PradhanMantri Awas Yojana नियम शिथिल व ५ वर्ष मुदत वाढ

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

मोटारसायकलफ्रीज असेल तरीही (PMAY) Pradhanmantri Awas Yojana योजनेचा लाभ मिळणार.   

PMAY pradhanmantri awas yojana Rural & Urban
PMAY pradhanmantri awas yojana Rural & Urban


प्रधानमंत्री आवास योजना ५ वर्षांसाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. मोटारसायकल, फ्रीज असेल तरीही (PMAY) Pradhanmantri Awas Yojana योजनेचा लाभ मिळणार.  


केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना २०१५ रोजी सुरू केली आहे. या योजनेमार्फत गरीब कुटुंबाना घरे दिली जातात. आता प्रधानमंत्री आवास योजना ( PMAY ) ग्रामीण भागातील काही नियम शिथिल केले आहेत. आतापर्यंत अनेकांनी घरांसाठी अर्ज केले आहेत. जेव्हा जेव्हा सरकारकडून अधिकारी पडताळणीसाठी / चौकशीसाठी येत होते. काही लाभार्थी यांना नियमाच्या आधारे त्यांना अपात्र घोषित करण्यात आले होते. मात्र आता सरकारने या योजनेत अनेक बदल केले आहेत. त्यामुळे घरकुलाचा लाभ ( PMAY ) सर्वसामान्यांना सुद्धा मिळणार आहे. Relaxation in some rules and extension of 5 years. (PMAY) The benefit of Pradhan Mantri Awas Yojana will be available even if you have a motorcycle or a refrigerator.


केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना २०१५ साली सुरू केली होती. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबाना राहण्यासाठी घर नाही, अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबाना या योजनेचा लाभ देण्यात येतो. ज्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मातीच्या घरात होता. अशा कुटुंबाना या योजनेंतर्गत अनेकांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे. शासनाने काही दिवसापूर्वीच या योजनेच्या पात्रतेबाबत नियम शिथिल केले आहेत.


आता ज्यांचे मासिक उत्पन्न १५०००/- हजार रुपये आहे. घरी लँडलाइन फोन आहे. याशिवाय ज्यांच्याकडे मोटारसायकल आणि फ्रीज असेल तरीसुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. यापूर्वी अर्जदाराचे मासिक उत्पन्न १०,०००/- हजार रुपये असल्यास आणि त्याच्याकडे दुचाकी असल्यास त्याला योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यांची नावे यादीतून काढण्यात येते होती. केंद्र सरकारने जुन्या नियमात बदल केले आहेत. लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी तीन हप्त्यांमध्ये १,२०,०००/- हजार रुपये अनुदान दिले जाते. यामध्ये पहिला हप्ता ७० हजार रुपये,  दुसरा हफ्ता ४० हजार रुपये आणि तिसरा हप्ता १०,०००/- हजार रुपये आहे.


Relaxation in some rules and extension of 5 years. (PMAY) The benefit of Pradhan Mantri Awas Yojana will be available even if you have a motorcycle or a refrigerator.

 

प्रधानमंत्री आवास योजना ( PMAY ) Pradhanmantri Awas Yojana


एसटी, एसबीसी व अल्पसंख्याकांना घरकुल द्या


आपलेही एक हक्काचे घर असावे, ही प्रत्येक सर्वसामान्य माणसाची इच्छा असते. 'सर्वासाठी घरे' हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार पात्र लाभार्थी भटक्या जमाती, एसबीसी व अल्पसंख्याकांना सुद्धा स्वतःचे हक्काचे घरकुल देण्यात यावे. अशी मागणी एसटी, एसबीसी व अल्पसंख्याक प्रवर्गातील कुटुंब यांच्याकडून करण्यात येत आहे.


मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा. 

 

Official Website : https://pmaymis.gov.in/default.aspx


Contact Number : 011 - 23060484 / 23063620

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!