मुंबई हायकोर्ट ४ थी पास भरती

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

मुंबई उच्च न्यायालय येथे स्वयंपाक विभागासाठी महिला आणि पुरुषांची भरती.
मुंबई उच्च न्यायालय येथे स्वयंपाक या पदासाठी भरती करण्यात येत आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त चौथी पास आवश्यक आहे. निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित दिलेल्या नमुन्यात खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.

Bombay High Court 4th passed female and male recruitment for the post of cook.
Bombay High Court 4th passed female and male recruitment for the post of cook.

उमेदवारांनी अर्ज हा केवळ स्पीड पोस्ट ने पाठवावा इतर कोणत्याही मार्गाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. विहित नमुन्यातील भरलेला अर्ज 16 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5:00 पर्यंत पोहोचला पाहिजे. इतर कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज किंवा 16 तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

Bombay High Court 4th passed female and male recruitment for the post of cook.

उमेदवारांनी अर्ज पाठवताना पाकिटावर "स्वयंपाकी पदासाठी अर्ज" स्पष्ट आणि ठळक अक्षरात लिहावे.

पात्रता

अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी चौथी उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.  उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षा मोठा नसावा. नियमानुसार मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षाची असेल. उमेदवार न्यायालयीन / शासकीय कर्मचारी असल्यास विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन /  शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयाची अट नाही. Bombay High Court 4th passed female and male recruitment for the post of cook.

पात्र उमेदवारांकरिता नियम आणि अटी

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी तसेच निवड झाल्यानंतर करण्यात आलेला करार करण्यास सक्षम असावा. अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही गुन्ह्यात दोषी नसावा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे लग्न एकापेक्षा अधिक झालेले नसावे.
  • अर्ज करणार्‍या व्यक्ती दोन पेक्षा अधिक अपत्य असू नये.

अर्जाचे शुल्क:

300/- रुपयांचा डिमांड ड्राफ्ट" Assistant Registrar for Registrar General Higt Court A.S. Bombay" या नावे बनवून अर्जासोबत जोडायचा आहे.

निवड प्रक्रिया:

प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूची प्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल

स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा:

  • स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा ३० गुनांसाठी असणार आहे.  या परीक्षेत कमीत कमी १५ गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी १० गुणांची असेल.
  • तोंडी मुलाखत १० गुणांची असेल.

आवश्यक कागदपत्र:

  1. आधार कार्ड
  2. स्वतः प्रमाणित केलेल्या खालील कागदपत्रांच्या  छायांकीत प्रत अर्जासोबत जोडायच्या आहेत.
  3. इयत्ता ४ थी, १० वी, १२, वी किंवा डिप्लोमाचे शैक्षणिक गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र इत्यादी.
  4. जन्म प्रमाणपत्र : शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला / जन्माचा उल्लेख असेल तर १० वी चे प्रमाणपत्र / या पैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक.
  5. स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला.
  6. अर्जदार यांनी त्यांना बनवता येत असलेल्या पाककृतींची / पदार्थांची यादी अर्जासोबत जोडावी.
  7. दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेला सध्याचा चारित्र्य संपन्नतेचा दाखला. ( त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर सहीत )
  8. जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी).
  9. अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल सर्टिफिकेट).
  10. उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला.
  11. विशेष अहर्ता असल्याबाबतचा दाखला.
  12. सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
  13. उमेदवार शासकीय कर्मचारी असेल तर सक्षम अधिकाऱ्यांची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  14. अर्जदार विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नाव बदलले असेल तर तिच्या नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज जसे की शासकीय राजपत्र सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी.
  15. सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
  16. अर्जासोबत स्वतःचा पत्ता लिहिलेला व पाच रुपयाचे तिकीट लावलेले पोस्टाचे पाकीट जोडावे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : 


" स्वयंपाकी पदासाठी अर्ज" पाकिटावर असा उल्लेख करा. 

पत्ता : प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय,
अपील शाखा, मुंबई, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत,
जी टी रुग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग,
मुंबई ४००००१

भारतीय जाहिरात आणि अर्जाचा नमुना मिळवण्यासाठी टेलिग्राम चैनल आणि व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ही माहिती आपल्या संपर्कातील मित्रमंडळी तसेच नातेवाईक यांना फॉरवर्ड करा. तुमचा एक फॉरवर्ड मेसेज एका त्याला आयुष्यभराची रोजी रोटी देऊ शकतो. Bombay High Court 4th passed female and male recruitment for the post of cook.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.

उमेदवारांना विनंती आहे अर्ज करण्यापूर्वी भारतीय ची जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!