मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी ५ महिन्यांची वाढ.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना फक्त ६ महिन्यांसाठी राबवण्यात येणार होती. या योजनेसाठी तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे या योजनेच्या कालावधी मध्ये ५ महिन्यांची वाढ करून आता ११ महिन्यांपर्यंत केली आहे. शासकीय सेवे अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर मिळणाऱ्या प्रमान्पात्राद्वारे नोकरी मिळवणे सहज आणि सोपे होणार आहे. राज्यातील तरुणांनी जास्ती जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
![]() |
'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने'चा एकूण कालावधी ११ महिने करण्याचा निर्णय घेतला |
युवकांना कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलत असताना महत्त्वाची घोषणा केली. या योजनेच्या कालावधी सध्या ६ महिन्यांचा आहे. मात्र, विधानसभा सदस्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी हा कालावधी ५ महिन्यांनी वाढवून 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने'चा एकूण कालावधी ११ महिने करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारी प्रमाणपत्र मिळाल्यास नोकरीची हमखास संधी.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कालावधीसाठी कोणतीही वाढ केली जाणार नाही. कारण, ही योजना कायमस्वरूपी नोकरीसाठी नसून प्रशिक्षणपर आहे. अनेक तरुण या संधीची वाट पाहत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे. तसेच सरकारी प्रमाणपत्र मिळाल्यास प्रशिक्षित तरुणांना नोकरी मिळवणे अधिक सोपे होईल. राज्य सरकार युवकांना कौशल्य विकास आणि प्रभावी प्रशिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे. जेणेकरून अधिकाधिक तरुणांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
हे पण वाचा :