नागरी सहकारी बँक लिपिक पदांची भर्ती

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

 Jalgaon आणि Nashik जिल्ह्यातील ५ शाखेत भरती 

The Maharashtra Urban Co-operative Bank Federation Limited बँकतर्फे नागरी सहकारी बँक मध्ये जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर आणि धुळे येथील शाखांमध्ये कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)  पदांची भरती करण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीची संपूर्ण माहिती पुढील लेखात जाणून घ्या.   

Nagari Sahakari Bank Recruitment for Junior Clerk Posts for Jalgaon and Nashik District Branches.
Nagari Sahakari Bank Recruitment for Junior Clerk Posts for Jalgaon and Nashik District Branches.


भरतीचा सारांश

Maharashtra राज्यात Jalgaon आणि Nashik जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ७ शाखांद्वारे कार्यरत असलेली आणि सुमारे २०७.२७ कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या जळगाव स्थित येथील एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत 'कनिष्ठ लिपिक' (Junior Clerk) या पदांसाठी  The Maharashtra Urban Co-operative Bank Federation Limited Mumbai यांचे माध्यमातून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झालेच्या दिनांकापासून  इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज Online पद्धतीने शनिवार दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता पासून ते ०७ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सादर करायचे आहेत. पदांचा सर्व तपशील, महत्वाच्या तारखा, पात्रता, सूचना, नियम आणि अटी खालीलप्रमाणे देण्यात आले आहे. 


Nagari Sahakari Bank Recruitment for Junior Clerk Posts for Jalgaon and Nashik District Branches.


पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक - Junior Clerk

  • एकूण पद संख्या : १२
  • नोकरीचे ठिकाण : Jalgaon / Nashik, Buldhana / Chhatrapati Sambhaji Nagar / Dhule
  • अर्ज करण्याची पद्धत : Online
  • वय मर्यादा : २२-३५ वर्ष ( २४ ऑगस्ट २०२४ पर्यंत वय मर्यादा विचारात घेतली जाईल) 
  • शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • प्राधान्य :  १) JAIB / CAIB / GDC & A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBF, VAMANICOM इत्यादी ) बँकिंग, सहकार, कायदेविषयक पदविका. २) बँक, पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थामध्ये कामकाजाचा अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. 
  • वेतन : २०७६०
  • भरती प्रक्रिया : उमेदवारांची १०० गुणांची बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा फेडरेशन यांच्या मार्फत घेण्यात येणार आहे.  Junior Clerk लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
  • भाषा : मराठी / हिंदी / इंग्रजी भाषा लिहिता वाचता आणि बोलण्यामध्ये प्रभुत्व असणे आवश्यक आहे. 
  • परीक्षेचे स्थळ : एस ए बाहेती महाविद्यालय कॉमर्स कॉलेज मणियार लॉ कॉलेज शेजारी, खोज्मिया रोड, जळगाव महाराष्ट्र.
  • परीक्षा शुल्क : Junior Clerk पदासाठी परीक्षा शुल्क रुपये १०००/- अधिक १८ % टक्के GST असे एकूण रुपये ११८०/-  Online पद्धतीने भरावे लागेल. 


महत्वाच्या तारखा : 

  1. परीक्षा दिनांक : २२ सप्टेंबर २०२४ 
  2. अर्ज स्वीकारण्याची तारीख : २४ ऑगस्ट २०२४
  3. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : ०७ सप्टेंबर २०२४. 

Nagari Sahakari Bank Recruitment for Junior Clerk Posts for Jalgaon and Nashik District Branches.

महत्वाच्या सूचना : 

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना  ३ वर्षाचा Bond करार करणे आवश्यक आहे. तसेच रुपये २५०००/- हजार रुपये एवढी रक्कम Deposit म्हणून संबंधित Bank मध्ये जमा करणे आवश्यक आहे. उमेदवार यांनी ३ वर्ष कालावधी पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिल्यास सदर सुरक्षा ठेवा जमा रुपये २५०००/- हजार रुपये जप्त केली जाईल. तसेच सदर Deposit वर संबंधित उमेदवारास कोणत्याही स्वरूपाचे व्याज दिले जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. 


आपल्या संपर्कातील  Jalgaon, Nashik, Buldhana, Chhatrapati Sambhaji Nagar, and Dhule या शहरातील गरजू लोकांना हि बातमी जास्तीत जास्त फोरवर्ड करा. जेणेकरून या भरतीचा लाभ त्यांना घेता येईल. 


मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा. 

 

Official Website : https://www.mucbf.in/

Contact Number : 7028495729 ( Morning 11.00 am  - 5.00 pm Evening)
 
Application Link : https://rect-119.mucbf.in/new-registration



Nagari Sahakari Bank Recruitment for Junior Clerk Posts for Jalgaon and Nashik District Branches.


हि बातमी आपल्याला आवडली असल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे नक्की कळवा.


हे पण वाचा : 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!