राज्यातील सरकारी नोकरीच्या संधी
- माता अनुसया आरोग्य सेवा केंद्र, नागपूर
- महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड - मुंबई, छत्रपती संभाजी नगर
- बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda, Mumbai
- साई संजीवनी को-ऑप बँक लि. कोपरगाव, अहमदनगर
- महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मुंबई
- पोलीस आयुक्त नवी मुंबई
- पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे
- महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ, सोलापूर, नागपूर, बारामती
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण
- ठाणे महानगरपालिका, ठाणे
- समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका
- महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित, महानिर्मिती महाराष्ट्र
संस्थेचे नाव : माता अनुसया आरोग्य सेवा केंद्र, नागपूर
किमान १० वी उत्तीर्ण व कमाल B.A.M.S असलेल्या वाहन चालक, ड्रेसर, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा अटेन्डट, नेत्र चिकीत्सा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, या पदांसाठी एकूण १३ जागा भरण्यात येत आहेत. वयाची कोणतीही अट नाही.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : B.A.M.S.
पदसंख्या : २
पदाचे नाव : ANM.
शैक्षणिक पात्रता : NURSING DIPLOMA
पदसंख्या : २
पदाचे नाव : स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : B.Sc. Nursing
पदसंख्या : २
पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : D.M.L.T.
पदसंख्या : २
पदाचे नाव : नेत्र चिकित्सा सहायक
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा
पदसंख्या : २
पदाचे नाव : वाहन चालक
शैक्षणिक पात्रता : वाहन परवाना
पदसंख्या : १
पदाचे नाव : प्रयोगशाळा सहायक
शैक्षणिक पात्रता : १२ वी पास
पदसंख्या : ०१
पदाचे नाव : ड्रेसर
शैक्षणिक पात्रता : १० वी पास
पदसंख्या : ०१
मुलाखतीची तारीख : ०२.१०.२०२४
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
डॉ. नं. चि. चौधरी, सल्लागार सदस्य, मोब. 9284857912
डॉ. मोनाली हेमंत चौधरी, कार्यकारी अध्यक्ष, मोब. 9022639372
---------------------------------
संस्थेचे नाव : महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड - मुंबई, छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती छत्रपती संभाजी नगर आणि मुंबई येथे करण्यात येत आहे.
महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड पूर्वीचे औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड ह्या नावाने ज्ञात (शासनाचा उपक्रम) असलेल्या संस्थेमध्ये खालील पदांची भरती थेट मुलाखतीद्वारे करण्यात येत आहे.
जाहिरात क्र. एमआयटीएल/२०२४
१. महाव्यवस्थापक विद्युत (प्रापण व नियामक कार्य) मुख्यालय, मुंबई येथे,
२. महाव्यवस्थापक विद्युत (प्रकल्प) छत्रपती संभाजी नगर येथे,
३. उप महाव्यवस्थापक विद्युत (प्रकल्प) छत्रपती संभाजी नगर येथे,
४. व्यवस्थापक विद्युत (ग्राहक देखभाल) छत्रपती संभाजी नगर येथे,
५. तांत्रिक सहायक - विद्युत (चाचणी व निरीक्षण) छत्रपती संभाजी नगर येथे आणि
६. लेखा अधिकारी (लेखापरीक्षण व अनुपालन) मुंबई येथे.
या विविध पदांकरिता ११ महिने कालावधीसाठी कंत्राटी नियुक्तीसाठी दि. ०९.१०.२०२४ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० पर्यंत थेट मुलाखत आयोजित केली आहे. पात्रता, अर्ज प्रक्रिया व मुलाखतीचे स्थान यांबाबत तपशिलवार जाहिरात एमआयटीएलच्या www.auric.city या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. एमआयटीएल संकेतस्थळाच्या न्यूज अँड इव्हेन्ट्स येथील तपशिलवार जाहिरातीत वर्णन केल्याप्रमाणे उमेदवारांनी आवश्यक प्रक्रियेचे पालन करून पूर्ण भरलेले अर्ज ई-मेलद्वारे दि. ०४.१०.२०२४ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी career@auric.city या ई-मेल वर पाठवावे.
टीप: (सदर जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची ११ महिने कालावधीसाठी कंत्राटी तत्वावर नियुक्तीकरिता दि. ०९.१०.२०२४ रोजी आयोजित थेट मुलाखतीसाठी नोंदणी सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत करण्यात येईल.)
कार्यालय पत्ता : उद्योग सारथी, डीएमआयसी सेल, एमआयडीसी ऑफिस, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०९३. दूरध्वनीः ०२२ २६८७९९५६ संकेतस्थळ: www.auric.city
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
संस्थेचे नाव : बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda
बँक ऑफ बडोदा वस्तू व सेवा कर सल्लागाराच्या नेमणुकीसाठी प्रस्ताव आमंत्रित करत आहे.
तपशीलवार माहिती बँकेची वेबसाईट www.bankofbaroda.in येथील निविदा विभागात आणि सरकारी ई-मार्केट प्लेस (GeM) पोर्टलवर उपलब्ध आहे.
"इतर सूचना" काही असल्यास, बँकेची वेबसाईट www.bankofbaroda.in येथील निविदा विभागात आणि सरकारी ई-मार्केट प्लेस (GeM) पोर्टलवर जारी करण्यात येईल. अंतिम स्वरूपातील प्रस्ताव सादर करण्यापूर्वी निविदाकारांनी हे अवश्य पहावे.
निविदा सादर करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.
-----------------------------------
संस्थेचे नाव : साई संजीवनी को-ऑप बँक लि. कोपरगाव, अहमदनगर
संस्थेचे नाव : MAHARASHTRA REAL ESTATE APPELLATE TRIBUNAL, Mumbai
विभागाचे नाव : महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण
पदांची नावं : खासगी सचिव, स्वीय सहायक, निम्न श्रेणी लघुलेखक, वित्त व लेखाअधिकारी, अधीक्षक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, लघुटंकलेखक, अभिलेखापाल, कनिष्ठ लिपीक, वाहन चालक आणि शिपाई
महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण, मुंबई कार्यालयातील खासगी सचिव, स्वीय सहायक, निम्न श्रेणी लघुलेखक, वित्त व लेखाअधिकारी, अधीक्षक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, लघुटंकलेखक, अभिलेखापाल, कनिष्ठ लिपीक, वाहन चालक आणि शिपाई अशा पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर (११ महिन्यांकरिता) पात्र उमेदवारांकडून दि. २३-१०-२०२४ पर्यंत पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांकरिता आवश्यक पात्रता, अर्जाचा विहित नमुना आणि अटी व शर्ती व पदांची संख्या या https://mahareat.maharashtra.gov.in महारिएट वेबसाईटवर परिपत्रक सूचना आणि कार्यालयीन आदेश (Circular notice and office order) सेक्शनमध्ये Advertisement No. 03/2024 या नावाने उपलब्ध आहेत.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
----------------------------------------------------
संस्थेचे नाव : पोलीस आयुक्त नवी मुंबई
जाहिरात क्रमांक : पोआ/नमुं/आस्था-१/वि.अ., भरती/३४३६/२०२४
पोलीस आयुक्त नवी मुंबई, भारतीय रिझर्व्ह बँकेसमोर, से. १०, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई आस्थापनेकडील "विधी अधिकारी गट - ब" व "विधी अधिकारी" यांची रिक्त पदे पूर्णतः कंत्राटी पद्धतीने भरणेत येत आहेत.
खालील नमूद "विधी अधिकारी गट-ब" व "विधी अधिकारी" यांची रिक्त पदे भरण्यासाठी नमूद अटी व पात्रता पूर्ण असलेल्या उमेदवारांकडून ११ महिन्यांकरिता पूर्णतः कंत्राटी पद्धतीने नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. खालील दर्शविलेल्या पदांमध्ये बदल होण्याची शक्यात गृहीत धरावी.
पदाचे नाव : विधी अधिकारी गट - ब
पदसंख्या : ०२
मानधन : एकत्रित अनुज्ञेय मासिक देय रक्कम रुपये २५,०००/- आणि दूरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रुपये ३०००/- असे एकूण २८,०००/- दरमहा देय राहील.
पदाचे नाव : विधी अधिकारी
पदसंख्या : ०४
मानधन : एकत्रित अनुज्ञेय मासिक देय रक्कम रुपये २०,०००/- आणि दूरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रुपये ३०००/- असे एकूण २३,०००/- दरमहा देय राहील.
दोन्ही पदांसाठी शैक्षणिक पत्रात : पदवीधर व सनदधारक
Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : २४.१०.२०२४
अर्ज करण्याबाबतची सविस्तर माहिती www.navimumbaipolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
----------------------------------------
संस्थेचे नाव : पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे
जाहिरात कमांक : जा.क्र. आस्था-३ (७)/गट-ड संवर्ग/बाह्ययंत्रणा संस्था नियुक्ती/२०२४/पुणे
पदांचे नाव : शिपाई, आचारी, भोजन सेवक या पदांसाठी तब्बल १५२ रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवर खाली नमूद केल्याप्रमाणे गट ड संवर्गातील पदे ११ महिने कालावधीसाठी बाह्ययंत्रणेमार्फत भरावयाची आहेत. त्यासाठी ई-निविदा पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्था/ कंपनी मार्फत खालील पदे पुरवठा करण्यासाठी दि. २४-९-२०२४ ते ३-१०-२०२४ सायंकाळी ६.०० वा. पर्यंत या कालावधीत निविदा अर्ज मागविण्यात येत आहेत.
सफाई कामगार - पूर्व वेळ ३० पदे, अर्धवेळ 72 पदे = एकूण १०२ पदे.
कार्यालयीन शिपाई : ३३ पदे
प्रमुख आचारी : ०१ पद
सहायक आचारी : ७ पदे
भोजन सेवक : ०९ पदे
सदर पदांबाबतच्या अटी व शर्ती, सविस्तर जाहिरात व विहित अर्जाचा नमुना पोलीस आयुक्त, पुणे शहर कार्यालयाच्या www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शशिकला भालचिम, प्रशासकीय अधिकारी, पोलीस आयुक्त, पुणे शहर.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
-----------------------------------
संस्थेचे नाव : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ, सोलापूर, नागपूर, बारामती
महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळातर्फे सोलापूर, नागपूर, बारामती येथे गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचे कामकाज सुरु आहे. तसेच महाराष्ट्रात विविध ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचे कामकाज महामंडळामार्फत हाती घेण्यात येत आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ या कार्यालयातील खालील पदे करार पध्दतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून दि.०८.१०.२०२४ पर्यंत उपरोक्त नमूद पत्त्यावर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतींसह अर्ज मागविण्यात येत आहेत. अंतिम दिनांकानंतरचे कोणतेही अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
पदाचे नाव : उपअभियंता (तांत्रिक) (Deputy Engineer - Technical)
पद संख्या : ०२
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer-Civil)
पद संख्या : ०४
पदाचे नाव : लेखापाल (Accountant)
पद संख्या : ०१
पदाचे नाव : ग्राफिक डिझाईनर (Graphic Designer)
पद संख्या : ०१
सदर पदभरतीबाबतची विस्तृत माहिती, पात्रता निकष व अटी व शर्ती, तसेच अर्जाचा विहित नमुना इ. https://mahahousing.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
संस्थेचे नाव : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण
सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना www.kdmc.gov.in या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर आणि नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदरहू भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
(वंदना गुळवे) उप आयुक्त (सा.प्र.) कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण
---------------------------------
संस्थेचे नाव : ठाणे महानगरपालिका, ठाणे
जाहिरात क्रमांक : ठामपा/पिआरओ/आस्था/५७९/२०२४-२५
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार्यरत/सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन संलग्न प्रकरणे, काल्पनीक वेतनवाढ प्रकरणे, आश्वासित प्रगती योजना अमलबजावणी तसेच लेखा व आस्थापना विषयक इत्यादी कामकाजाबाबत सखोल अनुभव असणारे अनुभवी वर्ग-२ मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या सेवेची आवश्यकता असल्याने, अशी सेवा सहा महिने कालावधीसाठी उपलब्ध करुन घेणेकरीता जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे खालील पदासाठी दिनांक ०१/१०/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (Walk In Interview) उपस्थित रहावे.
पदाचे नाव : कार्यालयीन अधीक्षक / कार्यालयीन उपअधीक्षक अथवा समकक्ष पद
शैक्षणिक पात्रता :
१. मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी.
२.शासकीय/निमशासकीय/स्था निक स्वराज्य संस्था येथे वर्ग -२ चे पदावर प्रशासकीय कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव, असणे आवश्यक आहे.
३. लेखा विभागातील सेवानिवृत्त वेतन विषयक कामाचा अनुभव आवश्यक.
४. ठाणे महानगरपालिकेतुन सेवानिवृत्त झालेल्या व ठामपा क्षेत्रात वास्तव्यास असलेल्यांना प्राध्यान्य.
सूचना : सदरची जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर www.thanecity.gov.in प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
संस्थेचे नाव : समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका
- वय मर्यादा : १८ - २५ वर्ष
- शिक्षण : किमान १२ वी उत्तीर्ण
- उंची : साडे पाच फुट/कमीत कमी 152 सेमी पेक्षा जास्त
- लिंग : स्त्री
- आरोग्य : शारिरीक दृष्ट्या सक्षम-वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करणे.
- मार्शल आट-प्राविण्य : ब्लॅक बेल्ट धारक महाराष्ट्र शासन मान्य खेळ
- मार्शल आर्ट खेळ प्राविण्य : राज्य स्तर प्रविष्य महाराष्ट्र शासन आयोजित
- इतर खेळ प्राविण्य : राष्ट्रीय खेळ पदका विजेती, प्रथम प्राधान्य/सहभाग
- प्रशिक्षण अनुभव : कमीत कमी 2 वर्षाचा स्वसंरक्षण प्रशिक्षण अनुभव महिला
संस्थेचे नाव : महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित, महानिर्मिती
संस्थेचे नाव : महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित, महानिर्मिती
ज्या संस्थेमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, त्याच संस्थेची संपूर्ण माहिती इथे दिली आहे. जसे कि संस्थेचे नाव, पत्ता, इमेल आयडी, फोन नंबर इत्यादी.
मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा.
हि माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट द्वारे नक्की कळवा..