आता १२०००/- रुपया ऐवजी १५०००/- रुपये मिळणार!
![]() |
Pm Kisan Sanman Nidhi Yojana 19th Installment |
शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नमो किसान सन्मान निधी योजने अंतर्गत राज्य शासनाकडून मिळणारे वार्षिक अर्थसाहय्य ६०००/- रुपया ऐवजी आता ९०००/- रुपये मिळणार आहे. या वाढीव निधीचा लाभ येत्या हफ्त्यात लवकरच मिळणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. Namo Kisan Sanman Nidhi Yojana
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून या दिशेने त्यांचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. देशातील बळीराजाला अडचणीच्या काळात "प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा" चांगला फायदा होत आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही बळीराजाला "नमो किसान सन्मान निधी योजने" अंतर्गत वार्षिक ६०००/- हजार रुपये देत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वार्षिक ६०००/- रुपये मिळत आहेत. PM Kisan Samman Nidhi Yojana
आता राज्य सरकार यामध्ये ३०००/- हजार रुपयांची वाढ करणार आहे. राज्य सरकार द्वारे वार्षिक ९०००/- हजार रुपये व केंद्र सरकार द्वारे ६०००/- रुपये. असे एकूण वार्षिक १५०००/- हजार रुपयांचे अर्थसाह्य शेतकर्यांना मिळणार आहेत. अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यानी सोमवार दिनांक २४/०२/२०२५ रोजी नागपूर येथे घोषणा केली आहे. NAMO Kisan Samman Nidhi Yojana
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
गत दहा वर्षांत आपल्या सरकारच्या प्रयत्नांमुळे कृषी क्षेत्रात वेगाने विकास झाला असून शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढले आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार भागलपूर येथे केला. बिहारच्या भागलपूर येथे सोमवारी २४.०२.२०२५ रोजी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात प्रक्रियेद्वारे ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २२ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana.
जगात खताची गोणी ३ हजार रुपयांना मिळते. आम्ही शेतकऱ्यांना ती ३०० रुपयांत देतो. सोमवारी शेतकरी सन्मान निधी योजनेचा २२ हजार कोटींचा १९वा हप्ता ९ कोटी ८० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आला. ही योजना सुरू होऊन सहा वर्षे झाली. आतापर्यंत ३ लाख ७० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले आहेत. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
हि माहिती आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट द्वारे नक्की कळवा..
#PMKisan #PMKisanSammanNidhi #PMKisan19thInstallment #pmkisanyojana #PMKisanScheme #PradhanMantriKisanSammanNidhi #followme #follow Marathi 24 Taas News #news #MarathiNews #marathi #sarkariyojana #sarkariyojanagr #sarkariyojana2024 #govtschemes #GovtScheme