लाडकी बहीण योजना फेब २०२५ हफ्ता या दिवशी मिळणार

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

महिला दिन पूर्वी बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हफ्ता जमा होणार

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची सध्या पडताळणी सुरु आहे. ही पडताळणी एकूण पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. यामध्ये महिलांची वयोमर्यादा, आयकर भरत असलेल्या महिला, चारचाकी वाहन असलेल्या महिला यांची तपासणी केली जात आहे. म्हणून फेब्रवारी महिन्याचा हफ्ता देण्यास विलंब झाला आहे. Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana 

Ladaki Bahin Yojana February 2025 Installment
Ladaki Bahin Yojana February 2025 Installment


विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना राबवली. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येत आहेत. या योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी जवळपास पूर्ण झाली आहे. या योजनेत आतापर्यंत जवळपास १० लाख महिलांचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. अंदाजानुसार लाडकी बहीण योजनेत ५० लाख महिलांचे अर्ज बाद ठरू शकतात असे सर्वेक्षणात आढळून आले आहे. याचाच अर्थ, छाननीमध्ये ५० लाख 'लाडक्या बहिणी' या योजनेसाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या २ कोटी ४६ लाख इतकी आहे. छाननीअंती ५० लाख अपात्र ठरल्यास, यामुळे सरकारच्या तिजोरीवरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. लाडकी बहीण योजनेतून ५० लाख महिला अपात्र ठरल्या, तर राज्य सरकारचा दर वर्षी १ हजार ६२० कोटी रुपयांचा भार कमी होणार आहे. Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana 


सध्या प्रती महिना सरासरी ३ हजार ७०० कोटी रुपयांचा हप्ता वितरित केला जात आहे. आजअखेर सहा महिन्यांत एकूण २१ हजार ६०० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले आहे. 'लाडकी बहीण' योजनेमुळे राज्यातील इतर योजनांवर ताण पडत आहे. या योजनेमुळे इतर अनेक योजनांचे हफ्ते थकले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana 


महिला दिनाच्या पूर्वी सर्व पात्र महिलांच्या खात्यात फेब २०२५ चा १५००/- रुपयांचा हफ्ता जमा केला जाईल अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री श्रीमती अदिती वरदा सुनील तटकरे यांनी केली आहे. "महिला दिन" शनिवारी दिनांक ०८.०३.२०२५ रोजी आहे. या सन्मान निधीचे वितरण ५ मार्च २०२५ ते ०८ मार्च २०२५ पर्यंत करण्यात येईल असे महिला व बालविकास मंत्री श्रीमती अदिती वरदा सुनील तटकरे यांनी जाहीर केले. सर्व पात्र महिलांच्या खात्यात ५ मार्च ते ८ मार्च २०२५ दरम्यान फेब्रूवारी २०२५ हफ्त्याचे १५०० रुपये जमा होणार आहेत.  Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana 


हे पण वाचा 

मुंबई उच्च न्यायालय ७ वी उत्तीर्ण ४५ शिपाई पद भरती

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!