मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अर्ज स्वीकृती बंद नवीन पोर्टल चालू

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 3 वेळा बदल करण्यात आलेला आहे. आज अखेर दिनांक 4 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजने बद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. नवीन पात्रता, आवश्यक कागदपत्रांमध्ये झालेले बदल इत्यादी. 

नवीन पात्रता, आवश्यक कागदपत्रांमध्ये झालेले बदल

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Application Acceptance Closed | New portal Launch
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Application Acceptance Closed | New Portal Launch



आवश्यक कागदपत्र

आधार कार्ड  : अर्ज भरताना आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करणे आवश्यक आहे.

अधिवास प्रमाणपत्र : अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर  महिलेचे 15 वर्षांपूर्वीचे राशन कार्ड / 15 वर्ष पूर्वीचे मतदान कार्ड / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला / यापैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक आहे.

महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास : पतीचे 15 वर्षांपूर्वीचे राशन कार्ड / 15 वर्ष पूर्वीचे मतदान कार्ड / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला / यापैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक आहे.

वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी: पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही.
शुभ्र राशन कार्ड असल्यास अथवा कोणतेही राशन कार्ड नसल्यास वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला.

नवविवाहित : राशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास, विवाह प्रमाणपत्र असलेल्या नवं विवाहितेच्या पतीचे राशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाईल.

बँक खाते तपशील : बँक खाते आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तसेच आधार कॉर्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे.

हमीपत्र : लाभार्थी महिलेचे हमीपत्र तसेच सध्याचा पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Application Acceptance Closed | New portal Launch

पात्रता

पात्रता : या योजनेचा लाभ 21 ते 65 वयोगटातील महिलांना मिळणार आहे. विवाहित / विधवा / घटस्फोटीत / परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असा लाभ मिळणार आहे.

ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत.  तथापि 2.50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.

सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500/- रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे ही अट या योजनेतून वगळण्यात आली आहे.

सदर योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 असून.  31 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज करणाऱ्या पात्र महिलेंना 1 जुलै 2024 पासून दर महिना 1500/- रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे.

31 ऑगस्ट 2024 रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख असली तरी हा योजनेचा पहिला टप्पा आहे.  ज्या महिलांना कागदपत्रातील काही त्रुटी असल्यामुळे किंवा अपूर्ण कागदपत्रामुळे अर्ज करू शकत नाहीत. अशा महिलांना 31 ऑगस्ट 2024 नंतर अर्ज नोंदणीचा दुसरा टप्पा चालू होईल तेव्हा त्यांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे. कुटुंब याचा अर्थ पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले आणि मुली असा आहे.

केंद्र शासनाच्या विविध योजनांमधील (उदा. PM-KISAN / POSHAN / MGNREGS / PM-SVANIDHI / JSY / PMMVY ) या योजनांमधील लाभार्थी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्तीनुसार लाभ घेण्यास पात्र आहेत.


नवीन पोर्टल चालू

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने नवीन पोर्टल चालू केले आहेत त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे. https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवरून नवीन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.


नारीशक्ती दूत ॲप बंद

नारीशक्ती दुत ॲप 4 ऑगस्ट 2024 पासून बंद करण्यात आले आहे. सध्या या ॲपच्या माध्यमातून लाखोच्या संख्येमध्ये अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी आणि छाननी करण्यासाठी हे ॲप बंद करण्यात येत आहे. ज्यांनी या ॲपद्वारे अर्ज सादर केले आहेत त्यांना अर्जाची सद्य परिस्थिती काय आहे हे फक्त पाहता येणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

ज्या महिला ऑनलाईन अर्ज करण्यास असमर्थ आहे अशा महिलांनी सेतू सुविधा केंद्रातून अर्ज भरावा किंवा अंगणवाडी सेविका यांची मदत घ्यावी.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Application Acceptance Closed | New portal Launch

अर्जाचे शुल्क

अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची आवश्यकता नाही. राज्य सरकार प्रति अर्जामागे अंगणवाडी सेविका तसेच सेतू सुविधा केंद्र यांना प्रति अर्ज 50 रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे.

ज्या महिलांनी आज अखेर मराठी भाषेमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांचे फॉर्म स्वीकारले जाणार आहेत. महिलांना विनंती आहे अर्ज भरताना शक्यतो इंग्रजी भाषेमध्ये भरावा.

आज अखेर प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र असलेल्या अर्जदार महिलांच्या खात्यावर पडताळणीचा भाग म्हणून 1/- रुपया पाठवण्यात येत आहे. महिलांनी याबाबत कोणताही गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही.

1/- रुपया पाठवण्याचा पडताळणीचा भाग पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यावर रक्षाबंधन पूर्वी म्हणजेच 14 ऑगस्ट 2024 रोजी दोन हप्त्याचे पैसे (जुलै आणि ऑगस्ट) महिन्याचे  3000/- रुपये थेट महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी महिला हेल्पलाइन टोल फ्री 181 या क्रमांकावर संपर्क साधावा.

पुढील लेखामध्ये जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र असलेल्या महिलांना नव्याने चालू करण्यात आलेली योजना"मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दर वर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. तसेच राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी नव्याने चालू केलेली योजना "पिंक इ रिक्षा" या योजनेचा देखील लाभ घेता येणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!