Clerk (लिपिक) पदांची भरती
दि लासलगाव मर्चंट को-ऑप बँक लिमिटेड नाशिक या बँकेत खालील दर्शविलेल्या पदाकरिता सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को ऑप. असोसिएशन लि. सोलापूर यांचे मार्फत इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया तसेच पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक व इतर अर्हता तसेच इतर तपशील खालील दिलेल्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
The Lasalgaon Merchant Co-Operative Bank Ltd, Lasalgaon Nashik is recruiting for the post of Clerk. Online applications are invited from interested candidates.
The Lasalgaon Merchant Co-Operative Bank Ltd Vacancy for Clerk Posts |
रिक्त पदाचे नाव : लिपिक
वयोमर्यादा : दिनांक ०१ ऑगस्ट २०२४ ला किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षापेक्षा अधिक नसावे.
रिक्त पद संख्या : १०
पदासाठी आवश्यक निर्धारित शैक्षणिक अर्हता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर व MS-CIT समक्ष किंवा तत्सम संगणक अहर्ता आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासहित सादर करण्याची तारीख : २९ /०८/२०२४ सकाळी ११.०० वाजता
ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख : १२/०९/२०२४ रात्री ११.५९ पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन अर्ज सादर करण्याबत सविस्तर सूचना https://www.surbanksassociation.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी भरू शकेल.
https://www.surbanksassociation.in या संकेतस्थळावर अर्जदारांनी रजिस्ट्रेशन करावे. अर्जदारांनी अर्ज करण्या पूर्वी जाहिरातीमधील पदे व त्याकरिता लागणारी शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादा वाचूनच अर्ज सादर करावा.
नोंदणी : रजिस्ट्रेशन करतांना स्वतःचा आधार नंबर, नाव, वडिलांचे नाव, आडनाव, वैध असलेला मोबाईल नंबर, वैध इमेल आयडी इत्यादी माहिती भरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी.
रजिस्टेशन पूर्ण झाल्यावर समोरील पेज वर user ID & Password प्राप्त होईल, तसेच अर्ज भरतांना नमूद केला गेलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS सुद्धा पाठविला जाईल तो पदभरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत स्वताजवळ लिहून ठेवणे महत्वाचे आहे. (User ID & Password विसरलात तर संकेतस्थळावर Forgot User ID or Password करून पुन्हा मिळविता येईल.)
पद निवडणे : अर्जदारांनी पद निवडून पुढील पर्याय निवडावा.
वैयक्तिक माहिती : अर्जदारांनी वैयक्तिक माहिती मध्ये अर्जदारांचा पत्ता, इत्यादी माहिती अर्जदारांनी अचूक भरावी.
शैक्षणिक अर्हता : अर्जदारांनी शैक्षणिक अर्हतेची माहिती अचूक भरावी, अर्ज Submit करण्या अगोदर, अर्जदार माहितीमध्ये बदल करू शकतो पण एकदा अर्ज Submit केल्यानंतर अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही किंवा त्याची विनंती मान्य केली जाणार नाही याची सर्व अर्जदार यांनी नोंद घ्यावी.
अनुभव माहिती : अर्जदार यांच्या कडे अनुभव असल्यास त्यावर क्लिक करून पुढे जावे. अनुभवाची माहिती भरून Submit या बटन वर क्लिक करून पुढे जावे. ज्या अर्जदारांकडे अनुभव नाही त्यांनी skip या बटन वर क्लिक करून पुढे जावे.
छायाचित्र व स्वाक्षरी :
अर्जदाराचे सध्याचे नवीन पासपोर्ट फोटो : JPG/JPEG Format मधील २० KB ते १०० KB पर्यंत | लांबी रुंदी प्रमाण (Proportion) ३.५ सें. मी. x ४.५ सें. मी. असावे. छायाचित्राचा ७५% भाग चेहरा असावा.
अर्जदाराची स्वाक्षरी : JPG/JPEG Format मधील २० KB ते १०० KB पर्यंत | कोऱ्या पांढऱ्या कागदावर गडद जाड पॉईंटच्या पेनने स्वाक्षरी असावी.
महत्वाची सूचना छायाचित्र व स्वाक्षरी हि स्पष्टपणे दिसेल अशी स्कॅन करून अपलोड करावी. अस्पष्ट छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड केल्यास अर्जदार परीक्षेस अपात्र ठरू शकतात.
The Lasalgaon Merchant Co-Operative Bank Ltd, Lasalgaon Nashik is recruiting for the post of Clerk. Online applications are invited from interested candidates.
अर्जाची संपूर्ण माहिती : अर्ज सादर करतांना भरलेली संपूर्ण माहिती अर्जदारांना या स्टेप मध्ये पाहता येईल. अर्जदारांना अर्जात काही बदल करायचा असल्यास Home बटन वर क्लिक करून Edit या Option वर क्लिक करावे. किंवा संपूर्ण अर्ज बरोबर असल्यास अर्जदारांनी submit बटन वर क्लिक करून पुढे जावे. एकदा अर्ज submit केल्यावर अर्जदार अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू शकणार नाहीत याची नोंद घ्यावी.
परीक्षा शुल्क : परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा हि ऑनलाईन पद्धतीने असल्याने अर्जदार हे परीक्षा शुल्क फक्त Net Banking Credit Card / Debit Card / UPI / QR Code याच माध्यमातून करू शकतात. ऑनलाईन पेमेंट system मध्ये अर्जदार यांनी केलेला भरणा परीक्षा शुल्क Update होण्याकरिता ४८ तास ते ७२ तासांचा कालावधी लागू शकतो. अर्जदारांना याबद्दल काही मदत पाहिजे असल्यास संकेतस्थळावर दिलेल्या Helpline Number वर संपर्क साधावा.
परीक्षा शुल्काविना आलेल्या अर्जाना विचारात घेतले जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी.
अर्जाची प्रिंट : परीक्षा शुल्क भरून झाल्यावर अर्जदारांना अर्जाची प्रत व त्यासोबत परीक्षा शुल्क भरल्याची प्रत PDF स्वरुपात मिळेल त्याची प्रिंट काढून पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वतः कडे सांभाळून ठेवावी.
परीक्षा शुल्क : प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क राहील. (परीक्षा शुल्क विना परतावा राहील)
परीक्षा शुल्क :- रु. ८००/- + (१८% जी.एस.टी.) + Applicable Bank Transaction Charges
महत्वाच्या सूचना :
- लिपिक पदाची परीक्षा Online घेण्यात येईल
- परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्यानंतर अर्ज सादर (Final Submission) केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
- तसेच अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी सोबत ठेवावी.
- उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा, जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रीय असणे आवश्यक आहे.
- तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यास संपूर्ण प्रक्रीयेदरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सूचना, संदेश व माहितीउमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवार यांची राहील.
- तसेच ई-मेल आय.डी. व संदेशवहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणीना असोसिएशन व बँक जबाबदार राहणार नाही.
- सदर भरती प्रक्रीयेदरम्यान असोसिएशनच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
- उमेदवारांनी अर्ज भरतांना संबंधित पदांसाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
- ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवार यांनी त्याचे पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व सत्य माहिती सादर करणे आवश्यक राहील, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतांना काही चुका झाल्यास किंवा काही त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवार यांची राहील व याबाबत उमेदवारास कोठेही व कोणत्याही प्रकारे तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज एकदा सादर केल्यानंतर कोणत्याही परीस्थितीत बदल करता येणार नाही.
- सदर भरती प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळावर असलेल्या सूचनांचे वेळोवेळी अवलोकन व पालन करून भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार उमेदवार यांची राहील.
- उमेदवाराची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा हि ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रांची पूर्व तपासणी / छाननी न करता घेण्यात येणार असल्याने, या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही. कागदपत्रांच्या पूर्ण छाननी व तपासणीनंतरच त्याची वैधता पाहून उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे संपूर्ण अधिकार असोसिएशन व संबंधित बँकेने राखून ठेवलेले आहेत व याबाबत उमेदवारांना कोणतीही तक्रार करता येणार नाही.
- उमेदवारांना परीक्षा / कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्व:खर्चाने उपस्थित राहावे लागेल. आवश्यक असलेल्या पदांसाठी पात्र उमेदवारांची व्यक्तिगत मुलाखत घेण्यात येईल.
- परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरूप इ. बाबतची माहिती पात्र उमेदवारांना असोसिएशनच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
- ऑफलाईन परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यासंबंधी काही आक्षेप असल्यास पुढील तीन दिवसांच्या आत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नमुन्यानुसार लेखी पत्राने कळविणे आवश्यक राहील. त्यानंतर आवश्यकता असल्यास योग्य तो बदल करून सुधारित उत्तरसूची परीक्षा झाल्यानंतर ५ दिवसाच्या आत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. याबाबत असोसिएशन व बँकेचा निर्णय अंतिम राहील तसेच मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- मुलाखतीचे वेळापत्रक उमेदवारांना असोसिएशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
- भरती प्रक्रियेत / निवड कार्यपद्धतीत आवश्यकता असल्यास बदल करण्याचा अधिकार असोसिएशन व संबंधित बँकेस असेल व ऐनवेळी त्यात काही बदल झाल्यास तो संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना पत्राने / लेखी स्वरुपात कळविले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांची संख्या बँकेच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त होऊ शकते. पद भरती विषयक सर्वाधिकार असोसिएशन व संबंधित बँक राखून ठेवत असून संपूर्ण अथवा अंशतः भरती प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार देखील असोसिएशन व संबंधित बँक राखून ठेवत आहे.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी Telegram चैनेल जॉईन करा.
मित्रानो, हि माहिती आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातेवाईक व गरजू व्यक्तींना WhatsApp ग्रुप वर नक्की शेअर करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीची नोकरीबद्दल असेलेली चिंता दूर करू शकते.
The Lasalgaon Merchant Co-Operative Bank Ltd, Lasalgaon Nashik is recruiting for the post of Clerk. Online applications are invited from interested candidates.
मनोरंजनाचे किस्से, Good Morning, Good Night इत्यादी Message आपण नेहमीच फोरवर्ड करत असतो. आज एक चांगली बातमी आपल्या संपर्कातील गरजू व्यक्तीना व WhatsApp ग्रुपवर नक्की फोरवर्ड करा. आपला एक फोरवर्ड Message एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी देणारा किंवा आयुष्य घडवणारा ठरू शकतो. एक प्रकारे हि एक समाज सेवाच आहे. हि बातमी इतरांना पाठवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष त्या व्यक्तीचा यशात सहभागी व्हा.
हि माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट द्वारे नक्की कळवा..
हे पण वाचा :