसंचलित साधन केंद्र, मिरज


मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा. 


हे पण वाचा : 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!